Yeu Kashi Tashi Mi Nandayla |  स्वीटूला बघायला पुन्हा एकदा मुलाकडची मंडळी येणार, आता तरी मुलगी पसंत पडणार?

छोट्या पडद्यावर सध्या चर्चेत असलेली ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ (Yeu Kashi Tashi Mi Nandayla) ही मालिका देखील आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिका शेवटच्या टप्प्याकडे सरकत असल्याने, मालिकेच्या कथानकाने जोरदार वेग पकडला आहे.

Yeu Kashi Tashi Mi Nandayla |  स्वीटूला बघायला पुन्हा एकदा मुलाकडची मंडळी येणार, आता तरी मुलगी पसंत पडणार?
Om-sweetu

मुंबई : छोट्या पडद्यावर सध्या चर्चेत असलेली ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ (Yeu Kashi Tashi Mi Nandayla) ही मालिका देखील आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिका शेवटच्या टप्प्याकडे सरकत असल्याने, मालिकेच्या कथानकाने जोरदार वेग पकडला आहे. आता स्वीटूची आई अर्थात नलू मावशी हिचा स्वीटू आणि ओमच्या नात्याला असलेला विरोध पूर्णपणे मावळला आहे.

ओमने आपल्या मुलीच्या आयुष्यात येऊ नये, यासाठी नलूने त्याला अनेक कष्ट करायला लावले. मात्र, कुठल्या परीक्षेला न घाबरता आपल्या प्रेमावर विश्वास ठेऊन ओम नेहमीच जिंकत राहिला. अर्थात त्याच्या या प्रामाणिक प्रयत्नांमुळे नलूचा विरोध आता होकारात बदलला आहे. तिने या दोघांच्या नात्याला अखेर परवानगी दिली आहे.

स्वीटूला बघायला मुलाकडचे येणार!

मालिकेत सध्या पुन्हा एकदा स्वीटूला मुलगा बघायला येतो असा ट्रॅक सुरु आहे. तर, आपल्या नात्याला आपल्या आईने परवानगी दिली ही गोष्ट अद्याप तिला माहितच नाहीये. मुलाकडची मंडळी येणार म्हणून घरात मोठी लगबग सुरु आहे. मात्र, कोण मुलगा येणार हे स्वीटूला माहित नाहीये. तरी नलू आपल्या मुलीला अर्थात स्वीटूला बऱ्याच सूचना देत आहे. या दरम्यान घरात मुलाकडच्या मंडळींची एंट्री होते. ही मंडळी इतर कोणी नसून, ओमचे कुटुंब आणि ओम आहे. अर्थात या घरात स्वीटू आणि ओमच्या लग्नाच्या बोलणीची तयारी सुरु आहे.

पाहा मालिकेचा नवा प्रोमो :

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

काय होती ‘या’ मालिकेची कथा?

आपलं सुखाचं हक्काचं माहेर सोडून मुलगी एका वेगळ्याच कुटुंबात प्रवेश करते. असे घर जे इथून पुढे तिचं होणार असतं. या प्रवासात तिला पतीची साथ असली तरी एका जिवाभावाच्या मैत्रिणीची तिला कायमच उणीव भासत असते. अशावेळी सासूच जर तिची सखी झाली तर नात्यांचा गोडवा अधिकच वाढतो. आणि घराचं गोकुळ होतं. अशाच एका गोड नात्याची कथा सांगणारी ही मालिका आहे. अद्याप लग्नाचा ट्रॅक आला नसला तरी शकु आणि स्वीटूची नात्यानं या दोघी सासू सून आहेत. पण मनानं मैत्रीच्या धाग्यानं घट्ट बांधल्या गेल्या आहेत.मिश्किल सासू आणि खट्याळ सून मिळून घरात वेगळीच गंमत करतात. आणि या गंमतीचच नाव आहे ‘येऊ कशी तशी मी नांदायला’.

अभिनेत्री शुभांगी गोखले, अदिती सारंगधर, दीप्ती केतकर या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. तर, शाल्व किंजवडेकर नायकाच्या भूमिकेत आणि अन्विता फलटणकर नायिकेच्या भूमिकेत दिसत आहेत.

हेही वाचा :

अखेर रेश्माचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला, वाड्यातील लोकांची पुन्हा चौकशी होणार!

ऑनलाईन कुठे आणि कसा पाहाल अजय देवगणचा ‘भुज’ चित्रपट? जाणून घ्या…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI