AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Social Media Trend : अभी ना जाओ छोडकर…. जुन्या गाण्यांची GEN Z ला भुरळ! नव्या गाण्यांच्या जमान्यात रेट्रो गाण्यांचा बोलबाला

60, 70 आणि 90 च्या दशकातील गाणी आजच्या तरुणांच्या प्लेलिस्टमध्ये पुन्हा जागा मिळवत आहेत. जुन्या गाण्यांचे मन शांत करणारे शब्द, संगीत आणि सोशल मीडियावरील ट्रेंड यामुळे या GEN Z च्या जमान्यात रेट्रो गाण्यांची क्रेझ वाढली आहे.

Social Media Trend : अभी ना जाओ छोडकर.... जुन्या गाण्यांची GEN Z ला भुरळ! नव्या गाण्यांच्या जमान्यात  रेट्रो गाण्यांचा बोलबाला
GEN Z AND RETRO SONGSImage Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Nov 18, 2026 | 5:35 PM
Share

आज काल मोबाईलवर रिल्स पाहताना एखादं जुनं हिंदी गाणं कानावर पडलं, तर आश्चर्य वाटायला नको. कारण सध्या तरूणाईमध्ये म्हणजेच आत्ताच्या GEN Z मध्ये जुन्या बॉलिवूड गाण्यांची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. एकीकडे नवीन गाणी, रॅप आणि वेगवेगळ्या संगीताचा ट्रेंड सुरू असताना दुसरीकडे 60, 70,90 च्या दशकातील गाणी पुन्हा तरूणांच्या प्लेलिस्टमध्ये जागा तयार करत आहेत.

यांसारखी गाणी सध्या इन्स्टाग्राम रील्स आणि सोशल मिडिया पोस्टमध्ये

विशेष म्हणजे ही गाणी ज्या काळात लोकप्रिय झाली, त्या काळात आजच्या तरूणाईचा जन्मही झाला नव्हता. तरीही या गाण्यांनी आताच्या नव्या पिढीला अक्षरक्ष: भुरळ घातली आहे. ‘अभी ना जाओ छोडकर’, ‘हम तेरे प्यार मे सारा आलम’ आणि बाहो में चले आओ’ यांसारखी गाणी सध्या इन्स्टाग्राम रील्स आणि सोशल मिडिया पोस्टमध्ये पुन्हा ऐकायला मिळत आहेत.

मानसिक आराम आणि शांतता मिळते

आता असा प्रश्न पडतो की, आजच्या नव्या गाण्यांच्या गर्दीत जुन्या गाण्यांमध्ये असं काय खास आहे? तर याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे त्या गाण्यांचं संगीत आणि त्यांचे शब्द. जुन्या गाण्यांमध्ये प्रेम विरह, प्रतीक्षा आणि नात्यांमधील भावना अतिशय सुंदर पद्धतीने मांडलेल्या असायच्या. या गाण्यांची चाल आणि शब्द तरूणांना वेगळाच अनुभव देतात. अनेकांना ही गाणी ऐकताना एक प्रकारचा मानसिक आराम आणि शांतता मिळते.

या जुन्या गाण्यांना पुन्हा लोकप्रिय करण्यात सोशल मीडियाचाही मोठा वाटा आहे. एखाद्या रीलमध्ये जुनं गाणं वापरलं जातं आणि ते लोकांना आवडलं की इतर तरूणही त्याच गाण्यावर व्हिडिओ बनवू लागतात. अशा प्रकारे अनेक वर्षांपूर्वीची गाणी पुन्हा चर्चेत येतात. काही तरूणांना ही गाणी घरात आई- वडील किंवा आजी- आजोबांकडून ऐकायला मिळतात, तर काही जण सोशल मीडियाच्या माध्यमातून ती पहिल्यांदा शोधतात.

Follow Us
सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले....
Gold Silver Price Today : सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले; जळगावच्या सराफ बाजारात मोठा दिलासा, पाहा आजचे भाव
शायना एनसी विधानभवनात दाखल; एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती
Shaina NC : शायना एनसी विधानभवनात दाखल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती, राजकीय चर्चांना उधाण
बाळासाहेबांचा फोटो अनावधानाने फाडला असेल तर...; शंभुराज देसाई नेमकं...
Shambhuraj Desai : बाळासाहेबांचा फोटो अनावधानाने फाडला असेल तर...; शंभुराज देसाई नेमकं काय म्हणाले?
शिवसेना सत्तासंघर्षात ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभूंच्या
Shivsena Hearing Case : शिवसेना सत्तासंघर्षात ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभूंच्या व्हिपच्या वैधतेवर उपस्थित केले प्रश्न
शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणातील सुनावणीला सुरुवात
Shivsena Hearing Case : शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणातील सुनावणीला सुरुवात
बाळासाहेबांच्या फोटोच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आक्रमक; शायना एनसी.....
Shivsena UBT : बाळासाहेबांच्या फोटोच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आक्रमक; शायना एनसींविरोधात मुंबई महापालिकेत जोरदार आंदोलन
हिंमत असेल तर फडणवीसांचे सरकारी GR फाडून दाखवा; वडेट्टीवारांचं शिंदे
Vijay Wadettiwar : हिंमत असेल तर फडणवीसांचे सरकारी GR फाडून दाखवा; विजय वडेट्टीवारांचं शिंदे सेनेला थेट आव्हान
बाळासाहेबांचा फोटो फाडल्याचे भानही त्यांना... सुषमा अंधारे संतापल्या
Sushma Andhare : बाळासाहेबांचा फोटो फाडल्याचे भानही त्यांना... शायना एनसी यांच्यावर सुषमा अंधारे संतापल्या
शायना एनसी यांच्या हातून बाळासाहेब ठाकरेंचा फोटोही फाटला.....
Shivsena : सोनिया गांधींच्या पुस्तकाची प्रत फाडताना शायना एनसी यांच्या हातून बाळासाहेब ठाकरेंचा फोटोही फाटला
शिंदेंच्या शिवसेनेने सोनिया गांधींच्या पुस्तकाची प्रत फाडली....
Sonia Gandhi's Book : Shivsena : सावरकरांचा अपमान सहन करणार नाही...; शिंदेंच्या शिवसेनेने सोनिया गांधींच्या पुस्तकाची प्रत फाडली