AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Drishyam 3 box office collection : बॉक्स ऑफिसवर ‘दृश्यम 3’ चीच हवा! ‘नई नवेली’ आणि ‘प्रहार’ मध्ये बॉक्स ऑफिसवर टिकण्यासाठी धडपड

अजय देवगणच्या 'दृश्यम ३' ने ३६५ कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवून बॉक्स ऑफिसवर आपले एकहाती वर्चस्व राखले आहे. नव्या चित्रपटांच्या स्पर्धेतही आपली पकड मजबूत ठेवली आहे. तर ललित प्रभाकरच्या 'प्रहार' चित्रपटाला आणि आदिनाथ कोठारेच्या 'नई नवेली' या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर टिकून राहण्यासाठी मोठी धडपड करावी लागत आहे.

Drishyam 3 box office collection :  बॉक्स ऑफिसवर 'दृश्यम 3' चीच हवा! 'नई नवेली' आणि 'प्रहार' मध्ये बॉक्स ऑफिसवर टिकण्यासाठी धडपड
PRAHAAAR BOX OFFICE COLLECTIONImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 25, 2026 | 7:59 PM
Share

बॉक्स ऑफिसवर सध्या चित्रपटांची चांगलीच स्पर्धा रंगली आहे. अजय देवगणच्या ‘दृश्यम 3’ ने आधीच दमदार कमाई करत प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. त्यात 16 ऑक्टोबरला विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदानाची ‘रणबाली’ यामी गौतमीची ‘नई नवेली’ आणि ललित प्रभाकरचा ‘प्रहार’ हे 3 चित्रपट प्रदर्शित झाले. आता या चित्रपटांच्या कमाईची तुलना सुरू असून कोणता चित्रपट किती गल्ला जमतोय, याची उत्सुकता लागली आहे.

दृश्यम 3 अजूनही शर्यतीत पुढे

अजय देवगणच्या ‘दृश्यम 3’ ने या नव्या चित्रपटांच्या स्पर्धेतही आपली पकड कायम ठेवली आहे. 24 ऑक्टोबरला चित्रपटाने अंदाजे 2.65 कोटी रूपयांची कमाई केली. भारतातील एकूण निव्वळ कमाई सुमारे 365.90 कोटी रूपयांवर पोहोचल्याचा अंदाज आहे.

ललित प्रभाकरच्या  ‘प्रहार’ ची कमाई पहिल्यापासून ढासळली

ललित प्रभाकर आणि राजकुमार राव यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘प्रहार’ या चित्रपटाची सुरूवात 2.35 कोटीने झाली होती. चित्रपटात सरकारी वकील ‘उज्वल निकम’ यांच्या आयुष्यावर आधारित खटल्यावर आधारित कथा दाखवण्यात आली आहे. 24 ऑक्टोबरला चित्रपटाने अंदाजे 1.15 कोटी कमावले. त्यानंतर भारतातील एकूण कमाई 18.90 कोटी झाली आहे.

आदिनाथ कोठारेच्या ‘नई नवेली’ ला कसा प्रतिसाद मिळतोय?

आदिनाथ कोठारे आणि  यामी गौतमच्या ‘नई नवेली’ या हॉरर – कॉमेडी चित्रपटाने पहिल्या दिवशी 3.25 कोटी रूपयांची कमाई केली होती. चित्रपटाच्या नवव्या दिवशी कमाईत मोठी घट झाल्याचं दिसलं. २४ ऑक्टोबरला चित्रपटाने अंदाजे 95 लाख रूपये कमावले. यासह भारतातील कमाई सुमारे 23.70 कोटी रूपये झाली आहे.

‘रणबाली’ ची कमाई किती?

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या ‘रणबाली’ने पहिल्या दिवशी 9.25 कोटी रूपयांची कमाई केली होती. चित्रपटाच्या 9 व्या दिवशी म्हणजे 24 ऑक्टोबरला या सिनेमाने अंदाजे 2.80 कोटी रूपये कमावल्याची माहिती समोर आली आहे. यासह भारतातील कमाई सुमारे 50.10 कोटी रूपयांवर पोहोचली आहे.

एकूण आकडे पाहता ‘दृश्यम 3’ ची कमाई इतर तीन चित्रपटांपेक्षा खूपच पुढे आहे. रणबाली नेही 50 कोटींचा टप्पा गाठला आहे, तर ‘नई नवेली’ आणि प्रहार बॉक्स ऑफिसवर टिकण्यासाठी गटांगळ्या खात आहेत. हे बॉक्स ऑफिसचे आकडे विविध ट्रेड रिपोर्ट्सवर आधारित अंदाज आहेत. अंतिम आकडे बदलू शकतात

Follow Us
PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी...
PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी केला राडा; म्हणाले, पंतप्रधान कुठेच जाणार नाही...
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त,
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त, नेमकं काय घडलं?
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे...
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे म्हणाले...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे उद्घाटन
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो;
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो; मोदींची उपस्थिती
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी...
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी... फायनान्स कपनीवर संशय
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ..
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ राज ठाकरेंच्या भेटीला
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार,
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत