AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘शुक्रिया’ ते ‘पोस्ट कामगार’… साजन शिंदेंच्या माहीत नसलेल्या ‘या’ गोष्टी वाचाच

गायक, गीतकार साजन शिंदे यांनी स्वत:ला एकाच चौकटीत अडकवून ठेवलं नाही. गीते लिहितानाच त्यांनी आपला मोर्चा काव्य क्षेत्राकडे वळवला. (sajan shinde)

'शुक्रिया' ते 'पोस्ट कामगार'... साजन शिंदेंच्या माहीत नसलेल्या 'या' गोष्टी वाचाच
bheem geete
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Aug 12, 2021 | 8:51 AM
Share

मुंबई: गायक, गीतकार साजन शिंदे यांनी स्वत:ला एकाच चौकटीत अडकवून ठेवलं नाही. गीते लिहितानाच त्यांनी आपला मोर्चा काव्य क्षेत्राकडे वळवला. काव्याचे सौंदर्यशास्त्र समजून घेतलं. त्यानंतर त्यांना गझल प्रकार आवडू लागल्याने त्यांनी गझलेची बाराखडी शिकून घेतली आणि उत्तमोत्तम गझला लिहिल्या. बरं ते एवढ्यावरच थांबतील तर साजन शिंदे कसले. त्यांनी नंतर आपला मोर्चा ऊर्दू शिकण्याकडे वळवला आणि त्यात ते पारंगतही झाले. हे कसं घडलं? त्याचाच हा किस्सा. (unknown stories of lyricists sajan shinde)

मेहरसाहेबांची मेहरबानी

ऊर्दूचे प्रसिद्ध शायर अब्दूल लतीफ मेहर हे इस्लामपुरा मदरसा येथील मुख्याध्यापक होते. मशिदीलगतच साजन शिंदे यांचं घर असल्याने नमाजाकरिता आलेल्या मेहर साहेबांच्या कानावर साजन यांच्या रियाजाचे स्वर पडत असत. तेव्हा मेहर यांनी चौकशी केली असता त्यांना श्रीधर शिंदे नावाचे गृहस्थ येथे राहत असून ते मराठीतून गाणी लिहितात असे कळले. त्यानंतर गाण्याच्या माध्यमातून या दोघांची ओळख झाली. शिंदे त्यांना भेटावयास वारंवार ऊर्दू शाळेत जाऊ लागले. एकदा मेहरसाहेबांनी शिंदेंना ऊर्दू मराठी अंकलिपी आणून दिली व सवडीनुकासर तोंडओळख करून दिली. त्यानंतर शिंदे हिंदी-ऊर्दू गीते लिहू लागले. तसेच मेहर साहेबांना दाखवून ते इस्लाम (सुधार) करून घेऊ लागले.

अन् नाव बदललं

साजन शिंदे यांच्या गीतात श्रीधर हा मक्ता येई. तो मेहरसाहेबांना प्रशस्त वाटेना. म्हणून त्यांनी श्रीधर शिंदे यांचे नामकरण साजन शिंदे असं केलं. तेव्हापासून शिंदे यांचा साजन या नावानेच काव्यप्रवास सुरू झाला आणि हीच त्यांची ओळख ठरली. ही गोष्ट आहे. सत्तरच्या दशकातली.

1972मध्ये शुक्रिया नावाच्या मासिकात त्यांची एक कविताही छापून आली होती.

सुर्ख जोडे में सजके चली है दुल्हन चली आज चली है पिया के वतन… धून मधुर सी गुंजे शहनाई की वह दे रही है खबर यह बिदाई की वह गले मिलके आँसू बहाये नयन….

शुक्रिया ते पोस्ट कामगार

‘शुक्रिया’ मासिकाच्या संपादिका श्रीमती थापर या गीताने प्रभावित झाल्या. त्यांनी शिंदे यांना ‘शुक्रिया’त लेखन करण्याची शिंदेना विनंतीही केली. याच काळात मेहरसाहेबांनी त्यांची ओळख ‘पोस्ट कामगार’ या साप्ताहिकाचे संपादक पांडुरंग चव्हाण यांच्याशी ओळख करून दिली. त्यामुळे पोस्ट कामगारमध्येही त्यांची गीते प्रकाशित होऊ लागली. तर 1973मध्ये प्रा. देवदास कोरमगावकर हे नाईकवाडीला आले होते. तेव्हा त्यांनी साजन यांना कवितेचे सौंदर्य शास्त्र, गण, मात्रा, वृत्त व छंद आदी शिकवले. त्यामुळे साजन यांना साहित्याकडे बघण्याची वेगळी दृष्टी मिळाली. त्यांना कवितेचे सौंदर्य शास्त्र समजू शकले. त्यामुळे त्यांनी काव्य क्षेत्रातही मुशाफिरी सुरू केली.

नामांतर संघर्षासाठी, जळली एक एक पणती, गौतम बलिदानाने केले, नामांतर अंती…

आणि

रोशन शाम ढल आती है, रुह शम्मा की जले आती है…

आणि

घट पवित्र डोई घेऊन, नाचलेले पाहिले, पण त्यातील दूध सारे, नासलेले पाहिले….

बौद्धवाडा साहित्य संघाच्या पहिल्या वर्धापन दिनी साहित्यिक विजय कुमार जाधव यांनी सिनेसंगीतकार राम मराठे यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं होतं. त्यावेळी मराठे यांनी तुम्ही जर आलात तर तुम्हाला गायन-वादन शिकवीन. तुम्ही त्याचा आवश्य लाभ घ्या, असं स्पष्ट केलं होतं. (साभार: आंबेडकरी कलावंत) (unknown stories of lyricists sajan shinde)

संबंधित बातम्या:

गायक साजन शिंदेंची कमाल; जिथे कोरस दिला, तोच स्टेज गायक म्हणून गाजवला!

गुरूशीच सामना रंगला, गझलेच्या प्रांतातही मुशाफिरी; गौतम संकपाळ यांचा हा सफरनामा वाचाच!

ज्या कंपनीत काम करायचे त्याच कंपनीच्या नावाने गायन पार्टी काढली; गीतकार गौतम संकपाळांचा हा अजब किस्सा वाचाच!

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली