बाळासाहेबांचा फोटो फाटलाच नाही! शायना एनसींच्या त्या कृतीवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टीकरण देत म्हणाले, मणिशंकर यांचं तोंड…
Eknath shinde on balasaheb thackeray photo torn : बाळासाहेब ठाकरे हे आमचं दैवत आहेत. कोणताही शिवसैनिक त्यांचा अपमान करू शकत नाही, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. शायना एनसी यांनीही याबाबत स्पष्टीकरण दिल्याचं त्यांनी सांगितलं.

राज्याच्या राजकारणात सध्या नवा वाद रंगलाय. बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याचा आरोप ठाकरे गट आणि महाविकास आघाडीकडून केला जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्रातील काही पाने फाडताना, पुस्तकाचा निषेध करताना हा प्रकार घडला होता. त्यानंतर शायना एनसी यांनी घडलेल्या प्रकाराचं स्पष्टीकरण दिलं होतं. आता उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनीही त्यांची पहिली प्रतिक्रिया दिलीये.
बाळासाहेबांचा नाही, मणिशंकर यांचा फोटो फाटला…
यावेळी फाटलेल्या फोटोबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, बाळासाहेब हे आमचं दैवत आहेत. बाळासाहेबांचा अपमान कोणीही शिवसैनिक करु शकत नाही, करणारही नाही. त्याबाबतीत शायना एनसी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. बाळासाहेब हे मणिशंकर अय्यर यांना चप्पल मारतानाचा तो फोटो आहे. तो मी बघितला आहे. तो फोटो जो फाटला, त्यातं मणिशंकर अय्यरचं तोंड फाटलंय, त्यामुळे बाळासाहेंबांचा अपमान झाला नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
ठाकरेंवर टीका, 2019चं पुन्हा काढलं
लोकांनी नाकारलं आहे. त्यामुळे खोटे आरोप करुन बदनाम करण्याचं काम करत आहेत. पब्लिक है सब जानती हैं. फोटोवरुन राजकारण सुरु आहे. लोकांनी त्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. उगाच राजकारण करण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत करा. बाळासाहेंब आमचं दैवत असून त्यांचा अवमान अशक्य आहे, असा पुनरुच्चार एकनाथ शिंदे यांनी केला, ते माध्यमांसोबत बोलत होते.
सावरकरांच्या अपमानावरुन काँग्रेसवर टीका, ठाकरेंनाही घेरलं
राहुल गांधी यांनीही सावरकरांचा वेळोवेळी अपमान केला. सोनिया गांधींच्या पुस्तकातही सावरकरांचा अपमान करण्यात आलाय. ठाकरेसेना अशावेळी एक निषेधाचं वाक्यही काढत नाही आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसतात.
