अॅसिड हल्ला पीडितेच्या भूमिकेत दीपिका, ‘छपाक’चा पोस्टर प्रदर्शित

मुंबई : मेघना गुलजार दिग्दर्शीत ‘छपाक’ सिनेमाचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. यामुळे छपाक सिनेमातील अभिनेत्री दीपिका पादुकोणचा लुक समोर आला आहे. अभिनेत्री दीपिका छपाक सिनेमात अॅसिड अटॅक पीडित लक्ष्मी अग्रवालच्या भूमिकेत दिसत आहे. दीपिकाचा लुक पाहून तिचे चाहतेही निशब्द झाले आहेत. छपाक सिनेमाच्या माध्यमातून दीपिकाने आपल्या करिअरमधील सर्वात आव्हानात्मक भूमिका साकारली आहे. या …

अॅसिड हल्ला पीडितेच्या भूमिकेत दीपिका, ‘छपाक’चा पोस्टर प्रदर्शित

मुंबई : मेघना गुलजार दिग्दर्शीत ‘छपाक’ सिनेमाचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. यामुळे छपाक सिनेमातील अभिनेत्री दीपिका पादुकोणचा लुक समोर आला आहे. अभिनेत्री दीपिका छपाक सिनेमात अॅसिड अटॅक पीडित लक्ष्मी अग्रवालच्या भूमिकेत दिसत आहे. दीपिकाचा लुक पाहून तिचे चाहतेही निशब्द झाले आहेत. छपाक सिनेमाच्या माध्यमातून दीपिकाने आपल्या करिअरमधील सर्वात आव्हानात्मक भूमिका साकारली आहे. या सिनेमात दीपिकाच्या भूमिकेचे नाव मालती आहे.

दीपिका पादुकोणने पोस्टर शेअर करत लिहिलं की, “मालती एक अशी भूमिका आहे जी माझ्यासोबत नेहमी राहील. फोटोमध्ये दीपिका पादुकोणला ओळखणे कठीण आहे. ती लक्ष्मी अग्रवाल सारखी दिसत आहे. या फोटोमध्ये दीपिका आरशासमोर उभी आहे”.

छपाक सिनेमा 10 जानेवारी 2020 रोजी प्रदर्शित होणार आहे. दीपिकाचे चाहते आतापासून हा सिनेमा सुपरहिट आणि या वर्षातील सर्वात बेस्ट सिनेमा म्हणून सांगत आहेत.

बॉलिवूड कलाकारांनीही दीपिकाच्या या पोस्टरवर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. सर्वजण दीपिकाचा हा लुक पाहून आश्चर्यचकीत झाले आहे. वरुण धवन आणि जॅकलीन फर्नांडिसनेही या लुकला पसंद केले आहे.

कोण आहे लक्ष्मी अग्रवाल?

‘छपाक’ सिनेमा लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारित आहे. लक्ष्मीवर 2005 मध्ये एका माथेफिरुने अॅसिड हल्ला केला होता. लग्नासाठी नकार दिल्याने लक्ष्मीवर अॅसिड हल्ला करण्यात आला होता. अॅसिड चेहऱ्यावर फेकल्यामुळे संपूर्ण चेहरा लक्ष्मीचा खराब झाला. मात्र या हल्ल्यानंतर लक्ष्मी न खचता तिने कायद्याने लढाई केली. लक्ष्मीमुळे स्थानिक दुकानात अॅसिड, केमिकलच्या विक्रीवर भारतात कायदा बनवण्यात आला.

दीपिकाच्या सिनेमात अभिनेता विक्रांत मैसी अहम प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमातून दीपिकाने प्रोड्यूसरची जबाबदारीही सांभाळली आहे. गेल्या काही महिन्यापासून सिनेमाची संपूर्ण टीम स्क्रिप्ट रीडिंग सेशनवर काम करत आहे. 2018मध्ये लग्नानंतरचा दीपिकाचा हा पहिला प्रोजेक्ट आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *