AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विमानाच्या ब्लॅक बॉक्सबद्दल रोहित पवार यांचे मोठे विधान, म्हणाले, परदेशात…

अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर रोहित पवार यांनी मोठा संशय व्यक्त केला. दररोज अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. यादरम्यानच रोहित पवार यांनी मोठे विधान केले.

विमानाच्या ब्लॅक बॉक्सबद्दल रोहित पवार यांचे मोठे विधान, म्हणाले, परदेशात...
MLA Rohit Pawar
| Updated on: Feb 17, 2026 | 1:57 PM
Share

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने मोठी खळबळ उडाली. मुंबईहून बारामतीकडे जात असताना अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्या निधनानंतर सर्वांनाच धक्का बसला. या विमान अपघाताचे काही व्हिडीओ पुढे आली. विमान जमिनीवर कोसळताच मोठा स्फोट झाला. एक दोन नाही तर तब्बल चार ते पाच स्फोट झाली. अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, त्यांचे विमान हवेत एका बाजूने कोलमडत होते. अजित पवार यांच्यासोबत महादेव जानकर हे देखील बारामतीकडे निघणार होते, त्याच विमानाने. मात्र, उशीर झाल्याने महादेव जानकर पोहोचू शकले नाही. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर अनेक संशय व्यक्त केली जात आहेत. रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट संशय व्यक्त केला.

रोहित पवार यांनी नुकताच अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या ब्लॅक बॉक्सबद्दल मोठे विधान केले. रोहित पवार यांनी म्हटले की, आता विषय इतकाच आहे की, ब्लॅक बॉक्स जळला कसा आणि तो भारताच्या बाहेर पाठवला गेला. हा जो काही विषय आहे, तो महत्वाचा आहे. अनेक लोक म्हणतात की, म्हणतात की, तुम्ही विलिनीकरणाबाबत प्रेस घेणार होतात.

रोहित पवार यांनी म्हटले की, आमच्यासाठी विलिनीकरण आणि राजकारण दुय्यम आहे. आज कुठल्या गोष्टीला महत्व आहे तर दादांच्या तपासाला, या गोष्टीवर आम्ही फोकस करून आहोत. आता विषय कोणता महत्वाचा आहे तर तो अपघाताचा. आज आम्ही विलिनीकरणावर चर्चा करू शकतो, बैठका घेऊ शकतो, प्रेस घेऊन तुमच्यासमोर सगळे आणू शकतो. आमच्याकडे पुरावे आहेत.

अपघाताची चाैकशी होणे हेच महत्वाचे आणि यावरच आमचा फोकस आहे, असेही रोहित पवार यांनी म्हटले. रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत थेट अजित पवार यांच्या निधनानंतर मोठा संशय व्यक्त केला. खासगी गुप्तहेर संस्थेकडून अजित पवार यांच्या विमान अपघाताची चाैकशी केली जात असल्याचीही माहिती पुढे आली.

Follow Us
निवडणुका 2024 मध्ये झाल्या अन् ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले...
निवडणुका 2024 मध्ये झाल्या आणि ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले, मग... CM फडणवीसांनी समीकरणच मांडलं
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलन
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलनादरम्यान नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले...
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले जंतर-मंतरचा पॅटर्न
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना..
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना शत्रू मानत नाही, ते माझे...
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!