AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhuj The Pride of India Movie : ऑनलाईन कुठे आणि कसा पाहाल अजय देवगणचा ‘भुज’ चित्रपट? जाणून घ्या…

अभिनेता अजय देवगणचा ‘भुज : द प्राईड ऑफ इंडिया’ (Bhuj The Pride of India) हा चित्रपट स्वातंत्र्यदिनाच्या आठवड्याच्या शेवटी प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट भारतीयांच्या एकतेचा महिमा दाखवेल.1971 च्या भारत-पाक युद्धादरम्यान देशाला विजय कसा मिळाला, याची कथा या चित्रपटात दाखवली जाईल.

Bhuj The Pride of India Movie : ऑनलाईन कुठे आणि कसा पाहाल अजय देवगणचा ‘भुज’ चित्रपट? जाणून घ्या...
Bhuj
| Edited By: | Updated on: Aug 13, 2021 | 12:19 PM
Share

मुंबई : अभिनेता अजय देवगणचा ‘भुज : द प्राईड ऑफ इंडिया’ (Bhuj The Pride of India) हा चित्रपट स्वातंत्र्यदिनाच्या आठवड्याच्या शेवटी प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट भारतीयांच्या एकतेचा महिमा दाखवेल.1971 च्या भारत-पाक युद्धादरम्यान देशाला विजय कसा मिळाला, याची कथा या चित्रपटात दाखवली जाईल. त्या युद्धात भारतीय हवाई दलाची भुजमधील हवाई पट्टी नष्ट झाली होती. ज्यानंतर, गुजरातमधील 300 स्थानिक महिलांनी, IAF स्क्वॉड्रन लीडर विजय कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली, एअरबेसची पुनर्बांधणी करण्यासाठी दिवसरात्र एक केली. हा चित्रपट 13 ऑगस्टला डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.

अभिषेक दुधैया दिग्दर्शित, भुज: द प्राइड ऑफ इंडियामध्ये संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, एमी विर्क, नोरा फतेही आणि शरद केळकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

कसा आणि कुठे पाहाल चित्रपट?

14 ऑगस्ट 2020 रोजी भुज द प्राइड ऑफ इंडिया चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता, मात्र कोरोनामुळे निर्मात्यांनी त्यांची योजना बदलली. हा चित्रपट आता OTT प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर डिजिटली रीलीज होत आहे. 13 ऑगस्टपासून तो ओटीटीवर पाहण्यासाठी उपलब्ध होईल. डिस्ने प्लस हॉटस्टारच्या सशुल्क सबस्क्रिप्शनसह ‘भुज द प्राईड ऑफ इंडिया’ हा चित्रपट एचडीमध्ये डाऊनलोड केला जाऊ शकतो.

अशी आहे चित्रपटाची कहाणी

‘भुज : द प्राईड ऑफ इंडिया’ची कथा 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे. ज्यामध्ये त्या वेळी भुज विमानतळाचे प्रभारी असलेले आयएएफ स्कॅड्रॉन लीडर विजय कर्णिक यांनी 300 स्थानिक महिलांच्या मदतीने एअरबेसची पुनर्बांधणी केली होती. 1971 मध्ये पाकिस्तानने ऑपरेशन चंगेज खान सुरू केले. पाकिस्तानने 14 दिवसात भुज विमानतळावर 35 वेळा 92 बॉम्ब आणि 22 रॉकेटने हल्ला केला होता. युद्धाच्या वेळी शत्रूने हवाई तळ नष्ट केले. त्यानंतर विजय, जवळच्या माधापूर गावातील 300 महिलांसह, भारतीय हवाई दलाचे विमान उतरू शकेल म्हणून एक हवाई तळ तयार केला होता. या चित्रपटात हवाई दलाची शक्ती आणि पराक्रम दाखवण्यात येणार आहे.

‘हे’ कलाकार दिसणार महत्त्वपूर्ण भूमिकेत

अभिनेता संजय दत्त या चित्रपटात स्थानिक गावकरी ‘रणछोडदास पागी’च्या भूमिकेत आहे. एमी विर्क ‘विक्रम सिंह बाज जेठाज’च्या भूमिकेत आहे. सोनाक्षीच्या पात्राचे नाव ‘सुंदरबेन जेठा’ आहे. त्याचबरोबर नोरा ‘हिरा रहमान’ नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे. शरद केळकर आणि प्रणिता सुभाषही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘भुज’ अजय देवगण निर्मित आणि अभिषेक दुधैया दिग्दर्शित आहे.

हेही वाचा :

चित्रपटातील ‘तो’ न्यूड सीन पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल, ट्विटरवर ट्रेंड होतंय #BoycottRadhikaApte

बदाम पाडायला गेले अन् बाबासाहेबाचं दर्शन झालं; वाचा, शाहीर यमराज पंडित यांचा अविस्मरणीय किस्सा!

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.