Akriti Agarwal Prithvi Shaw: आयुष्य का बिघडवतेय… अभिनेत्याचा पृथ्वी शॉच्या Gfवर निशाणा
Akriti Agarwal Prithvi Shaw: गेल्या काही दिवसांपासून पृथ्वी शॉ आणि त्याची गर्लफ्रेंड आकृती अग्रवाल चांगलेच चर्चेत आहेत. आता एका अभिनेत्याने आकृतीवर निशाणा साधला आहे. तो नेमकं काय म्हणाला? जाणून घ्या...

अभिनेत्री आकृति अग्रवाल आणि क्रिकेटर पृथ्वी शॉ हे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहे. साखरपुडा झाल्यानंतर त्यांनी दोघांनी नाते तोडले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा ते एकत्र आल्याचे दिसत आहे. ते पाहून एका अभिनेत्याने आकृतीवर निशाणा साधला आहे. आता तो नेमकं काय म्हणाला जाणून घ्या…
आकृतीचा नवा म्युझिक व्हिडिओ ‘बरेली वाला झुमका’ रिलिज झाला आहे. या गाण्यात तिच्यासोबत अभिनेता अनिकेत राज दिस आहे. अलीकडेच या म्युझिक व्हिडिओचा भव्य प्रीमियर आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गाण्याच्या कास्ट-क्रूसोबतच इंडस्ट्रीतील काही दिग्गजही उपस्थित होते. मात्र हिरोइन या इव्हेंटला हजर राहिली नाही. आकृति अग्रवालची अनुपस्थिती स्पष्टपणे जाणवली. यामुळे अभिनेते एजाज खानने तिच्यावर टीका केली आहे.
गाण्याचा प्रमोशनल इव्हेंटला मिस केल्याबद्दल एजाजने आकृतिला चांगलेच सुनावले आहे. मीडियाशी बोलताना एजाज म्हणाला की, “नवीन लोकांना सपोर्ट करणे आवश्यक आहे. मी त्या मुलींना संदेश देऊ इच्छितो ज्या प्रोड्युसर्सकडून पैसेही घेतात, फाइव्ह स्टार ट्रीटमेंटही घेतात, कामासाठी भीकही मागतात… पण यादरम्यान जर त्यांचा बॉयफ्रेंड झाला तर प्रमोशनसाठी येत नाहीत. सोशल मीडियावर टाकलेले व्हिडिओही डिलीट करतात.”
एजाज खानने स्पष्ट केले की तो आकृति अग्रवाल यांच्याबद्दलच बोलत आहे. तो म्हणाले, “ती प्रमोशनमध्येही आली नाही, बॉयफ्रेंडच्या चक्करमध्ये… अशा प्रकारच्या मुलींना मी कडक शब्दांत सांगू इच्छितो की तुम्ही लोकांचे आयुष्य का बिघडवत आहात, एखादे गाणे का बिघडवत आहात. जर तुमचा बॉयफ्रेंड असेल तर त्याला घरी ठेवा. प्रोफेशनला राहा. आधी आपल्या कामाला प्राधान्य द्या. जे तुमच्यावर पैसे खर्च करतात, त्यांच्याशी असे वागू नका.”
दरम्यान, आकृती अग्रवाल यांनी अलीकडेच चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. क्रिकेटर पृथ्वी शॉसोबतचा साखरपुडा मोडल्यानंतर जोडप्याने पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. आकृती आणि पृथ्वी पुन्हा एक झाले आहेत. अभिनेत्रीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पृथ्वी शॉसोबतचा फोटो शेअर केला आहे. दोघे लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा आहे, मात्र अद्याप लग्नाची तारीख जाहीर झालेली नाही.
एजाज खान यांच्या टीकेनंतर आकृति अग्रवाल यांनी याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. मात्र सोशल मीडिया अॅक्टिव्हिटीवरून पृथ्वी शॉ यांच्यासोबतचे नाते पुन्हा रुळावर आल्याचे स्पष्ट होते. या प्रकरणाने म्युझिक व्हिडिओच्या प्रमोशनबाबत अभिनेत्रींच्या व्यावसायिक भूमिकेवर चर्चा सुरू झाली आहे.