Chaudhry Aslam Khan : खऱ्या चौधरी अस्लमचे घरातून निघताना शेवटचे शब्द कोणते होते? बायको म्हणाली…

Chaudhry Aslam Khan : कसं होतं खऱ्या चौधरी अस्लम याचं आयुष्य? मृत्यूच्या दिवशी घरातून निघतात बायकोला काय म्हणालेला चौधरी अस्लम? 'ते' शब्द ठरले शेवटचे... बायकोन केला मोठा खुलासा...

Chaudhry Aslam Khan : खऱ्या चौधरी अस्लमचे घरातून निघताना शेवटचे शब्द कोणते होते? बायको म्हणाली...
| Updated on: Apr 01, 2026 | 12:50 PM

Chaudhry Aslam Khan : ‘धुरंधर 2’ मध्ये एसपी चौधरी अस्लम याची हत्या झाल्याचं दाखवण्यात आलं. सिनेमाची भूमिका अभिनेता संजय दत्त याने साकारली होती. सिनेमात असं दाखवण्यात आलं आहे की, कशा प्रकारे एका सुसाइड बॉम्बर बारूदने भरलेल्या गाडीला अस्लम याची गाडी धडकते आणि त्यामध्ये चौधरी अस्लम याचा अंत होतं. खऱ्या आयुष्यात देखील चौधरी अस्लम यानं निधन बॉम्ब ब्लास्टमध्ये झालं होतं. दरम्यान, ‘धुरंधर 2’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर खऱ्या चौधरी अस्लम याची पत्नी नोरीच्या जुन्या मुलाखती व्हायरल होत आहेत. ज्यामुळे चौधरी अस्लम याचं खरं आयुष्य कसं होतं, ते देखील समोर आलं आहे.

एवढंच नाही तर, ज्या दिवशी अस्लम याचं निधन होणार होतं, त्या दिवशी घरातून निघताना बायकोला काय म्हणालेला हे देखील समोर आलं आहे. चौधरी अस्लम याच्या पत्नीने त्याच्याबद्दल शेवटच्या आठवणी एका मुलाखतीत सांगितल्या होत्या.
शेवटच्या दिवशी चौधरी अस्लम याच्या चेहऱ्यावर होती वेगळीच चमक…

चौधरी अस्लम याच्या शेवटच्या दिवसाबद्दल सांगताना नोरी म्हणाली, ‘त्याचा चेहरा त्या दिवशी नेहमीप्रमाणे अधिक चमकत होता… मी त्याला म्हणाली, अस्लम तू मोठा मर्द माणून आहे. तुझा क्रिम आणि यासर्व गोष्टींशी काहीही संबंध नाही… तेव्हा अस्लम म्हणालेला, तुझं डोकं ठिकाण्यावर आहे का? मी फक्त शॉम्पोचा वापर करतो, क्रिम यांसारख्या गोष्टींचा मला गरज नाही…’, असं दोघांमध्ये बोलणं झालेलं…

शेवटच्या दिवशी मुलांना शाळेत सोडण्याची इच्छा…

नोरी पुढे म्हणाली, ‘घरातून बाहेर पडल्यानंतर अस्लम पायऱ्यांपर्यंत गेला आणि त्याने मला आवाज दिला. मुलांना आज शाळेत सोडू का? मी पण आनंदी झाली आणि हो म्हणाली. कारण पहिल्यांदा बापाचं कर्तव्य करत होता…’, असं देखील नोरी म्हणाली.

अर्ध्या रस्त्यात असताना मुलांना मिळाली वडिलांच्या निधनाची बातमी

चौधरी अस्लम याचं निधन आणि मुलांबद्दल सांगताना नोरी म्हणाली, ‘मुलांना सांगण्यात आलं, तुमचा बाप शहीद झाला आहे आणि तुमची आई वेडी झाली आहे… तेव्हा तर मुलं लहान होती आणि लहान मुलगा तर सर्वात लाडका होता… त्याला मोठा धक्का बसला… मुलगी मला सतत विचारत होती, ‘आई काय झालं आहे खरं सांग. बाबा कसे आहेत? तेव्हा मुलांना सांगितलं, ‘बाबा हॉस्पिटलमध्ये आहेत. त्यांच्यावर शस्त्रक्रिया सुरुर आहे… जखमी आहेत, पण श्वास सुरु आहे… मी चौधरी अस्लमचा मृतदेह पाहिला आहे… मुलांना सांगितलेलं. मीडिया खोटं सांगत आहे…’, असं देखील नोरी म्हणाली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us