अशा भोसलेंबाबतच्या या 5 अननोन गोष्टी माहीत आहे का? तिसरी गोष्ट सर्वांनाच अभिमान वाटणारी

Asha Bhosale : दिग्गज गायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर बॉलिवूड आणि संगीतविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आज सर्वत्र आशा ताईंच्या चर्चा सुरु आहेत. पण त्यांच्याबद्दल काही गोष्टी तुम्हाला देखील माहिती नसतील, तिसरी तर अत्यंत खास आहे.

अशा भोसलेंबाबतच्या या 5 अननोन गोष्टी माहीत आहे का? तिसरी गोष्ट सर्वांनाच अभिमान वाटणारी
| Updated on: Apr 13, 2026 | 2:13 PM

Asha Bhosale : अनेक भाषांमध्ये असंख्य गाणी गायणाऱ्या दिग्गज गायिका आशा भोसले आज आपल्यात नाही. पण कोणत्याच कलाकारचा कधीच अंत होत नसतो… एक कलाकार कायम त्याच्या कलेतून जिवंत असतो. त्याचप्रमाणे आशा ताई आज आपल्या नसल्या तरी त्यांचा आवाज कायम आपल्या सोबत राहिल… आशा ताईंना त्यांच्या करियरमध्ये अनेक इतिहास रसचे आणि अनेक रेकॉर्ड मोडले… आशा ताई फक्त संगीतातच नाही तर, उद्योग क्षेत्रात देखील पुढे होत्या… तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, त्यांच्या मालकीची एक भारतीय रेस्टॉरंट साखळीसुद्धा होती. आशा भोसले यांनी 2002 मध्ये दुबईमध्ये ‘आशाज’ नावाच्या उत्कृष्ट भारतीय रेस्टॉरंटची साखळी सुरू केली. आज ती जगभर पसरलेली आहे… तर जाणून घ्या आशा ताई यांच्याबद्दल माहिती नसलेल्या काही खास गोष्टी…

आशा भोसले यांच्याबद्दल काही फार कोणाला माहिती नसलेल्या गोष्टी

1. आशा भोसले यांनी रशियन आणि मलयसह 20 हून अधिक भाषांमध्ये गाणी गायली आहेत.

2. आशा भोसले यांच्याबद्दल असं देखील सांगितलं जातं की, त्या कायम त्यांच्या सिनेमाच्या टीमसाठी आणि मित्रांसाठी जेवण बनवायच्या… त्यांच्या संगीताप्रमाणेच, त्यांच्या स्वयंपाकाच्या कौशल्यासाठीही त्यांची मोठ्या प्रमाणावर प्रशंसा झाली.

3. उस्ताद अली अकबर खान यांच्यासोबत ‘लेगसी’ या अल्बममधील सहकार्याबद्दल त्यांना ग्रॅमी नामांकन मिळाले.

4. आशा भोसले पहिल्या भारतीय गायकांपैकी एक होत्या ज्यांनी पॉप आणि फ्यूजनसोबत वेगवेगळे प्रयोग केले…

5. आशा भोसले यांच्या आवाजाने भारताच्या सुरुवातीच्या जाहिरात विश्वावरही खोलवर प्रभाव टाकला.

जगभरात कुठे – कुठे आहेत आशा भोसले यांचे रेस्टोरेंट

‘आशा’ रेस्टॉरंट्सची पहिली शाखा 2002 मध्ये दुबईच्या वाफी सिटी मॉलमध्ये उघडली. आता या साखळीचा विस्तार दुबई, अबू धाबी, कुवेत, बहरीन, कतार, बर्मिंगहॅम आणि मँचेस्टरपर्यंत झाला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आशा भोसले यांची चर्चा सुरु आहे.

आशा भोसले यांचं निधन

मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे आशा ताई यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर मुंबई येथील ब्रिच कँडी रुग्णालायत उपचार सुरु होते. अखेर 12 एप्रिल रोजी त्यांच्या निधनाची बातमी समोर आली. 13 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येतील… अशी माहिती कुटुंबियांनी दिली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us