Rhea Kapoor Karan Boolani Wedding | बहिणीच्या चित्रपटाच्या सेटवरच जुळलं रिया कपूरचं सूत, 2013मध्ये करणार होती लग्न, पण…

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 14, 2021 | 12:02 PM

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरची धाकटी मुलगी रिया कपूर (Rhea Kapoor) नेहमीच तिच्या खास शैलीमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. रिया कदाचित अभिनय जगतापासून दूर असेल, पण ती निर्मिती क्षेत्रामध्ये नक्कीच कमाल करत आहे.

Rhea Kapoor Karan Boolani Wedding | बहिणीच्या चित्रपटाच्या सेटवरच जुळलं रिया कपूरचं सूत, 2013मध्ये करणार होती लग्न, पण...
रिया-करण
Follow us

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरची धाकटी मुलगी रिया कपूर (Rhea Kapoor) नेहमीच तिच्या खास शैलीमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. रिया कदाचित अभिनय जगतापासून दूर असेल, पण ती निर्मिती क्षेत्रामध्ये नक्कीच कमाल करत आहे. सोनम कपूरची धाकटी बहीण रिया कपूर आता तिचा बॉयफ्रेंड करण बूलानी (Karan Boolani) याच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे.

रिया कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि स्वतःशी संबंधित अनेक पोस्ट शेअर करत असते. रिया एक चित्रपट निर्माती आहे आणि तिचा स्वतःचा फॅशन ब्रँड देखील चालवते. रिया अनेकदा करणसोबत रोमँटिक फोटो शेअर करत असते.

वर्षानुवर्षे चालली डेटिंग

रियाचे नाव बऱ्याच काळापासून करण बूलानीशी जोडलेले आहे. मात्र, जसे दोघांनी त्यांचे नाते लपवले नाही, तसे दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल काहीही सांगितले देखील नाही. ही जोडी बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत आणि अनेकदा सोशल मीडियावर एकत्र फोटो शेअर करतात आणि जाहीरपणे एकमेकांवरील प्रेम व्यक्त करतात.

कशी सुरू झाली प्रेमकथा?

2010मध्ये ‘आयशा’ चित्रपटाच्या सेटवर रियाची करणशी पहिली भेट झाली. या चित्रपटात सोनम कपूर आणि अभय देओल मुख्य भूमिकेत होते. विशेष गोष्ट म्हणजे या चित्रपटाची निर्मिती रिया कपूर हिनेच केली होती आणि करण या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक होता. या चित्रपटादरम्यान दोघांची मैत्री झाली, जी हळूहळू प्रेमात बदलली.

सोनमने केली नात्याची पुष्टी

सोनम कपूरने स्वतः एकदा झूमला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, रिया करण बूलानीला डेट करत आहे. ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सोनमने एका मुलाखतीत सांगितले होते की, ते गेल्या 10 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांचे लग्न होईल तेव्हा त्यांची माहिती दिली जाईल.

सोनमच्या आधी होणार होते लग्न!

विशेष गोष्ट अशी की, 2013 मध्ये रिया आणि करण लग्न करणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. हा तो काळ होता जेव्हा सोनम कपूरचे लग्न झाले नव्हते. मीडिया रिपोर्टनुसार, करणचे आईवडील विशेषतः कपूर कुटुंबाला भेटण्यासाठी दिल्लीहून मुंबईला आले होते, एवढेच नव्हे तर डिसेंबर 2013मध्ये दोघेही लग्न करणार होते. पण काही वैयक्तिक कारणांमुळे दोघांचेही त्यावेळी लग्न होऊ शकले नाही.

कोण आहे करण बूलानी?

रियाच्या प्रेमात बुडालेले करण बूलानी एक दिग्दर्शक आणि निर्माता आहेत. करणने आपल्या करिअरची सुरुवात जाहिरातीतून केली. असे म्हटले जाते की, वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी त्यांनी 500 जाहिरातींची निर्मिती केली होती.

हेही वाचा :

‘कैसे हो देवी और सज्जनो…’ पुन्हा एकदा कानी पडणार, ‘या’ दिवशी KBC प्रेक्षकांच्या भेटीला येणार!

पहिल्या पत्नीच्या निधनानंतर कोलमडून गेले शम्मी कपूर, दुसरे लग्न करण्यापूर्वी घातली ‘ही’ अट!

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI