Happy Birthday Mohnish Bahl | फ्लॉप चित्रपटांना वैतागून इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय, सलमानने हात दिला नि सावरलं मोहनीशचं करिअर!

बॉलिवूडच्या दुनियेत कोण फ्लॉप होईल आणि कोणाचे नशीब चमकेल, हे कोणालाच ठाऊक नाही. मेहनतीबरोबरच या विश्वात टिकून राहण्यासाठी नशीबाची साथ देखील खूप महत्वाची आहे. अशीच काहीशी गोष्ट आहे अभिनेता मोहनीश बहल (Mohnish Bahl) याची...

Happy Birthday Mohnish Bahl | फ्लॉप चित्रपटांना वैतागून इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय, सलमानने हात दिला नि सावरलं मोहनीशचं करिअर!
मोहनीश बहल
Follow us
| Updated on: Aug 14, 2021 | 8:14 AM

मुंबई : बॉलिवूडच्या दुनियेत कोण फ्लॉप होईल आणि कोणाचे नशीब चमकेल, हे कोणालाच ठाऊक नाही. मेहनतीबरोबरच या विश्वात टिकून राहण्यासाठी नशीबाची साथ देखील खूप महत्वाची आहे. अशीच काहीशी गोष्ट आहे अभिनेता मोहनीश बहल (Mohnish Bahl) याची, ज्याने एके काळी सततच्या अपयशांमुळे खचून बॉलिवूड इंडस्ट्री सोडण्याचे मनाशी पक्के केले होते. मात्र, त्याचा काळ अचानक बदलला आणि एका चित्रपटाने त्याचे नशीब पालटले.

अभिनेता मोहनीश बहल यांनी 1983च्या ‘बेकारार’ चित्रपटातून सहाय्यक अभिनेता म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. चित्रपट सुपर फ्लॉप झाला आणि मोहनीशच्या कारकिर्दीला ग्रहणच लागले. यानंतर त्याने अनेक चित्रपट केले, पण सर्व चित्रपट फ्लॉप ठरले. सततच्या अपयशांमुळे मोहनीशला असे वाटू लागले की, त्याला आता इंडस्ट्रीमध्ये काम मिळणार नाही आणि त्याचे चित्रपटही हिट होणार नाहीत. अशा परिस्थितीत त्याने मनोरंजन विश्व सोडण्याचा विचार करून, वैमानिक होण्याची तयारी सुरू केली.

एका भूमिकेने करिअरची दिशाच बदलली!

तथापि, मोहनीशसाठी नशिबाच्या मनात काहीतरी वेगळेच होते. अपयशाच्या काळात त्याची भेट सलमान खानशी झाली. ते दोघेही चांगले मित्र झाले. त्यावेळी सलमान स्वत: देखील बॉलिवूडमध्ये काम स्थिरावण्याचा प्रयत्न करत होता. अशा परिस्थितीत जेव्हा त्याला ‘मैने प्यार किया’ मधून ब्रेक मिळाला, तेव्हा त्याने खलनायकाच्या भूमिकेसाठी मोहनीश बहलच्या नावाची शिफारस केली. मोहनीश चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत होता. हा चित्रपट जबरदस्त हिट ठरला आणि त्याबरोबर मोहनीशच्या नशिबाचे तारेही चमकले. त्याचे पात्र लोकांना चांगलेच आवडले आणि त्याची कारकीर्दही उंचावू लागली

‘हम साथ साथ है’ने उंचावली कारकीर्द

यानंतर मोहनीशने आणखी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. मोहनीशने ‘हम साथ-साथ हैं’ चित्रपटात सकारात्मक भूमिका साकारली आणि हा चित्रपटही सुपरहिट ठरला. या चित्रपटाद्वारे मोहनीशने जगासमोर स्वतःला सिद्ध केले की, तो सर्व प्रकारची पात्रं साकारू शकतो. या चित्रपटांव्यतिरिक्त, मोहनीशने ‘हम आपके हैं कौन’, ‘राजा हिंदुस्तानी’, ‘कहो ना प्यार है’, ‘शादी कर फंस गया यार’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करून प्रसिद्धी मिळवली.

छोट्या पडद्यावरही दिसली जादू

चित्रपटांव्यतिरिक्त, मोहनीशने टीव्हीवरही काम केले आणि तिथेही त्याच्या अभिनयाची चाहत्यांनी खूप प्रशंसा केली. टीव्ही शो ‘संजीवनी’ मध्ये मोहनीश डॉक्टर म्हणून दिसला होता, त्यानंतर ‘दिल मिल गये’ मधील त्याच्या व्यक्तिरेखेला चांगला प्रतिसाद मिळाला. मोहनीश बहल अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये सहाय्यक पात्र साकारताना दिसला आहे. तो शेवट ‘पानीपत’ या चित्रपटात दिसला होता.

हेही वाचा :

स्वीटूला बघायला पुन्हा एकदा मुलाकडची मंडळी येणार, आता तरी मुलगी पसंत पडणार?

मालदीवमध्ये धमाल करताना सना खान पडली पाण्यात, नवऱ्याची रिअ‍ॅक्शन पाहून तुम्हालाही येईल हसू

‘शुक्रिया’ ते ‘पोस्ट कामगार’… साजन शिंदेंच्या माहीत नसलेल्या ‘या’ गोष्टी वाचाच

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.