भल्याभल्यांची बोलती बोलती बंद करणारी, ‘ती परत आलीये’ची ‘ती’ नेमकी दिसते तरी कशी? पाहा ‘ती’चा फोटो…

झी मराठी वाहिनीवरील 'ती परत आलीये' (Ti Parat Aaliye) या आगामी मालिकेची जोरदार चर्चा सर्वत्र सुरु आहे. संपूर्ण महाराष्ट्राला एकच प्रश्न पडला आहे की, ती म्हणजे नक्की कोण आहे? तिची झलक नुकतीच झी मराठीवर मालिकेच्या नवीन प्रोमो मधून प्रेक्षकांना पाहायला मिळाली.

भल्याभल्यांची बोलती बोलती बंद करणारी, ‘ती परत आलीये’ची ‘ती’ नेमकी दिसते तरी कशी? पाहा ‘ती’चा फोटो...
ती परत आलीये

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील ‘ती परत आलीये’ (Ti Parat Aaliye) या आगामी मालिकेची जोरदार चर्चा सर्वत्र सुरु आहे. संपूर्ण महाराष्ट्राला एकच प्रश्न पडला आहे की, ती म्हणजे नक्की कोण आहे? तिची झलक नुकतीच झी मराठीवर मालिकेच्या नवीन प्रोमो मधून प्रेक्षकांना पाहायला मिळाली. एक चित्तथरारक चेहरा आणि त्यामागे अंगावर भीतीने काटा आणणारं बॅकग्राउंड म्युजिक असलेला हा प्रोमो पाहून अनेकांची झोप उडाली आहे.

झी मराठीवर अगदी रात्रीच्यावेळी हा प्रोमो प्रसारित झाला आणि या प्रोमो नंतर एकच खळबळ उडाली की, ती नक्की कोण आहे? हा भयानक चेहरा आहे की मुखवटा? ‘ती परत आलीये’ असं विजय कदम आधीच्या प्रोमोमध्ये म्हणतात, पान आता तिची झलक संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहे.

पाहा ‘ती’चा फोटो!

Ti Parat Aaliye

Ti Parat Aaliye

 ‘ती’चा प्रवास खूप दूरवरचा!

ती कोण आहे, याबद्दल बोलताना विजय कदम म्हणाले, “तिचा हा भयावह चेहरा मालिकेत देखील प्रेक्षकांच्या भेटीस येईल. ती कोण आहे, हे मला माहिती नाही.. पण तिच्या येण्याचा प्रवास खूप दूरवरचा आहे. त्यामुळे सध्या तिच्या भोवती गूढ वलय रंगवण्यात आम्ही सगळे कलाकार रमलो आहोत. त्यामुळे ती कोण आहे, हे प्रेक्षकांना मालिकेसोबत उलगडत जाईल.” अभिनेता विजय कदम यांच्या व्यतिरिक्त या मालिकेतील कलाकारांची फौज कोण आहे, याची माहिती अजूनही गुलदस्त्यात ठेवली आहे.

विजय कदम यांचे पुनरागमन!

नुकताच या मालिकेचा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. जेष्ठ अभिनेते विजय कदम या मालिकेत एका वेगळ्या आणि लक्षवेधी भूमिकेत दिसणार आहेत. अभिनेते विजय कदम हे बऱ्याच कालावधी नंतर टीव्हीवर पुनरागमन करणार आहेत. प्रोमोमध्ये प्रेक्षकांनी पाहिलं कि, विजय कदम एका परिसरात गस्त घालत आहेत आणि त्या परिसरामध्ये काही हत्या घडत आहेत. त्यामुळे सावध राहा अशी चेतावणी देताना, ते दिसत आहेत. नक्की ही भानगड काय आहे?  या मालिकेत अजून कोण कलाकार असणार आहेत?  ही सर्व माहिती अजूनही गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.

पाहा नवा प्रोमो :

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

‘देवमाणूस’ प्रेक्षकांचा निरोप घेणार

झी मराठीवरील ‘देवमाणूस’ (Devmanus) या मालिकेने आपल्या वेगळ्या कथानकामुळे लोकप्रियतेचं शिखर गाठलं. मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आणि प्रेक्षकांनी या मालिकेला पसंती दर्शवली. पण आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे आणि त्याजागी ‘ती परत आलीये’ (Tee Parat Aaliye)  ही एक नवीन गूढ रहस्यमय मालिका 16 ऑगस्ट पासून रात्री 10.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

हेही वाचा :

बच्चे कंपनीचा थरकाप उडवणारं नाटक अलबत्या गलबत्याचा सेट चोरीला!

‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेचा 300 एपिसोड्सचा टप्पा पूर्ण, प्रोमो शेअर करत मानले प्रेक्षकांचे आभार

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI