AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हॉटेल व्यावसायिकांवर महासंकट; ती लपवाछपवी उघड, इनकम टॅक्स…दणाणले धाबे

Income Tax Raid: हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांना आखाती देशातील युद्धाच्या झळा बसत आहेत. केंद्र सरकारने घरगुती गॅसचा पुरवठा विस्कळीत होऊ नये यासाठी आदेश दिले आहे. त्याचा व्यावसायिक गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम दिसून येत आहे. त्यातच अजून एक मोठी कारवाई झाली आहे. काय आहे अपडेट?

हॉटेल व्यावसायिकांवर महासंकट; ती लपवाछपवी उघड, इनकम टॅक्स...दणाणले धाबे
आयकर खात्याचे छापेImage Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
| Updated on: Mar 10, 2026 | 2:03 PM
Share

Income Tax Raid: देशातील अनेक हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिक आयकर खात्याच्या रडारवर आले आहेत. आयकर चोरीचा मोठा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 22 राज्यातील 46 शहरांमधील 62 रेस्टॉरंटवर संपूर्ण देशात सर्व्हे करण्यात आला. सुरुवाती तपासात जवळपास 408 कोटींची अन्नपदार्थांची विक्री लपवल्याचे उघड झाले आहे. हैदराबाद येथील एका बिर्याणी साखळी पुरवठा व्यावसायिकाची चौकशी करण्यात आली. हे चेन व्यवसाय 46 शहरांपर्यंत पोहचला आहे. सरकारने SAKSHAM NUDGE अभियानातंर्गत करदात्यांना त्यांच्या चुका सुधारण्याचा सल्ला दिला आहे. त्यांना अपडेटेड रिटर्न फाईल करण्यास सांगितले आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 63 हजार रेस्टोरेंटला ईमेल पाठवण्यात आला आहे. त्यांना 31 मार्चपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे.

CBDT ने म्हटलं काय?

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने (CBDT) याविषयची माहिती दिली. त्यानुसार, आयकर खात्याने कर चोरीच्या आरोप असलेल्या रेस्टॉरंटचा सर्व्हे केला. त्यात त्यांनी 408 कोटींची विक्री लपवल्याचे समोर आले. आता सीबीडीटी अशा 63,000 आऊटलेट्सला ईमेल आणि मॅसेज पाठवत आहे. त्यात त्यांना या 31 मार्चपर्यंत आयकर रिटर्न अद्यायावत करण्यास सांगण्यात आले आहे.

CBDT नुसार, 22 राज्यातील 46 शहरांमधील 62 रेस्टॉरंचा सर्व्हे पूर्ण करण्यात आला. सुरुवाती तपासात जवळपास 408 कोटी अन्नपदार्थांची विक्री लपवल्याचे उघड झाले. आयकर अधिकार्‍यांनी नोव्हेंबर 2025 मध्ये फूड आणि बिव्हरेज क्षेत्रात तपास सुरू केला होता. या दरम्यान हे समोर आले की, रेस्टॉरंट मालक विक्रीचा आकडा गायब करत आहेत.

कसा झाला खुलासा?

आयकर विभागाने नोव्हेंबर 2025 मध्ये हैदराबादमधील पिस्ता हाऊस, शाह गौस आणि महफिल यासारख्या लोकप्रिय बिर्याणी रेस्टॉरंट चेनवर छापेमारी केली होती. ही कारवाई आऊटलेट्स, कॉर्पोरेट्स कार्यालय, सॉफ्टवेअर पुरवठादार कंपन्या आणि मालकांच्या ठिकाण्यावर एकदाच करण्यात आली. या प्रतिष्ठानांकडून 20 कोटी रुपयांची रोख, मोठ्या प्रमाणात सोने आणि अचल संपत्ती जप्त करण्यात आली.

मग मोठा भांडाफोड

तपासाचा परीघ तेव्हा वाढवण्यात आला, जेव्हा अधिकाऱ्यांच्या तपासात मोठे घबाड सापडले. या रेस्टॉरंटला ज्या कंपन्यांनी बिलिंग सॉफ्टवेअर पुरवले होते. त्यात आकडेवारी लपवण्याची व्यवस्था केल्याचे समोर आले. आर्थिक वर्ष 2019-20 पासूनच आकडेवारी लपवण्याचा खेळ सुरू करण्यात आला होता. सॉफ्टवेअरच्या लॉग्समध्येच जवळपास 13,317 कोटी रुपयांच्या एंट्री डिलिट झाल्याचा रेकॉर्ड मिळाल्याने केंद्र सरकारने हादरले. आंध्र प्रदेश आणि तेलंगणात तर सुरुवातीलाच 5,141 कोटींची विक्री लपवल्याचे उघड झाले. तर बिर्याणी चेन रेस्टॉरंटने बिलिंग सॉफ्टवेअरमध्ये गडबड करून 70,000 कोटींची विक्री लपवल्याचे समोर आले.

कुठे कुठे टाकला छापा?

8 मार्च रोजी आयकर विभागाने शिमला, मुरथल, चंदीगड, लुधियाना, गोध्रा, अहमदाबाद, कोल्लम, कोच्ची, मदुराई, गुवाहाटी, दिल्ली, गुरूग्राम, मुंबई, चेन्नई, कोलकत्ता सह 46 शहर, 22 राज्यातील 62 रेस्टॉरंटविरोधात कारवाईचा बडगा उगारला. IT कायद्याच्या नियम 133A अंतर्गत ही प्रक्रिया करण्यात आली.

Follow Us
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या  भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप!
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
विरोधी पक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड चर्चा; 45 मिनीटे... काय घडलं?
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला महत्त्वाचा आदेश, आता...
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना पवरांनी दिली मोठी..
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना दिली मोठी जबाबदारी, स्वतःच म्हणाले...
पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील
Pune Water Cut | पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील; महापालिकेची मोठी घोषणा काय?
4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?
Sachin Sawant | 4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?; उज्ज्वला योजनेवरून काँग्रेसचा संताप
लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केल
Video | लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केलेल्या विधानाची राज्यात मोठी चर्चा!
धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच!
Dahanu | धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच! साखरे गावाचा पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच वेधलं लक्ष