‘कैसे हो देवी और सज्जनो…’ पुन्हा एकदा कानी पडणार, ‘या’ दिवशी KBC प्रेक्षकांच्या भेटीला येणार!

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध टीव्ही रिअॅलिटी शो 'कौन बनेगा करोडपती' (KBC 13) च्या प्रत्येक नवीन सीझनची चाहते आतुरतेनं वाट पाहत असतात. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा ‘कौंन बनेगा करोडपती’ हा शो चाहत्यांसाठी सज्ज झाला आहे.

‘कैसे हो देवी और सज्जनो...’ पुन्हा एकदा कानी पडणार, ‘या’ दिवशी KBC प्रेक्षकांच्या भेटीला येणार!
KBC 13

मुंबई : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध टीव्ही रिअॅलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती’ (KBC 13) च्या प्रत्येक नवीन सीझनची चाहते आतुरतेनं वाट पाहत असतात. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा ‘कौंन बनेगा करोडपती’ हा शो चाहत्यांसाठी सज्ज झाला आहे. केबीसीच्या 13 व्या हंगामाची प्रतीक्षा संपली आहे. या शोची ऑडिशन फेरी पूर्ण झाली असून आता शोच्या निर्मात्यांनी त्याचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.

नेहमी प्रमाणे, यावेळी देखील, कौन बनेगा करोडपतीचा 13 वा सीझन मेगास्टार अमिताभ बच्चन होस्ट करताना दिसणार आहेत. अमिताभ बच्चन यांच्या होस्टिंगमुळे शो नेहमीच आकर्षक बनतो.

कधी सुरु होणार?

चाहत्यांचा आवडता शो ‘कौन बनेगा करोडपती 13’ (KBC) या महिन्याच्या शेवटी सुरू होणार आहे. केबीसी 23 ऑगस्ट 2021 पासून सोनी टीव्हीवर प्रसारित होईल. सोनीच्या वतीनं ट्विट करून याबाबत अधिकृत माहिती शेअर करण्यात आली आहे.

नेहमीप्रमाणे या वर्षीही केबीसी आठवड्यात पाच दिवस म्हणजे सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता प्रसारित होईल. सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजननं आपल्या सोशल मीडिया हँडलवर प्रोमो शेअर करून संपूर्ण वेळापत्रक शेअर केले आहे.

खास प्रोमो :

शोचे प्रोमो यावेळी खास पद्धतीने सादर करण्यात आले आहेत. यावेळी प्रोमोमध्ये एक कथा सादर करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, शो प्रसारित होण्यापूर्वीच, ते प्रोमोद्वारे कव्हर केलं गेलं आहे.

‘बिग बी’ म्हणाले ‘कमिंग बॅक’

अलीकडेच अमिताभ बच्चन यांनी केबीसी 13 चा प्रोमो सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ प्रोमो दोन भागांमध्ये रिलीज झाला आहे. ज्यापैकी फक्त पहिला भाग आता प्रदर्शित केला गेला आहे आणि लवकरच दुसरा भाग देखील शेअर केला जाईल.

‘बिग बीं’नी सोमवारी त्यांच्या इंस्टाग्रामवर कौन बनेगा करोडपती अर्थात KBC चा प्रोमो शेअर केला आणि सांगितले की, याचा 13वा सीझन लवकरच येणार आहे. प्रोमो शेअर करताना अमिताभ बच्चन यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘कमिंग बॅक .. ऑन केबीसी.’ त्यांनी पुढे लिहिले की, या प्रोमोचा भाग दोन लवकरच येत आहे.

कौन बनेगा करोडपती हा क्विझवर आधारित शो आहे, या शोमध्ये देशाच्या विविध भागांतील स्पर्धकांची निवड त्यांच्या ज्ञानाच्या आधारावर केली जाते. त्यानंतर हे स्पर्धक हॉटसीटवर अमिताभ बच्चन यांच्यासमोर गेम खेळतात. या शोमध्ये अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या सर्व योग्य प्रश्नांची उत्तरे दिल्यास स्पर्धक 7 कोटींपर्यंतची रक्कम जिंकू शकतात. गेल्या हंगामात, चार लोक करोडपती झाले होते.

हेही वाचा :

पहिल्या पत्नीच्या निधनानंतर कोलमडून गेले शम्मी कपूर, दुसरे लग्न करण्यापूर्वी घातली ‘ही’ अट!

फ्लॉप चित्रपटांना वैतागून इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय, सलमानने हात दिला नि सावरलं मोहनीशचं करिअर!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI