Deepali Sayyed : तेव्हाच ही ताकद दाखवली असती तर…‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’च्या वादावर दीपाली सय्यदचा संताप; रुपाली चाकणकरांना सुनावलं

Deepali Sayyed : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’च्या वादावर दीपाली सय्यदनं नुकत्याच एका मुलाखतीत भाष्य केलं असून रुपाली चाकणकर यांच्यावरही तिनं टीका केली आहे.

Deepali Sayyed : तेव्हाच ही ताकद दाखवली असती तर...‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’च्या वादावर दीपाली सय्यदचा संताप; रुपाली चाकणकरांना सुनावलं
| Updated on: Nov 18, 2026 | 6:44 PM

‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या आगामी चित्रपटाच्या नावावरून आणि विषयावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध होत असताना आता अभिनेत्री दीपाली सय्यद हिनं या वादावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी तिनं राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरही निशाणा साधला. महिला आयोगाच्या अध्यक्षपदी असताना त्यांनी महिलांच्या प्रश्नांसाठी अशीच ताकद दाखवली असती, तर अनेक गोष्टी घडण्यापासून रोखता आल्या असत्या, असं मत दीपालीनं व्यक्त केलं.

एका मुलाखतीदरम्यान दीपाली सय्यदनं चित्रपटाच्या आशयाबद्दल भाष्य केलं. ती म्हणाली, ‘सिनेमा म्हटल्यावर काही गोष्टी आपल्याला दाखवाव्या लागतात. विषय खरा असला तरी काही गोष्टी काल्पनिक पद्धतीने मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. चित्रपटात काही प्रसंग दाखवताना सिनेमॅटिक लिबर्टी घेतली जाते. त्यामुळे प्रेक्षकांनीही ही गोष्ट समजून घेतली पाहिजे.’

Loading...

रुपाली चाकणकर यांच्यावर दीपाली सय्यदची टीका

यानंतर रुपाली चाकणकर यांच्यावर टीका करताना दीपाली म्हणाली, ‘त्यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर होत्या. आता त्या या पदावर नाहीत. मात्र, आता त्या आरडाओरडा करत आहेत, ट्रेडमार्कचा मुद्दा उपस्थित करत आहेत आणि सेन्सॉर बोर्डासमोरही अडचणी निर्माण करत आहेत. सिनेमा मार्केटमध्ये येऊ नये, यासाठी प्रयत्न करत आहेत. माझं म्हणणं एवढंच आहे की, हीच ताकद आणि हाच प्रयत्न तुम्ही त्यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षपदी असताना केला असता, तर मला वाटतं अनेक गोष्टी थांबल्या असत्या.’

‘आजही तुम्ही आमच्यासोबत उभ्या राहिल्या असता, खरातला शिक्षा कशी होईल आणि भविष्यात दुसरा खरात निर्माण होऊ नये, यासाठी प्रयत्न केले असते, तर लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं.’ असंही दीपाली म्हणाली. ‘लोकशाही‘ला दिलेल्या मुलाखतीत दीपाली सय्यद बोलत होती.

 

दरम्यान, ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ हा सिनेमा २० नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार असून या सिनेमात मनोज जोशी, सुबोध भावे, उदय टिकेकर यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us