मराठीतील असं भन्नाट रोमँटिक साँग, नुसते बोल ऐकले तरी होते पहिल्या प्रेमाची आठवण; वाटतं गाणं संपूच नये!
अनेकांना गाणी ऐकायचा छंद असतो. पण काही गाणी अशी असतात जी आपल्या काळजाच्या अत्यंत जवळ असतात. अशी गाणी आपण वारंवार पाहतो, फेव्हरेट लिस्टमध्येही टाकतो, असंच एक मराठी गाणं सध्या चर्चेत आहे.

जर तुम्हीली संगीतप्रेमी असाल, त्यातल्या त्यात जर तुम्ही मराठी गाण्यांचे चाहते असाल तर हे गाणे तुम्ही नक्कीच ऐकले असणार, मराठी चित्रपटातील हे गाण प्रचंड हिट असून गाण्यामध्ये मराठमोळा रोमान्स पाहायला मिळतो आहे. सैराट चित्रपटातील गाणी जशी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती आणि प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हीच गाणी वाजत होती. असंच हेही एक गाणं आहे. चला तर मग जाणून घेऊयात या गाण्याबद्दल…
‘एक फूल’ गाण्याची सोशल मीडियावर धूम
टीडीएम (TDM) या बहुचर्चित मराठी चित्रपटातील ‘एक फूल’ हेच ते रोमँटिक गाणे असून हे प्रेक्षकांच्या नेहमीच्या आवडीच्या गाण्यांच्या यादीतील एक गाणे आहेय. हे गाणे प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर आणि संगीत प्रेमींमध्ये वेगाने व्हायरल झाले होते. त्याला आजही प्रचंड पसंती मिळते. जवळपास तीन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या गाण्याला 42 मिलियन Views मिळाल्या आहेत.
ग्रामीण बाजातील रोमँटिक अंदाज
‘एक फूल’ या गाण्यातील अस्सल गावरान बाज आणि मनमोहक संगीत तरुणाईला विशेष भुरळ घालते. या गाण्यातील नायक आणि नायिकेचा सोज्वळ, रोमँटिक अंदाज प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरतो त्यामुळे 2026मध्येही या गाण्याला तितकचं प्रेम मिळतं.
नव्या जोडीची पडद्यावर एंट्री
दरम्यान, दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांच्या या चित्रपटातून पृथ्वीराज थोरात आणि कालिंदी निस्ताने या फ्रेश जोडीने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. या गाण्यातील दोघांची अप्रतिम केमिस्ट्री आणि साधेपणा चाहत्यांना आवडते. सोबतच या रोमँटिक गीताला सुप्रसिद्ध गायकांच्या सुमधुर आवाजाची आणि उत्तम संगीताची जोड मिळाली आहे. हे गाणे ओंकारस्वरूप आणि प्रियांका बर्वे यांनी गायले आहे. तर गीत डॉ.विनायक पवार यांनी लिहिलं आहे. या गाण्याची खासियत म्हणजे हे गाणे एकदा ऐकल्यावर पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटेल इतके श्रवणीय आणि आकर्षक झाले आहे.
गिताचे बोल
एक फूल वाहतो सखे
जवा तुला पाहतो सखे
नजरेचा जीवघेणा
हा खेळ ही नवा गं
गवताचं घर माझं
तू वादळी हवा गं
तुझ्या आडोशाला राहतो सखे
जवा तुला पाहतो सखे
एक फूल वाहतो सखे
जवा तुला पाहतो सखे
तू मळा अंगुराचा
मी लाकडी भुसा गं
तू शेरणी शिकारी
मी भाबडा ससा गं
तरी पैज लावतो सखे
जवा तुला पाहतो सखे
एक फूल वाहतो सखे
जवा तुला पाहतो सखे