Devmanus | अखेर रेश्माचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला, वाड्यातील लोकांची पुन्हा चौकशी होणार!

देवमाणूस’ (Devmanus) या मालिकेत आता देवी सिंग उर्फ डॉ. अजित कुमार देव याचे काळे कारनामे उघडकीस येण्यास सुरुवात झाली आहे. मालिका आता शेवटच्या टप्प्यावर आली असून, दोन दिवसांतच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.

Devmanus | अखेर रेश्माचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला, वाड्यातील लोकांची पुन्हा चौकशी होणार!
प्रेक्षकांची आवडती देवमाणूस ही मालिका पुढच्या आठवड्यात निरोप घेणार आहे. रविवार 15 ऑगस्ट रोजी दोन तासांचा विशेष एपिसोड हा मालिकेचा शेवटचा भाग असेल. त्यामुळे डॉ. अजितकुमार देवचं काय होणार, याची उत्सुकता चाहत्यांना आहे

मुंबई : ‘देवमाणूस’ (Devmanus) या मालिकेत आता देवी सिंग उर्फ डॉ. अजित कुमार देव याचे काळे कारनामे उघडकीस येण्यास सुरुवात झाली आहे. मालिका आता शेवटच्या टप्प्यावर आली असून, दोन दिवसांतच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. यामुळे आता कथानकाने देखील काहीसा वेग पकडला आहे. आता देवी सिंगचे सगळे गुन्हे एक-एक करून बाहेर पडणार असून, त्याला फाशीची शिक्षा होणार हे नक्की झालं आहे. रूपाच्या संगाड्यानंतर आता वाड्याच्या मागे आणखी एक सांगाडा सापडला आहे.

खेळता खेळता खजिना सापडणार म्हणून टोण्याने वाड्यामागची जमीन खणण्यास सुरुवात केली. या दरम्यान त्याला एका सांगाड्याचा हात दिसला. यामुळे घाबरलेल्या टोण्याने आरडा ओरड सुरु केली आणि पोलिसांना याची खबर लागली. आता पुन्हा एकदा पोलीस या वाड्यात येऊन सर्वाची चौकशी करणार आहेत.

कानातल्यांमुळे पटली ओळख

सांगाडा सापडल्याचे कळताच पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली. दरम्यान या सांगड्यासोबतच पोलिसांना एका स्त्रीचे कानातले देखील सापडले. हे कानातले रेश्माचे आहेत, त्यामुळे हा मृतदेह देखील तिचाच असल्याचे एका फोटोवरून सिद्ध झाले आहे. दुसरीकडे पोलिसांनी रेशमाचा पती विजय याला या घटनेची माहिती दिली असता, डॉक्टरच देवी सिंग असून, त्यानेच आपल्या पत्नीचा खूप केल्याचा आरोप विजयने केला आहे.

पाहा प्रोमो :

चंदालाही मारण्याचा केला प्रयत्न!

आपल्या गोष्टी चंदाला माहित असल्यामुळे डिम्पल आणि डॉक्टरला सतत तिच्या दबावाखाली राहावं लागतंय. अशातच आता घरात पुन्हा एकदा अजित कुमार देव आणि डिम्पलच्या लागांची चर्चा सुरु झालीय. आधी चिडलेल्या देवी सिंगने डिम्पलसोबत लग्नासाठी नकार दिला होता. मात्र, डिम्पलच्या धमकीने घाबरलेल्या देवी सिंगने अखेर लग्नाला होकार दिला. मात्र, या गोष्टीने चिडलेली चंदा पुन्हा एकदा त्याला लग्न न करण्यासाठी धमकी देते. यामुळे चिडलेली डिम्पल तिच्या डोक्यात फुलदाणी मारते आणि तिला बेशुद्ध करते. चंदा बेशुद्ध झाल्यानंतर डिम्पल डॉक्टरला तिला संपवण्यास सांगते. मात्र, डॉक्टर तिचा जीव घेणार इतक्यात चंदाला जाग येते आणि त्यांचा हा डाव उधळला जातो.

चिडलेल्या चंदाची अवाजवी मागणी

मात्र, जाग आल्यानंतर चंदा प्रचंड संतापते. ती पुन्हा एकदा डिम्पल आणि देवी सिंगला धमकी देते. यानंतर ती त्यांच्यकडे थेट 10 लाख रुपयांची मागणी करते. आधीच चंदाने होते नव्हते सगळे पैसे घेतल्यामुळे डॉक्टर वैतागला आहे. मात्र, तरीही तिला पुन्हा 10 लाख रुपये देणे, हा त्याचा नाईलाज असल्याने तो पुन्हा एकदा नव्या सावजाच्या शोधात आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार, देवी सिंगला नवीन सावज मिळेल की त्याचीच शिकार होईल, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

भल्याभल्यांची बोलती बोलती बंद करणारी, ‘ती परत आलीये’ची ‘ती’ नेमकी दिसते तरी कशी? पाहा ‘ती’चा फोटो…

सलमान खानने घेतली मीराबाई चानूची भेट, सोशल मीडियावर फोटो शेअर करताच झाला ट्रोल! पाहा नेमकं काय झालं…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI