AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shammi Kapoor Death Anniversary | पहिल्या पत्नीच्या निधनानंतर कोलमडून गेले शम्मी कपूर, दुसरे लग्न करण्यापूर्वी घातली ‘ही’ अट!

जेव्हाही अभिनेता शम्मी कपूरचे (Shammi Kapoor) नाव घेतले जाते, तेव्हा ‘कोई मुझे जंगली कहे... याहू’ हे गाणे आठवते. शम्मी कपूर आज या जगात नाहीयत, पण त्यांचे चित्रपट आणि त्यांनी साकारलेली पात्रे आजही प्रत्येकाच्या हृदयात आहेत.

Shammi Kapoor Death Anniversary | पहिल्या पत्नीच्या निधनानंतर कोलमडून गेले शम्मी कपूर, दुसरे लग्न करण्यापूर्वी घातली ‘ही’ अट!
शम्मी कपूर
| Edited By: | Updated on: Aug 14, 2021 | 11:12 AM
Share

मुंबई : जेव्हाही अभिनेता शम्मी कपूरचे (Shammi Kapoor) नाव घेतले जाते, तेव्हा ‘कोई मुझे जंगली कहे… याहू’ हे गाणे आठवते. शम्मी कपूर आज या जगात नाहीयत, पण त्यांचे चित्रपट आणि त्यांनी साकारलेली पात्रे आजही प्रत्येकाच्या हृदयात आहेत. शम्मी शेवट रणबीर कपूरच्या ‘रॉकस्टार’ या चित्रपटात दिसले होते, तर 14 ऑगस्ट 2011 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शम्मी कपूर यांचे गीता बालीवर खूप प्रेम होते. एवढेच नाही तर शम्मीने गीताशी लग्न करण्यासाठी भरपूर मेहनतही केली होती.

बीबीसीच्या रिपोर्टनुसार, शम्मी कपूर ‘रंगीन रातें’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान गीताच्या प्रेमात पडले होते आणि त्यांनी अभिनेत्रीला प्रपोज केले होते. पण, गीताने लग्नाला नकार दिला. पण मग जेव्हा गीताला प्रेमाची जाणीव झाली तेव्हा तिने शम्मीला सांगितले की, ती लगेचच त्याच्याशी लग्न करेल,  नाहीतर ती कधीही लग्न करणारच नाही. यानंतर दोघांनीही तत्काळ मंदिरात जाऊन लग्न केले. एवढेच नाही, गीताकडे सिंदूर नव्हते, म्हणून तिने शम्मी कपूरला लिपस्टिक दिली आणि शम्मीने गीताला सिंदूर ऐवजी लिपस्टिक लावली. गीता आणि शम्मी यांनी ऑगस्ट 1955 मध्ये लग्न केले.

शम्मी आणि गीताला 2 मुले होती. दोघेही काही वर्षे एकमेकांसोबत राहिले. त्यानंतर लग्नाच्या 10 वर्षानंतर गीताला ‘स्मॉल पॉक्स’ झाला आणि 1965 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. गीताच्या मृत्यूनंतर शम्मी कपूर खूप खचले होते आणि यामुळे त्यांच्या वैयक्तिक-व्यावसायिक जीवनावर परिणाम होऊ लागला.

कुटुंबाने पुन्हा लग्न करण्यास सुचवले!

शम्मीची अवस्था पाहून कुटुंबाने त्यांना पुन्हा लग्न करण्यास सांगितले आणि त्यांनी नीला देवीला आपली पत्नी बनवण्यास सहमती दर्शवली. पण त्यांनी लग्नापूर्वी नीलासमोर एक अट ठेवली होती. शम्मीने नीलाला सांगितले होते की, तिला लग्नानंतर मूल होऊ देणार नाही आणि आई म्हणून दोन्ही मुलांची काळजी घेईल. नीलाने शम्मीची ही अट मान्य केली आणि लग्नानंतर नीलाने फक्त शम्मीचीच नाही तर मुलांची सुद्धा पूर्ण काळजी घेतली.

नीला आणि शम्मीच्या लग्नानंतर लोकांनी अनेक कमेंट केल्या होत्या की, हे लग्न 2 महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकणार नाही, पण नीलाने त्यांना आव्हान दिले आणि त्या आयुष्यभर शम्मीसोबत राहिल्या. नीला म्हणाली होती, लग्नानंतर मी माझ्या आई-वडिलांच्या घरी एक रात्रही राहिले नाही आणि शम्मीजींना कधीही एकटे सोडले नाही.

हेही वाचा :

Mouni Roy : शॉर्ट ब्लॅक ड्रेसमध्ये दिसला मौनी रॉयचा कातिलाना अंदाज, फोटो पाहाच

Amruta Khanvilkar : तुम्हाला अमृता खानविलकर सारखं स्लिमट्रीम व्हायचंय?, अमृताची लाईफस्टाईल आता यूट्यूबवर

रस्त्यावर पेन विकणारा 7वी पास मुलगा पुढे बॉलिवूडचा ‘कॉमेडी किंग’ बनला!

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.