AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : हा उपाय आहे खूपच चमत्कारीक, नशीबच बदलून जाईल, तांदळाच्या डब्यात लपवा फक्त ही एक वस्तू

तुमच्या घरात जेव्हा नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये समस्या निर्माण होण्यास सुरुवात होतात, आर्थिक समस्या येतात, आरोग्याच्या तक्रारी जाणवू लागतात. ही नकरात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत.

Vastu Shastra : हा उपाय आहे खूपच चमत्कारीक, नशीबच बदलून जाईल, तांदळाच्या डब्यात लपवा फक्त ही एक वस्तू
vastu shastra Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 15, 2026 | 9:57 PM
Share

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमच्या घराची रचना कशी असावी? घरात तुम्ही ज्या वस्तू ठेवता त्यांची योग्य दिशा कोणती? घरामध्ये नकारात्मक ऊर्जा कशामुळे तयार होते, जर घरात नकारात्मक ऊर्जा तयार झाली असेल तर ती दूर करण्यासाठी काय उपाय आहेत? अशा विविध प्रश्नांवर मार्गदर्शन करण्यात आलं आहे. अनेकदा आपण आयुष्यात खूप कष्ट करतो, मात्र तरी देखील अपेक्षित यश मिळत नाही, प्रचंड पैसा कमावला तरी देखील तो हातात टिकत नाही. खर्च वाढतच जातो, अशा स्थितीमध्ये काय करावं? याबद्दल देखील वास्तुशास्त्रामध्ये मार्गदर्शन करण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रानुसार जे लोक श्रीमंत असतात त्यांच्या घरी तुम्हाला चार वस्तू या कायम पहायला मिळतात. ज्यामध्ये वाहत्या पाण्याचा फोटो, मनी प्लांट, लाफिंग बुद्धा, आणि तांदळाने भरलेला डबा, या वस्तूंचा समावेश होतो. आज आपण तांदळाने भरलेल्या डब्या संबंधित एक सोपा उपाय जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुमच्या घरात कधीही पैशांची कमी भासणार नाही.

वास्तुशास्त्रामध्ये तांदळाला ऊर्जा आणि समृद्धीचं प्रतिक मानण्यात आलं आहे. ज्या घरामध्ये तांदळाचा डबा हा नेहमी भरलेला राहतो त्या घरात सदैव सकारात्मक ऊर्जा राहते, असं घर नेहमी पैशांनी भरलेले राहतं, कधीही आर्थिक समस्या जाणवत नाहीत, अशी मान्यता आहे. वास्तुशास्त्रानुसार तुम्ही जर तांदळाच्या डब्यामध्ये काही नाणी अथवा हळकुंड लपवून ठेवले तर तुमच्यावर सदैव लक्ष्मी मातेची कृपा राहते. त्यासाठी एक ते दोन चांदीची नाणी लाल कापडामध्ये गुंडाळा आणि तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये ठेवा, किंवा मग हळकुंड घ्या आणि ते तांदळाच्या डब्यामध्ये लपून ठेवा, असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे.

एवढं नाही तर घरात आर्थिक बरकत येण्यासाठी आणखी एक सोपा उपाय आहे, तो म्हणजे तुम्ही तुमच्या घराच्या उत्तर दिशेला धनाची देवता कुबेर यांचा फोटो लावू शकता. उत्तर दिशा ही कुबेर यांची आवडती दिशा आहे. उत्तर दिशेला कुबेराचा फोटो लावल्यास घराला आर्थिक स्थैर्य प्राप्त होते, अंस वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं.
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान.
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा.
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी.
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका.
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!.
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक.
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका.
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका.
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक.