AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chardham Yatra: चारधाम यात्रेचा नवीन नियम, भाविकांकडून नोंदणी शुल्क घेणार? कधीपासून लागू नियम?

Chardham Yatra Registration Fee: चारधाम यात्रेसाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली आहे. पण यंदा ऑनलाईन नोंदणीसाठी शुल्क आकारण्यात येणार अशी चर्चा सुरू आहे. एक दोन दिवसात चारधाम यात्रेसाठीची नोंदणी सुरू होणार आहे. देशभरातील लाखो भाविकांसाठी मोठी अपडेट काय?

Chardham Yatra: चारधाम यात्रेचा नवीन नियम, भाविकांकडून नोंदणी शुल्क घेणार? कधीपासून लागू नियम?
चारधाम यात्राImage Credit source: गुगल
| Updated on: Feb 17, 2026 | 4:51 PM
Share

Chardham Yatra Registration Fee: चारधाम यात्रा 19 एप्रिलपासून सुरू होत आहे. चारधाम यात्रेच्या नोंदणी प्रक्रियेत यंदा बदल होणार आहे. बोगस नोंदणीला आळा घालण्यासाठी एक किमान नोंदणी शुल्क आकारले जाणार आहे. अर्थात याविषयीचा प्रस्ताव उत्तराखंड प्रशासनासमोर आहे. सरकार या नोंदणी शुल्काविषयी निर्णय घेण्याची शक्यता आहे.  एक दोन दिवसात चारधाम यात्रेसाठीची नोंदणी सुरू होणार आहे. देशभरातील लाखो भाविकांसाठी मोठी अपडेट काय आहे?

सोमवारी ऋषिकेशमध्ये गढवाल प्रशासन, हॉटेल मालक, टूर अँड ट्रॅव्हल ऑपरेटर्स, इतर व्यावसायिक यांच्यात एक बैठक झाली. हॉटेल असोसिएशन, टुरिझम इंडस्ट्रीजच्या प्रतिनिधींनी बोगस नोंदणीविरोधात आवाज उठवला. याप्रकाराला आळा घालण्यासाठी चारधाम यात्रेच्या नोंदणीसाठी कमीत कमी शुल्क आकारले जावे असा प्रस्ताव या बैठकीत समोर आला. गढवालचे आयुक्त विनय शंकर पांडे यांनी सांगितले की हा प्रस्ताव सर्वांकडून आला आहे आणि तो सरकारकडे पाठवण्यात आला आहे.

बोगस नोंदणीमुळे व्यावसायिकांना फटका

मोठ्या संख्येने देशभरातून लोक चारधाम यात्रेसाठी नोंदणी करतात. पण हे भाविक टूर अँड ट्रॅव्हल कंपन्यांपर्यंत पोहचत नाहीत. हॉटेलपर्यंत येत नाहीत. त्यामुळे व्यावासायिकांचं मोठं नुकसान होत असल्याची ओरड या बैठकीत करण्यात आली. भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात. पण योग्य आकडा उपलब्ध नसल्याने व्यावसायिकांची गुंतवणूक खर्चही निघत नाही असा दावा व्यावसायिकांनी केला आहे.

गेल्यावेळी 7.2 लाख भाविकांची नोंदणी

गेल्या वर्षी 7.2 दशलक्ष भाविकांनी चारधाम यात्रेसाठी नोंदणी केली होती. पण यात्रेत केवळ 5.2 दशलक्ष भाविक आले होते. भाविकांची ही मोठी संख्या अचानक गायब झाल्याने स्थानिक व्यावसायिक आणि प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे. नोंदणी मोठ्या संख्येने होते, पण भाविक तितक्या संख्येने येत नसल्याचे या बैठकीत समोर आणण्यात आले. जर बोगस एंट्री कमी झाली तर हॉटेल व्यावसायिक आणि इतरांचे मोठे नुकसान वाचेल असे म्हणणे मांडण्यात आले.

चार धाम मंदिर उघडण्याच्या तारखा

19 एप्रिल रोजी गंगोत्री आणि यमुनोत्री मंदिर उघडणार

22 एप्रिल रोजी केदारनाथ मंदिर उघाडणार

23 एप्रिल रोजी बद्रीनाथ मंदिर उघडणार

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा