ज्या कंपनीत काम करायचे त्याच कंपनीच्या नावाने गायन पार्टी काढली; गीतकार गौतम संकपाळांचा हा अजब किस्सा वाचाच!

गौतम संकपाळ हे आंबेडकरी कलावंतांपैकी एक प्रमुख गायक, कवी आणि गझलकार आहेत. त्यांचे वडील दिनकर विष्णू संकपाळ हे कवी, गायक असल्याने त्यांना गाण्याचा वारसा वडिलांकडून मिळाला. (gautam sankpal)

ज्या कंपनीत काम करायचे त्याच कंपनीच्या नावाने गायन पार्टी काढली; गीतकार गौतम संकपाळांचा हा अजब किस्सा वाचाच!
gautam sankpal
Follow us
| Updated on: Aug 09, 2021 | 9:21 AM

मुंबई: गौतम संकपाळ हे आंबेडकरी कलावंतांपैकी एक प्रमुख गायक, कवी आणि गझलकार आहेत. त्यांचे वडील दिनकर विष्णू संकपाळ हे कवी, गायक असल्याने त्यांना गाण्याचा वारसा वडिलांकडून मिळाला. आई जात्यावर ओव्या गायची. त्यातून गाण्याची ओढ लागली आणि गौतम संकपाळ यांची कवी, गायक म्हणून जडणघडण झाली. (know about gautam sankpal and his life’s turning point)

गौतम संकपाळ हे मूळचे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील कर्नावटचे. त्यांचा जन्मही इथलाच. घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना इयत्ता 7वीच्या पुढे शिक्षण घेता आलं नाही. गावाला दोन एकर शेती होती. तर वडील मुंबईत नोकरीला होते. ते भांडूपच्या प्रतापनगरमध्ये भाड्याने राहायचे. त्यांची स्वत:ची दिनकर संकपाळ गायन पार्टी होती. गौतम संकपाळ हे पाच भावंडांमध्ये सर्वात थोरले होते. त्यामुळे त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. परिणामी त्यांना पोटापाण्यासाठी मुंबईचा रस्ता धरावा लागला.

फुलवाल्याकडे काम

मुंबईत आल्यावर वडीलच भाड्याच्या घरात राहत असल्याने ते वरळीला मामाकडे उतरले. पण मुंबईत आल्यावरही त्यांची ससेहोलपट सुरूच होती. सुरुवातीची पाच सहा वर्षे अस्थिरच गेली. वरळीत काहीकाळ वरळी नाक्यावर फुलवाल्याच्या दुकानात काम केल्यानंतर ते दहिसरला शिवशक्ती मिलमध्ये कामाला लागले. त्यावेळी मिलमध्ये त्यांना 200 ते 250 रुपये पगार मिळत होता. यावेळी त्यांची त्यांच्या आत्याचे पती विष्णू गायकवाड यांच्या संपर्कात आले. गायकवाड हे महिंद्रा अँड महिंद्रा ट्रॅक्टर कंपनीत कामाला होते. नंतर गायकवाड यांनी संकपाळ यांना महिंद्रा कंपनीत कामाला लावले अन् आयुष्याला स्थिरता आली.

टर्निंग पॉईंट

याच काळात संकपाळ लिहू लागले. लिहिता लिहिता गायलाही लागले. पुढे कव्वाली क्षेत्रात ऊठबस सुरू झाली. नंतर लक्ष्मण राजगुरुंशी ओळख झाली अन् संकपाळ यांच्या आयुष्याला टर्निंग पॉइंट मिळाला. राजगुरुच त्यांना मार्गदर्शन करू लागले. गाणं कसं लिहिलं पाहिजे, आशय, विषय कसा असावापासून ते गाणं कसं गावं यापर्यंतचं त्यांचं मार्गदर्शन असायचं. संकपाळ यांच्या गाण्यातील चुका दुरुस्त करून योग्य ते मार्गदर्शनही ते करायचे. त्यामुळेच संकपाळ यांनी लक्ष्मण राजगुरुंना गुरू मानलं. विशेष म्हणजे वडील गायक असतानाही वडिलांचं मार्गदर्शन न घेता लक्ष्मण राजगुरूंच्या तालमीत तयार होणं संकपाळ यांनी पसंत केलं.

संकपाळ यांना गायन क्षेत्रात खरी ओळख मिळवून दिली ती ‘नाणं आंबेडकरांचं’ या कॅसेटनं.

चिता चंदनाची सागरा म्हणाली, आहे भाग्यशाली मी आहे भाग्यशाली…

संकपाळ यांचं हे गाणं ‘नाणं आंबेडकरांचं’ या कॅसेटमध्ये आहे. गायक भार्गवदास जाधव यांनी हे गाणं गायलं आहे. या गाण्यामुळे त्यांना ओळख मिळाली. तर,

या नवकोटीची माय भीमाई होती गं, जणू दुधावरची साय भीमाई होती गं…

या ‘निळी सलामी’ कॅसेटमधील गीताने त्यांच्यावर गीतकार म्हणून शिक्कामोर्तब केलं. स्वरसम्राट प्रल्हाद शिंदेंनी हे गाणं गायलं होतं.

जेवणाच्या सुट्टीत मैफल रंगायची

महिंद्रा अँड महिंद्रा ट्रॅक्टकर कंपनीत अनेक कवी, गायक, गीतकार मंडळी होती. त्यामुळे या मंडळींचा चांगला ग्रुप जमला होता. नागसेन सावदेकर, रामबंधू ऊर्फ खंडू अढांगळे, बाळू कडलक, जनार्दन धोत्रे आणि शाहीर वसंत मोहिते आदी गायक-कवी मंडळी या ग्रुपमध्ये होते. जेवणाच्या मधल्या सुट्टीत हा ग्रुप जमायचा आणि मनसोक्त साहित्यिक चर्चा घडायची. एकमेकांना नवी रचना ऐकवली जायची. नवीन धून ऐकवली जायची. चुकलं तर एकमेकांना सूचनाही करायचे. पुढे पुढे तर या कलावंतांनी एक गायन पार्टीही स्थापन केली. ‘महिंद्रा ट्रॅक्टर कला मंच’. या कला मंचला त्यांनी कंपनी पुरते मर्यादित ठेवलं नाही. तर मुंबईत आणि मुंबईबाहेरही कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. (साभार: आंबेडकरी कलावंत) (know about gautam sankpal and his life’s turning point)

संबंधित बातम्या:

15 वर्षाची मेहनत कचऱ्यात, गाणं लिहिताना ढसढसा रडले; गीतकार अम्बादेंच्या बाबतीत नेमकं काय घडलं?

मुशायरे, कव्वाल्या, कीर्तनांनी गीतकार म्हणून घडवलं; कोण आहेत गीतकार प्रशांत अम्बादे?

गीतकाराचा बोल जिव्हारी लागल्याने गायकीच सोडली; शीलादेवींचा हा किस्सा माहीत आहे का?

(know about gautam sankpal and his life’s turning point)

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.