AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मला फक्त तिच दिसायची, तिच्याशिवाय…सासू सोबत पळून गेलेल्या जावयाच्या लव्ह स्टोरीमध्ये नवीन टि्वस्ट

Saas Damad love story : काही महिन्यांपूर्वी देशात एका घटनेने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. लग्नाच्या 10 दिवस आधी एक सासू तिच्या होणाऱ्या जावयासोबत पळून गेली होती. या लव्ह स्टोरीमध्ये आता नवीन टि्वस्ट आलाय. राहुलने अजून एक हैराण करणारा खुलासा केलाय.

मला फक्त तिच दिसायची, तिच्याशिवाय...सासू सोबत पळून गेलेल्या जावयाच्या लव्ह स्टोरीमध्ये नवीन टि्वस्ट
saas damad love story
| Updated on: Feb 16, 2026 | 2:21 PM
Share

बरोबर 10 महिन्यांपूर्वी एक बातमी सगळ्या देशात चर्चेचा विषय ठरलेली. प्रकरण खूप विचित्र होतं. एक मुलगा त्याच्या लग्नाच्या 10 दिवस आधी होणाऱ्या सासूसोबत पळून गेला होता. नंतर काही दिवसांनी दोघे सापडले. पोलिसांसमोर त्यांनी कबुली दिली की, ‘आम्ही दोघे परस्परांवर प्रेम करतो. आम्हाला एकत्र रहायचं आहे’ आता पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आलं आहे. महिला आता तिच्या जावयाला धोका देत भावोजीसोबत पळून गेली. जावई आणि सासू आता परस्परांवर आरोप करत आहेत. सासू अनिताने तंत्र-मंत्राद्वारे माझं वशीकरण केलं होतं, असं जावई राहुलने आरोप केला. 6 फेब्रुवारीला ती घरातून लाखो रुपये आणि दागिने घेऊन भावोजीसोबत पसार झाली.

राहुलने एसएसपी कार्यालयात जाऊन न्याय मागितला आहे. राहुलच्या सांगण्यांनुसार, मागच्या 10 महिन्यापासून आम्ही दोघे बिहारच्या सीतामढी येथे पती-पत्नीसारखे राहत होतो. 6 फेब्रुवारीला सकाळी 8.30 वाजता रोजच्या प्रमाणे फेरी मारायला मी बाहेर पडलो. बरोबर 9 च्या सुमारास अनिता तिचे भावोजी देवेंद्र सोबत घरातून पळून गेली. अनिता स्वत:सोबत 2 लाख रुपये रोख, एक सोन्याचं मंगळसूत्र आणि दोन अंगठ्या घेऊन पसार झाली.

तंत्र-मंत्राचा आधार घेतला

एसएसपी कार्यालयात पोहोचलेल्या राहुलने अजून एक हैराण करणारा खुलासा केला. अनिताने मला प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यासाठी तंत्र-मंत्राचा आधार घेतला. जबरदस्ती मला ताबीज बांधण्यात आले आणि तंत्र-मंत्राद्वारे मानसिक दृष्टया मला वश केलं असा आरोप राहुलने केला. त्याला प्लानिंग करुन फसवण्यात आल्याचं राहुलने सांगितलं. त्याने आतापर्यंत जमवलेले पैसे आणि दागिने घेऊन अनिता घरातून पळून गेली.

अशा स्त्रियांबद्दल काय बोलायचं?

राहुलने त्याच्या तक्रारीत अनिताच्या चारित्र्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. राहुलच्या म्हणण्यानुसार आता त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली आहे. नवीन नवीन संबंध बनवणं हा अनिताचा स्वभाव आहे असा आरोप त्याने केला. “माझी बुद्धि भ्रष्ट झालेली. मी माझ्या कुटुंबियांपासून लांब गेलो. मला फक्त तिच दिसायची. तिच्याशिवाय अजून काही दिसत नव्हतं. पण आज ती मला सोडून पळून गेली. अशा स्त्रियांबद्दल काय बोलायचं?” असं राहुल म्हणाला.

Follow Us
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर