AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sankarshan Karhade : सरांनी माझ्या 40-50 थोबाडीत मारल्या, अन्…संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला किस्सा

Sankarshan Karhade : संकर्षण कऱ्हाडेनं नुकत्याच एका मुलाखतीत बालपणीचा किस्सा सांगितला आहे.

Sankarshan Karhade : सरांनी माझ्या 40-50 थोबाडीत मारल्या, अन्...संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला किस्सा
| Updated on: Nov 18, 2026 | 5:43 PM
Share

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. अभिनयासोबतच आपल्या विनोदी स्वभावामुळे आणि मिश्किल बोलण्यामुळेही तो प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतो. संकर्षण अनेकदा त्याच्या आयुष्यातील मजेशीर किस्से चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतो. नुकत्याच एका मुलाखतीत त्याने आपल्या बालपणीच्या खोडकर आठवणींना उजाळा दिला. ट्युशनच्या सरांना त्रास देण्यासाठी तो आणि त्याचा मित्र मिळून एक भन्नाट शक्कल लढवायचे. मात्र, त्यांच्या या खोडीचा शेवट चांगलाच मार खाण्यात झाला होता.

संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला किस्सा

संकर्षण कऱ्हाडे म्हणाला की, ‘खरं तर मी खोडकर होतो असं नाही. मला आजही खोड्या करायला खूप आवडतात. पण, ते कुणाच्या जिव्हारी लागू नये, ह्याचा विचार करतो. आमचे ट्युशनचे सर होते. त्यांची पत्र्याची खोली होती. मी हाताशी एक मित्र ठेवायचो. जेणेकरून मार विभागला जाईल. तर मी त्याला घेऊन जायचो. बांधकामाच्या गारगोट्या असतात, त्या मी घेऊन ठेवायचो. सरांना विचारायचं, आता येऊ का, त्यांनी या म्हटलं आणि ते मागे वळले की, त्या गारगोट्या उंच फेकायच्या आणि शेवटच्या रांगेमध्ये जाऊन बसायचं. त्याचा धुडूम असा मोठा आवाज यायचा.’

संकर्षण पुढे म्हणाला की, ‘पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही ते दगड फेकले तेव्हा सगळे विद्यार्थी पळून गेले. सरसुद्धा घाबरले. दुसऱ्यादिवशी तेच केलं. तेव्हा कोण घाबरलं नाही. तिसऱ्यादिवशी जेव्हा आम्ही पुन्हा दगड फेकले, तेव्हा कुणीही घाबरलं नाही. सर आमच्याकडे आले आणि सरांनी दोन्ही हातांनी आमच्या किमान 40-50 थोबाडीत मारल्या आणि म्हणाले, ‘आम्ही काय मूर्ख आहोत का? रोज तुम्ही आल्यावरच कसे दगड पडतात.’ त्यामुळे दुसऱ्या दिवशीपासून दगडांचा कार्यक्रम बंद केला. वेगळ्या खोड्या सुरू झाल्या.’ ‘लोकमत फिल्मी‘ला दिलेल्या मुलाखतीत संकर्षण कऱ्हाडे बोलत होता.

दरम्यान, संकर्षण कऱ्हाडे सध्या त्याच्या ‘आदि अनंत‘ या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात त्यानं अशोक सराफ यांच्यासोबत भूमिका साकारली आहे. हा सिनेमा 12 नोव्हेंबर 2026 रोजी प्रदर्शित झाला असून या सिनेमाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय.

Follow Us
सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले....
Gold Silver Price Today : सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले; जळगावच्या सराफ बाजारात मोठा दिलासा, पाहा आजचे भाव
शायना एनसी विधानभवनात दाखल; एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती
Shaina NC : शायना एनसी विधानभवनात दाखल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती, राजकीय चर्चांना उधाण
बाळासाहेबांचा फोटो अनावधानाने फाडला असेल तर...; शंभुराज देसाई नेमकं...
Shambhuraj Desai : बाळासाहेबांचा फोटो अनावधानाने फाडला असेल तर...; शंभुराज देसाई नेमकं काय म्हणाले?
शिवसेना सत्तासंघर्षात ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभूंच्या
Shivsena Hearing Case : शिवसेना सत्तासंघर्षात ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभूंच्या व्हिपच्या वैधतेवर उपस्थित केले प्रश्न
शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणातील सुनावणीला सुरुवात
Shivsena Hearing Case : शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणातील सुनावणीला सुरुवात
बाळासाहेबांच्या फोटोच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आक्रमक; शायना एनसी.....
Shivsena UBT : बाळासाहेबांच्या फोटोच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आक्रमक; शायना एनसींविरोधात मुंबई महापालिकेत जोरदार आंदोलन
हिंमत असेल तर फडणवीसांचे सरकारी GR फाडून दाखवा; वडेट्टीवारांचं शिंदे
Vijay Wadettiwar : हिंमत असेल तर फडणवीसांचे सरकारी GR फाडून दाखवा; विजय वडेट्टीवारांचं शिंदे सेनेला थेट आव्हान
बाळासाहेबांचा फोटो फाडल्याचे भानही त्यांना... सुषमा अंधारे संतापल्या
Sushma Andhare : बाळासाहेबांचा फोटो फाडल्याचे भानही त्यांना... शायना एनसी यांच्यावर सुषमा अंधारे संतापल्या
शायना एनसी यांच्या हातून बाळासाहेब ठाकरेंचा फोटोही फाटला.....
Shivsena : सोनिया गांधींच्या पुस्तकाची प्रत फाडताना शायना एनसी यांच्या हातून बाळासाहेब ठाकरेंचा फोटोही फाटला
शिंदेंच्या शिवसेनेने सोनिया गांधींच्या पुस्तकाची प्रत फाडली....
Sonia Gandhi's Book : Shivsena : सावरकरांचा अपमान सहन करणार नाही...; शिंदेंच्या शिवसेनेने सोनिया गांधींच्या पुस्तकाची प्रत फाडली