AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rakesh Sarang : नानाला माझ्यापासून दूर ठेवा, मी डान्स करते तेव्हा तो…तनुश्रीचे गंभीर आरोप, दिग्दर्शकानं सांगितलेलं सत्य

Director On Tanushree Dutta : बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्तानं नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यावर सिनेमाचे दिग्दर्शक राकेश सारंग यांनी प्रतिक्रिया दिलेली.

Rakesh Sarang : नानाला माझ्यापासून दूर ठेवा, मी डान्स करते तेव्हा तो...तनुश्रीचे गंभीर आरोप, दिग्दर्शकानं सांगितलेलं सत्य
| Updated on: Oct 17, 2026 | 6:26 PM
Share

दिवंगत अभिनेते नाना पाटेकर यांचं 8 ऑक्टोबर 2026 रोजी निधन झालं. नाना पाटेकर यांच्या निधनावर अभिनेत्री तनुश्री दत्तानं प्रतिक्रिया देत वादग्रस्त वक्तव्य केलेलं. अनेक वर्षांपूर्वी अभिनेत्रीनं नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप केले होते. ‘हॉर्न ओके प्लिज‘ सिनेमाच्या सेटवर नानांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्रीनं केलेला. याप्रकरणी सिनेमाचे दिग्दर्शक राकेश सारंग यांनीही प्रतिक्रिया दिलेली. त्यांची जुनी मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होतेय.

राकेश सारंग यांनी सांगितलेला प्रसंग 

तनुश्रीच्या आरोपांमध्ये अजिबात तथ्य नसल्याचा दावा राकेश सारंग यांनी केला होता. राकेश सारंग म्हणालेले की, ”हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटातील एका आयटम साँगसाठी आम्ही तनुश्री दत्ताला विचारलं. ती तयार झाली. या गाण्याची कोरिओग्राफी प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य करत होते. माझी पत्नी संगीताने गणेशचं नाव सुचवलं होतं. त्या आयटम साँगसाठी आम्ही फिल्मिस्तान स्टुडिओमध्ये मोठा सेट उभारला होता. जवळपास 250 डान्सर्स होते.’

‘पहिल्या दिवशी तनुश्री आली, तेव्हा क्राऊडने तिला पाहून शिट्या वाजवल्या, बोंबाबोंब केली. शेवटी मीच आवाज दिला की, लाथ मारके एक-एक को भगादूंगा. दुसऱ्या दिवशी नाना पाटेकर आला. परत शिट्या-बोंबाबोंब. नाना आणि तनुश्री यांनी मजा-मस्ती केली. सेटवर एकूणच हलकंफुलकं वातावरण होतं. त्यामुळे आम्हीही खुश होतो. त्यावेळी माझ्या पायाला फ्रॅक्चर झालं होतं. नुकतंच प्लास्टर काढलं होतं. त्यामुळे मी एकाच जागी बसून होतो, फार हालचाल करायचो नाही. तिसऱ्या दिवशी तनुश्री सेटवर आली, ती रागावलेलीच होती. त्यामुळे आमच्या टीममध्ये चर्चाही रंगली की, आज हिचा मूड खराब दिसत आहे. त्या दिवशी नानासोबत तिने दोन डान्स शॉट्सही दिले. लंच झाला. लंचमध्ये तिच्या मेकअपमनने मला बोलावलं. तिच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये बोलावलं. मी त्याला म्हटलं, माझ्या पायाचा प्रॉब्लेम आहे, मॅडमला विचार तुम्ही याल का. पण तरी ती आली नाही, शेवटी मी हळूहळू तिच्या व्हॅनमध्ये गेलो.’

‘मी व्हॅनमध्ये गेलो तर ती रागवून बसली होती. तिचे डोळे लाल झाले होते. ती माझ्याकडे रोखून बघत होती. मलाही कळेना काय झालं. तितक्यात ती अर्वाच्य शब्दात नानाबद्दल बोलायला लागली. ती काय बोलली, हे मला आता सांगताही येणार नाही, इतकी तिची भाषा अर्वाच्य होती. ती म्हणाली की, नानाला माझ्यापासून दूर ठेवा. मी डान्स करते तेव्हा तो का बघतो. मी तिची समजूत घातली की, तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. सेटवर येऊन मी माझ्या असिस्टंटना विचारलं, की इथे काही वादावादी झाली का? तर ते नाही म्हणाले. नानानं आपल्याला स्पर्श केल्याचं तिनं नंतर सांगितलं, त्यामुळे आधी मला वाटलं भांडण झालं असेल. नाना मस्करीत काहीतरी बोलला असेल आणि वाद झाले असतील. तितक्यात नाना तिथे आला. मी त्याच्याशी पब्लिसिटीविषयी बोललो. पुढचा डान्स सिक्वेन्स नानासोबत होता, पण ती येणार नसल्याचं तिच्या मेकअपमननी सांगितलं. नाना टच नही करेगा, असं ती म्हणत होती. आम्ही सगळे जाऊन तिचा दरवाजा ठोठावून आलो, पण मॅडम बाहेर येईना.’

‘अभिनेत्री डेझी शाह गणेशची असिस्टंट होती, ती गेली तरी दरवाजा उघडेना. जवळपास चार तास ती आत बसून होती. अखेर ती बाहेर आली. मै जा रही हू, मुझे करना नही है, असं म्हणत ती निघून गेली. आम्ही पत्रकारांना बोलावलं नव्हतं, पण त्यांना कुठून तरी समजलं.  2008 मध्ये दीड कोटी रुपये खर्च करुन आयटम डान्स करणं मोठी गोष्ट होती. मी प्रेसला मुलाखत दिली नाही, गणेशनेही दिली नाही. तनुश्री बाहेर जाताना काहीतरी बाचाबाची झाली. तिचा हात लागून एकाचा कॅमेरा तुटला. ती घाईघाईत गाडीत बसली आणि तिची गाडी एका पत्रकाराच्या पायावरुन गेली. त्यामुळे सगळे जण गाडीमागे धावले. जो राडा झाला तो प्रेस आणि तनुश्री दत्तामध्ये. आम्ही तिथे गेलोही नाही. पोलिस आले. तनुश्री आणि संबंधित पत्रकारांना घेऊन पोलिस स्टेशनला गेले. त्यांनी एकमेकांविरोधात एफआयआर दाखल केली. नानाने आधीच एफआयआर दाखल केल्याचा तनुश्रीचा आरोप धादांत खोटा आहे. नानाला आम्ही सांगितलंच नव्हतं. कारण तेव्हा सांगितलं असतं, तर मोठा राडा झाला असता. तो चिडला असता. आम्ही दुसऱ्या दिवशी नानाला सांगितलं. ते ऐकून नानाच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने प्रेस कॉन्फरन्स बोलावली. ती आपल्या मुलीच्या वयाची असल्याचं नानाने रडत सांगितलं. ती असं का बोलते, हे मलाच समजत नसल्याचं नाना म्हणाला.’

‘मुळात ही घटना घडल्याचा दावा ती करते, तेव्हा चारशे पाचशेचा मॉब उपस्थित होता. इतक्या जणांसमोर कोणी गैरवर्तन करेल का? नानाने तिच्या गालाला टच करता येईल, अशी स्टेप अॅड केल्याचा तिने केलेला दावाही खोटा आहे. त्यात, मनसेचा या घटनेशी मुळात काहीच संबंध नाही. जो नाना कधीच कोणाला घाबरला नाही, तो राज ठाकरेंना फोन करुन सांगेल का, की तुझे गुंड पाठव?’ आम्ही नंतर तिच्याशी संपर्क साधला. निर्मात्याने तिच्याविरोधात ‘सिन्टा’ या असोसिएशनमध्ये तक्रार केली. नुकसान मागितलं. त्या मीटिंगला ती आलीही होती. तिने आपली एकही फ्रेम वापरायची नाही, असं सांगत पाच लाख रुपये मागितले. आम्ही दिले.’ असं राकेश सारंग शेवटी म्हणाले. ‘एबीपी’न्यूजला दिलेल्या मुलाखतीत राकेश सारंग यांनी घडलेला प्रकार सांगितला होता.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट