
बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांचे मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. धर्मेंद्र यांच्या तब्येलबद्दल विविध चर्चा या रंगताना दिसल्या. काही दिवसांपूर्वी त्यांच्या निधनाची अफवा सुरू होती. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. धर्मेंद्र यांनी त्यांच्या बॉलिवूड करिअरमध्ये अनेक हीट चित्रपट दिली. मोठा चाहतावर्ग त्यांचा आहे. मुंबईतील विलेपार्ले परिसरात आता चाहत्यांची मोठी गर्दी जमत आहे. धर्मेंद्र यांची तब्येत नाजूक असताना संपूर्ण कुटुंब एकत्र दिसले. बॉलिवूडमधील सर्वात मोठे कुटुंब धर्मेंद्र यांचे आहे. धर्मेंद्र यांना दोन पत्नी असून 6 मुले आहेत. धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीचे नावे प्रकाश काैर आहे तर दुसऱ्या पत्नीचे नाव हेमा मालिनी आहे.
प्रकाश काैर आणि धर्मेंद्र यांना चार मुले तर हेमा मालिनी यांना 2 मुले आहेत. 6 मुले तर 13 नातवंडे असा मोठा परिवार धर्मेंद्र यांचा आहे. वडिलांची तब्येत नाजूक असल्यापासून त्यांचे 6 लेकर त्यांच्या जवळ होती. धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी कायमच प्रसिद्धीपासून दूर राहिल्या आहेत. धर्मेंद्र यांनी 1954 मध्ये प्रकाश कौरशी पहिले लग्न केले. त्यांना चार मुले झाली. सनी देओल, बॉबी देओल, विजेता देओल आणि अजिता देओल ही नावे आहेत.
धर्मेंद्र यांची मुलगी विजेता पती विवेक गिलसोबत दिल्लीत राहते. विजेताचे पती विवेक गिल हे राजमकल होल्डिंग्ज अँड ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आहेत. विवेक आणि विजेता यांचे लग्न 1988 रोजी झाले. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या दोन मुली आहेत. ईशा देओल हिने आई वडिलांप्रमाणेच बॉलिवूडमध्ये काम केले. मात्र, धर्मेंद्र यांची दुसरी मुलगी चित्रपटांपासून दूर आहे. तिचे नाव अहाना आहे.
बॉबी देओल आणि सनी देओल हे दोघेही बॉलिवूडमध्ये काम करतात. हे दोघे ईशा देओलचे सावत्र भाऊ आहेत. मागील काही दिवसांपासून बॉबी देओल, सनी देओल आणि ईशा देओल यांच्यातील जवळीकता वाढल्चाचे बघायला मिळाले. सनी देओल आणि बॉबी देओल यांच्या दोन्ही बहिणी प्रसिद्धीपासून दूर आहेत. आता धर्मेंद्र यांच्या नातवड्यांनीही बॉलिवूडमध्ये पर्दापण केले.