AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lut Gaye | इमरान हाश्मीच्या गाण्याचा नवा रेकॉर्ड, अवघ्या 60 दिवसांत मिळाले 500 मिलिअनपेक्षा अधिक व्ह्यूज

बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi) बर्‍याच दिवसानंतर एका म्युझिक व्हिडीओमध्ये झळकला होता. या गाण्याचे नाव ‘लुट गये’ (Lut Gaye) असे आहे आणि हे गाणे झुबिन नौटियाल यांनी गायले आहे.

Lut Gaye | इमरान हाश्मीच्या गाण्याचा नवा रेकॉर्ड, अवघ्या 60 दिवसांत मिळाले 500 मिलिअनपेक्षा अधिक व्ह्यूज
इमरान हाश्मी
| Edited By: | Updated on: Apr 28, 2021 | 11:07 AM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi) बर्‍याच दिवसानंतर एका म्युझिक व्हिडीओमध्ये झळकला होता. या गाण्याचे नाव ‘लुट गये’ (Lut Gaye) असे आहे आणि हे गाणे झुबिन नौटियाल यांनी गायले आहे. हे गाणे रिलीज होताच बरेच नवे विक्रम नोंदवले गेले. आता या गाण्याचे नावावर आणखी एक रेकॉर्ड बनला आहे (Emraan Hashmi Starrer Lut Gaye set new record with 500 million views in just 60 days).

गाणे प्रदर्शित झाल्यानंतर काही तासातच ते चाहत्यांमध्ये खूप चर्चेत आले आणि चार्टबस्टर बनले. हे गाणे आता नवीन रेकॉर्ड सेट करत आहे. कारण टी-सिरीजच्या या गाण्याला रिलीजच्या अवघ्या 60 दिवसांत टी-सिरीजच्या यूट्यूब चॅनेलवर जलदगतीने 500 दशलक्ष व्हूज मिळवणारा हा पहिला रोमँटिक ट्रॅक ठरला आहे.

पाहा इमरान हाश्मीचे गाणे

मनोज मुंताशीर लिखित आणि तनिष्क बागची यांनी संगीतबद्ध केले असून, झुबिन नौटियाल यांच्या सुमधुर आवाजात रेकॉर्ड झालेल्या या गाण्यात विनय राधिकाने इमरान हाश्मीच्या समवेत मुख्य भूमिका साकारली होती. ‘लूट गये’ अलीकडेच मोठ्या संख्येने व्हूज मिळवत सर्वांच्या आवडत्या गाण्यांपैकी एक बनले आहे. गाण्याने 30 दिवसांत सर्व प्रवाहित प्लॅटफॉर्मवर 100 मिलिअन स्ट्रीम्स प्राप्त केले आहेत (Emraan Hashmi Starrer Lut Gaye set new record with 500 million views in just 60 days).

‘टी-सिरीज’च्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा!

अभिनेता इमरान हाश्मी संगीत निर्मात्यांसाठी नेहमीच भाग्यवान ठरला आहे. रोमँटिक ट्रॅक आणि संगीत वाद्यांचा संगम ही भूषण कुमारच्या भव्य यशाचे एक गुपित आहे. 60 दिवसात 500 दशलक्षाहून अधिक व्हूज मिळणारे ‘लूट गया’ हे सर्वांचे आवडते गाणे बनले आहे आणि यामुळे भूषण कुमारच्या ‘टी-सिरीज’च्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा खोवला गेला आहे.

‘चेहरे’ची प्रतीक्षा

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर इमरान हाश्मीचा चित्रपट ‘मुंबई सागा’ हा चित्रपट थोड्या दिवसांपूर्वी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता प्रत्येकजण इम्रान हाश्मीच्या आगामी ‘चेहरे’ या चित्रपटाची वाट पाहत आहेत. या चित्रपटामध्ये तो अमिताभ बच्चन आणि रिया चक्रवर्ती यांच्या सोबत दिसणार आहे. यापूर्वी हा चित्रपट 9l एप्रिलला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता पण आता त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. आत हा चित्रपट केव्हा आणि कुठे प्रदर्शित होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(Emraan Hashmi Starrer Lut Gaye set new record with 500 million views in just 60 days)

हेही वाचा :

Indian Idol 12 | क्वारंटाईन असलेल्या पवनदीपच्या आठवणीत अरुणिता व्याकूळ, म्हणाली ‘जेव्हा तो सोबत नव्हता…’

कोरोनामुक्त झालेल्या निक्की तंबोलीचा मोठा निर्णय, कोरोना रूग्णांसाठी करणार ‘अशी’ मदत!

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.