AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका महिलेने मला गंभीर माहिती दिलीये… वेळ आली तर… जरांगे पाटलांचा धनंजय मुंडेंना गंभीर इशारा

Jarange vs Munde : मनोज जरांगे पाटील यांनी आमदार धनंजय मुंडे यांना गंभीर इशारा दिला आहे. 'माझ्या नादी लागू नको तुझी 22 पेक्षा जास्त प्रकरणे माझ्याकडे आली आहेत; अजून मी त्यात हात घातलेला नाही' असं जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

एका महिलेने मला गंभीर माहिती दिलीये... वेळ आली तर... जरांगे पाटलांचा धनंजय मुंडेंना गंभीर इशारा
Jarange vs MundeImage Credit source: Google
| Updated on: Feb 17, 2026 | 5:26 PM
Share

मराठा आरक्षणाचे आंदोनलकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांना गंभीर इशारा दिला आहे. काही महिन्यांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत हत्येची सुपारी दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना, ‘माझ्या नादी लागू नको तुझी 22 पेक्षा जास्त प्रकरणे माझ्याकडे आली आहेत; अजून मी त्यात हात घातलेला नाही’ असा इशारा धनंजय मुंडेंना दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी नेमकं काय म्हटले ते जाणून घेऊयात.

एक महिला माझ्याकडे आली होती…

मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना इशारा देताना म्हटले की, ‘आज सकाळी नागपूरवरून रंजना प्रदीप नागपूरकर नावाची महिला माझ्याकडे आली होती. ही महिला ढसाढसा रडली. तिने सांगितलेलं प्रकरण इतकं भयानक आहे. ही महिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नात्यातील आहे. हे प्रकरण खूप गंभीर आहे. धनंजय मुंडेंनी दिलेल्या टेन्शनमुळेच या महिलेच्या पतीचा मृत्यू झाला’ असा गंभीर आरोप धनंजय मुंडे यांच्यावर केला आहे.

धनंजय मुंडे य़ांची 22 प्रकरणे माझ्याकडे आली आहेत

पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, धनंजय मुंडे तुझी 22 पेक्षा जास्त प्रकरणं माझ्याकडे आली आहेत, त्यामुळे आता शहाणा हो, आणि माझ्या नादी लागू नको. तुझी लाभार्थी टोळी माझ्या विरोधात तू कशी लावली आहेस आणि तू मला बदनाम करण्यासाठी काय कारस्थानं करतोय, हे मला चांगलं माहित आहे. धन्या तू इथून पुढे तरी माझ्या नादाला लागू नको. तुझे खूप प्रकरण माझ्याकडे आले आहेत. मी अद्याप गप्प आहे, पण मी जर मागे लागलो तर तुला तोंड दाखवायला जागा उरणार नाही.’

धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळण्याबाबतच्या प्रश्नावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, धनंजय मुंडेना मंत्रिपद दिल्यावर राष्ट्रवादी पक्ष संपेल, त्यामुळे भाजप त्यांना जवळ करत नाहीये. रक्ताने हात भरलेल्या लोकांना सरकार का सांभाळेल? खून करण्यासाठी मंत्रिपद द्यायचं आहे का? त्यामुळे मला नाही वाटत हे दोन्ही पक्ष त्यांना मंत्रिपद देईल.

Follow Us
लक्ष्मण हाकेंची मागणी: २ सप्टेंबरचा शासन निर्णय तातडीने रद्द करा
ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा इशारा: मागण्या पूर्ण न झाल्यास राजकीय नेत्यांना भेटणार नाही
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
New Sugar Stock Norms : साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
पवारांची राष्ट्रवादी-मोदी भेटीवरून वडेट्टीवारांचं विधान
Vijay Wadettiwar: काय शिजतंय ते आम्ही बघतोय, पवारांची राष्ट्रवादी-मोदी भेटीवरून वडेट्टीवारांचं विधान
मदतीसाठी तरुणांनी थेट खासदार ओमराजे निंबाळकरांना लावला फोन
पुणे रेल्वे स्थानकावर 2 तरुणांना टीसीने पकडलं, मदतीसाठी तरुणांनी थेट खासदार ओमराजे निंबाळकरांना लावला फोन
चांदगुडे कुटुंबामागे उरलं फक्त भयाण घर आणि कुटुंबाची वाट पाहणारा शेरू
Sambhajinagar : चांदगुडे कुटुंबामागे उरलं फक्त भयाण घर आणि कुटुंबाची वाट पाहणारा शेरू , 3 दिवसानंतर शेरुची सुटका
चाकण MIDCच्या विकासासाठी शिंदेंची बैठक,ठाकरेंच्या आमदाराची उपस्थिती
चाकण एमआयडीसीच्या विकासासाठी शिंदे-सामंत यांची बैठक, ठाकरेंच्या आमदाराची उपस्थिती
संभाजीनगर: खोट्या अफवा थांबवा,कुणालच्या मावशीची समाजमाध्यमांना विनंती
मृत कुणालच्या मावशीचा कळकळीचा संदेश: सोशल मीडियावर कुटुंबीयांविषयी चुकीची माहिती पसरवू नका
राहुल गांधींचा पुण्यातील कार्यक्रम ‘स्क्रिप्टेड पेड’;दरेकरांची टीक
राहुल गांधींचा पुणे दौरा स्क्रिप्टेड, पेड; प्रवीण दरेकरांची काँग्रेसवर टीका
प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा:सुळेंचं लांडगेंना थेट आव्हान
प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
पहिला वार करायचा असेल तर माझ्यावर करा', लांडगेंना सुळेंचं थेट आव्हान
Supriya Sule on Mahesh Landge :पहिला वार करायचा असेल तर माझ्यावर करा', लांडगेंना सुळेंचं थेट आव्हान