Shivsena UBT : बाळासाहेबांच्या फोटोच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आक्रमक; शायना एनसींविरोधात मुंबई महापालिकेत जोरदार आंदोलन
शायना एनसी यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याच्या निषेधार्थ ठाकरे गटाच्या शिवसेनेने जोरदार आंदोलन केले. मुंबई महानगरपालिकेत किशोरी पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली हा निषेध नोंदवण्यात आला. शायना एनसींच्या कृतीमुळे ठाकरे गट संतप्त झाल्याचे दिसून आले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोच्या कथित विटंबनाप्रकरणी ठाकरे गटाच्या शिवसेनेने भाजप नेत्या शायना एनसी यांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले आहे. काही काळापूर्वी सोनिया गांधींच्या पुस्तकावरून निषेध नोंदवत असताना शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. या कृतीचा निषेध म्हणून ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी मुंबई महानगरपालिकेत जोरदार घोषणाबाजी केली.
या आंदोलनाचे नेतृत्व मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केले. शिवसैनिकांनी निषेध असो, निषेध असो आणि धिक्कार असो, धिक्कार असो अशा घोषणा दिल्या. ठाकरे गटाने शायना एनसी यांच्या कृतीला उथळ संबोधत त्या कोणत्याही पक्षात स्थिर राहत नाहीत अशी टीका केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोच्या विटंबनेमुळे शिवसैनिकांच्या भावना दुखावल्याचे या आंदोलनादरम्यान दिसून आले.
Published on: Nov 18, 2026 02:27 PM
बाळासाहेबांच्या फोटोच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आक्रमक; शायना एनसी.....
हिंमत असेल तर फडणवीसांचे सरकारी GR फाडून दाखवा; वडेट्टीवारांचं शिंदे
बाळासाहेबांचा फोटो फाडल्याचे भानही त्यांना... सुषमा अंधारे संतापल्या
शायना एनसी यांच्या हातून बाळासाहेब ठाकरेंचा फोटोही फाटला.....

