Top 5 News | ‘IFFM’मध्ये दाखवले जाणार मराठी चित्रपट ते ‘देवमाणूस’मधील ‘विजय’ने संपवले स्वतःचे आयुष्य, वाचा मनोरंजन विश्वातील घडामोडी

| Updated on: Aug 15, 2021 | 10:35 AM

जर तुम्ही शनिवार म्हणजेच 14 ऑगस्ट 2021च्या मनोरंजन विश्वाशी संबंधित बातम्या चुकवल्या असतील, तर तुम्ही त्या मनोरंजन टॉप 5 मध्ये वाचू शकता.

Top 5 News | ‘IFFM’मध्ये दाखवले जाणार मराठी चित्रपट ते ‘देवमाणूस’मधील ‘विजय’ने संपवले स्वतःचे आयुष्य, वाचा मनोरंजन विश्वातील घडामोडी
Top 5 News
Follow us on

मुंबई : दररोज मनोरंजन विश्वात काही छोट्या-मोठ्या बातम्या चर्चेत असतातच. चाहते त्यांच्या आवडत्या स्टार्सशी संबंधित बातम्या जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. मनोरंजन विश्वातील बातम्यांच्या दृष्टीनेही शनिवार खूप महत्त्वाचा होता. मात्र, जर तुम्ही शनिवार म्हणजेच 14 ऑगस्ट 2021च्या मनोरंजन विश्वाशी संबंधित बातम्या चुकवल्या असतील, तर तुम्ही त्या मनोरंजन टॉप 5 मध्ये वाचू शकता.

प्रादेशिक चित्रपटांचं व्यासपीठ, ‘इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न’मध्ये दाखवले जाणार धमाकेदार मराठी चित्रपट

‘इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न’ हे सिनेमाच्या माध्यमातून विविधता साजरी करण्यात नेहमीच अग्रेसर असतं आणि महोत्सवात दाखवले जाणारे चित्रपट या विचारसरणीचा दाखला देतात. ज्या इंडस्ट्रीमध्ये हिंदी सिनेमांची अनेकदा प्रशंसा केली जाते, याउलट IFFM नेहमीच उत्साही आणि भारतातील प्रादेशिक रत्ने सादर करण्याच्या हेतूसाठी वचनबद्ध आहे. या वर्षी, महोत्सवाकडून एक मराठी श्रेणी तयार केली आहे ज्यात वैशिष्ट्य आणि लघुपट दोन्हींचा समावेश आहे. प्रेक्षकांना पाहण्यासाठी काही चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केले जातील.

कारगिलमध्ये शहीद झालेल्या कॅप्टन विक्रम बत्राच्या शौर्याची कथा, वाचा कसा आहे ‘शेरशाह’ चित्रपट

आपल्या देशाचे सैन्य (India Army) हे नेहमी शांततेसाठी काम करतं आणि त्या शांततेचं रक्षण करण्यासाठी ते काय करू शकतात? असा प्रश्न कधी पडला असेल तर या प्रश्नाचे उत्तर शेरशाह (Shershaah) चित्रपट पाहिल्यावर कायमचे लक्षात राहिल. कॅप्टन विक्रम बत्राच्या भूमिकेत सिद्धार्थ मल्होत्रा ​​तुम्हाला हिमाचलच्या पालमपूरपासून कारगिलच्या टायगर हिलपर्यंत घेऊन जातो. त्याच्या शौर्याचा उत्साह पाहून, तुमच्या अंगावर शहारा येईल हे नक्की.

बहिणीच्या चित्रपटाच्या सेटवरच जुळलं रिया कपूरचं सूत

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरची धाकटी मुलगी रिया कपूर (Rhea Kapoor) नेहमीच तिच्या खास शैलीमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. रिया कदाचित अभिनय जगतापासून दूर असेल, पण ती निर्मिती क्षेत्रामध्ये नक्कीच कमाल करत आहे. सोनम कपूरची धाकटी बहीण रिया कपूर आता तिचा बॉयफ्रेंड करण बूलानी (Karan Boolani) याच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. रिया कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि स्वतःशी संबंधित अनेक पोस्ट शेअर करत असते. रिया एक चित्रपट निर्माती आहे आणि तिचा स्वतःचा फॅशन ब्रँड देखील चालवते. रिया अनेकदा करणसोबत रोमँटिक फोटो शेअर करत असते.

पत्नी वियोगाचं दुःख सहन होईना, ‘देवमाणूस’मधील ‘विजय’ने संपवले स्वतःचे आयुष्य!

‘देवमाणूस’ (Devmanus) ही मालिका सध्या एका निर्णायक टप्प्यावर आली आहे. या मलिकेत आता रेश्माचा मृतदेह अर्थात सांगाडा वाड्याच्या अंगणात सापडला आहे. रेश्मा ही मालिकेत पतपेढीचा मालक दाखवलेला विजय याची पत्नी असते. घर सोडून निघून गेलेल्या पत्नीला शोधत तो वणवण भटकत असतो. मात्र, आता आपल्या पत्नीच्या मृत्यची बातमी ऐकून तो सैरभैर झाल आहे. यामुळे त्याने थेट टोकाचा निर्णय घेत आपलं आयुष्यच संपवलं आहे. पत्नीच्या मृत्युच्या बातमीने खचून गेलेला विजय भरपूर दारू पिऊन बज्या आणि नाम्याला भेटायला जातो. यावेळी ती आपलं मन हलकं करतो. अगदी शेवटच्या प्रवासाला निघाल्यासारखा तो सर्वांशी बोलतो. मात्र, तो आत्महत्या करेल हा विचार कुणाच्याही मनात येत नाही. यानंतर तो गावातील नदीवर जाऊन तिथे उडी घेत आपलं आयुष्य संपवतो. या दुःखद घटनेमुळे संपूर्ण गावाला धक्का बसला आहे.

बहुप्रतीक्षित ‘भुज द प्राईड ऑफ इंडिया’ प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या कसा आहे हा चित्रपट…

‘भुज : द प्राईड ऑफ इंडिया’ची कथा 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे. ज्यामध्ये त्या वेळी भुज विमानतळाचे प्रभारी असलेले आयएएफ स्कॅड्रॉन लीडर विजय कर्णिक यांनी 300 स्थानिक महिलांच्या मदतीने एअरबेसची पुनर्बांधणी केली होती. 1971 मध्ये पाकिस्तानने ऑपरेशन चंगेज खान सुरू केले. पाकिस्तानने 14 दिवसात भुज विमानतळावर 35 वेळा 92 बॉम्ब आणि 22 रॉकेटने हल्ला केला होता. युद्धाच्या वेळी शत्रूने हवाई तळ नष्ट केले. त्यानंतर विजय, जवळच्या माधापूर गावातील 300 महिलांसह, भारतीय हवाई दलाचे विमान उतरू शकेल म्हणून एक हवाई तळ तयार केला होता. या चित्रपटात हवाई दलाची शक्ती आणि पराक्रम दाखवण्यात येणार आहे.

हेही वाचा :

Janhvi Kapoor : गोल्डन लेहेंगा आणि दिलकश अंदाज, जान्हवी कपूरचे हे फोटो पाहिलेत?

एक-दोन नव्हे तर चार वेळा बांधली लग्नगाठ, पद्मश्री पुरस्कारासाठी निवड झाली होताच उडाला गोंधळ!