Saas damad love story : ‘लग्न करीन, पण एका अटीवर…’, सासूसोबत लग्न करण्यासाठी जावयाने कुठली अट ठेवली?
Saas damad love story : अपना देवीची मुलगी शिवानीच 16 एप्रिलला राहुलसोबत लग्न होणार होतं. पण लग्नाआधी अपना देवी घरातून दागिने, रोख रक्कम घेऊन जावयासोबत पसार झाली. पोलीस दोघांचा शोध घेत होते. अपना देवीवर आरोप आहे की, घरातून पळून जाताना तिने पाच लाख रुपयाचे दागिने आणि साडेतीन लाख रुपये कॅश घेऊन पसार झाली.

अलीगढमधून फरार झालेल्या सासू-जावयाच्या जोडीला बुधवारी पोलिसांनी अटक केली. सध्या दोघांची चौकशी सुरु आहे. दोघांनी आपला निर्णय योग्य असल्याच म्हटलं आहे. दोघांना आता एकत्र सोबत रहायचं आहे. होणाऱ्या सासूसोबत पळालेला जावई राहुल म्हणाला की, मी यांच्यासोबत लग्न करायला तयार आहे. बाकी यांची मर्जी. जावई राहुल आपल्या निर्णयाचा बचाव करताना म्हणाला की, “मी सासूवर वाईट नजर टाकली नाही. यांचा नवरा यांना त्रास द्यायचा. घाणेरड्या शिव्या द्यायचा. या त्यांच्या नवऱ्याला कंटाळलेल्या आणि घरातले सुद्धा त्यांना सपोर्ट करत नव्हते. पुढे माझ्याशी बोलण सुरु झाल्यानंतर यांनी मला सर्व काही सांगितलं. 6 एप्रिल रोजी मी शॉपिंगसाठी निघालो होतो. त्याचवेळी यांचा फोन आला, या बोलल्या की, तू मला न्यायला आला नाहीस, तर मी मरुन जाईन. यांनी कुठलं चुकीच पाऊल उचलू नये याचसाठी मी तिथे गेलो होतो”
“आम्ही दोघे कासगंज येथे भेटलो. 7 एप्रिलला मुजफ्फरपूर येथे पोहोचलो. त्यावेळी आम्हाला समजलं की, पोलीस आम्हाला शोधतायत. आम्ही विचार केला की, का आपणच सरेंडर होऊ नये” असं राहुल म्हणाला. लग्नाच्या विषयावर राहुल म्हणाला की, “सगळं काही यांच्यावर अवलंबून आहे. यांची इच्छा असेल, तर मी यांच्यासोबत लग्न करायला तयार आहे. जसं या म्हणतील तसं होईल. अट फक्त इतकीच की, यात यांची मर्जी पाहिजे. मला तर यांच्यासोबतच रहायचं आहे. वयामधील अंतराने काही फरक पडत नाही”
नवराच म्हणाला की, ‘तू राहुलसोबत…’
सासू अपना देवी म्हणाल्या की, “माझ्या नवऱ्याला माझं जावयासोबत बोलणं पसंत नव्हतं. एकवेळ तर नवरा हे सुद्धा म्हणाला की, तू राहुलसोबत पळून जा. आता कुठला नवरा असं बोलत असेल, तर पत्नीची मनोवस्था काय होईल?” “नंतर मी या सगळ्या गोष्टी राहुलला सांगितल्या. राहुल खूप चांगला आहे. त्याने माझी अडचण समजून घेतली. आम्ही दोघांनी ठरवलं की, आता सोबतच रहायचं आहे. घरातून पळाल्यानंतर आमची भेट कासगंज येथे झाली” असं अपना देवी यांनी सांगितलं.
