AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhananjay Powar : कोल्हापूरमध्ये बिस्लरीच्या पाण्यानं अंघोळ करायचे, जान्हवीचं विधान; डीपी दादा म्हणाला, आज स्पष्टपणे सांगतो…

Dhananjay Powar On Jahnavi Killekar : जान्हवी किल्लेकर एका सिनेमाच्या शूटिंगला कोल्हापूरला गेलेली. कोल्हापूरात स्कीनचा प्रॉब्लेम असल्यामुळे तिनं बिस्लरीच्या पाण्यानं अंघोळ केलेली, असं एका मुलाखतीत अभिनेत्री म्हणालेली. मात्र, यामुळे जान्हवीला ट्रोलिंगचा सामना करावा लागलेला. आता यावर धनंजय पोवारनं त्याचं मत मांडलं आहे.

Dhananjay Powar : कोल्हापूरमध्ये बिस्लरीच्या पाण्यानं अंघोळ करायचे, जान्हवीचं विधान; डीपी दादा म्हणाला, आज स्पष्टपणे सांगतो...
| Updated on: Sep 30, 2026 | 7:45 PM
Share

‘बिग बॉस मराठी‘ फेम जान्हवी किल्लेकर काही दिवसांपासून ट्रोल होत आहे. अभिनेत्रीनं एका मुलाखतीत म्हटलेलं की, ती सिनेमासाठी कोल्हापूरला शूटिंगला गेलेली असताना तिथं तिनं बिस्लरीच्या पाण्यानं अंघोळ केली. आपल्याला त्वचेचा प्रॉब्लेम असल्यामुळे काळजी घ्यावी लागते, असंही अभिनेत्री म्हणालेली. अशातच आता यावर धनंजय पोवारनं आपलं मत मांडलं आहे.

काय म्हणाला धनंजय पोवार?

धनंजय पोवारनं इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओ शेअर करत धनंजय म्हणाला की, ‘आपण कोल्हापुरकर म्हणजे प्रेमळ माणसं. प्रत्येकाच्या चुका पोटात घालणारी माणसं. आपल्या कोल्हापूरची ओळख ही अतिशय सुंदर, मनमिळाऊ, प्रेमळ लोक त्यांच्या भाषेतील गोडव्यामुळे ओळखले जातात. मला असं वाटतं की, इथला कोणताही व्यक्ती व्ह्यूजसाठी, किंवा स्वत:च्या इन्स्टाग्रामसाठी किंवा सोशल चॅनलसाठी करतो असं अजिबात नाही. अनेक लोकांनी मला विचारलं की, ‘भाऊ तुम्ही कोल्हापूरच्या बाजूने आहात की जान्हवीच्या बाजूने?’ यावर मी आज स्पष्टपणे सांगतो की, मी कोल्हापूरच्या बाजूने आहे. माझी मैत्री माझ्यापुरतं मर्यादित आहे. नात्यात मी तिला बहीण मानतो. ती मला दादा अशी हाक मारते.’

‘लोकांनी चुकीच्या कमेंट्स केल्या त्यांना मी उत्तर देणारच नव्हतो पण एक व्हिडिओ बघितला, ज्यात तुम्ही तिच्या नवऱ्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरला हे मला अजिहात आवडलं नाही. कारण ही आपली भाषा नाही. आपण एखाद्याच्या घरातील व्यक्तीवर त्याच्या रंगावर नाही बोलू शकत. कोल्हापूरकर असे अजिबात नाही.’

‘तुम्ही तिचा व्हिडिओ नीट पाहा. तिच्या त्वचेचा प्रॉब्लेम आहे असं ती म्हणाली. कोल्हापूरचं पाणी खराब आहे हे वाक्य तिच्याकडून आलेलं नाही. तिच्या त्वचेचा प्रॉब्लेम असल्याने ती कुठेही गेली तरी ती बिस्लरीच्या पाण्याने अंघोळ करते. आता हे ऐकण्यासाठी अतिरेक वाटत असला तरी तो तिचा विचार आहे. त्यावर तिला तुम्ही बोलण्याचा अधिकार आहे. पण आपण कोल्हापूरकर खूप प्रेमळ आहोत.  मागेही एकदा एक बाई बोलून गेली की, कोल्हापूर किती घाण आहे त्यावेळचा रोष मला पटला असा नाही पण ती भावना तुम्ही व्यक्त केली. पण त्या बाईवर सुद्धा वाईट वेळ आली असेल. तिला घरातून बाहेर पडणं अवघड झालं असेल. ती बोलण्याच्या ओघात बोलून गेली. पण आपण खूप विषय उचलून धरला. इथेही तेच होतंय. विनाकारण एका व्यक्तीला ट्रोल केलं जातंय. आपण कोल्हापूरकर असे नाही आहोत लक्षात घ्या. ती चुकली असेल तर मी तिच्या कानाला धरुन इथे कोल्हापूरमध्ये आणून व्हिडिओ करुन तिला माफी मागायला लावेल. हेही तितकंच सत्य आहे. तेवढी माझी धमक आहे. पण तिने तसं काही वाक्य वापरलंच नाहीये. आपण विषयाचा बाऊ करतोय. मी कोल्हापूरकर आहे आणि आपली प्रेमळ भाषा कुठेतरी हरवतीये असं मला वाटतंय.  कृपया महाराष्ट्रात कोल्हापूरला चुकीचं प्रेझेंट करु नका.’

Follow Us
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार