AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

JEE Main 2026 Result: NTA कडून जेईई मेन 2026 सत्र 1 चा निकाल जाहीर, महाराष्ट्रातील एकासह 12 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाईल

JEE Main Result : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने जेईई मेन 2026 सत्र 1 चा निकाल जाहीर केला आहे. यंदा 12 उमेदवारांना 100 पर्सेंटाईल मिळाले आहे. यात महाराष्ट्रातील एक विद्यार्थ्याचा समावेश आहे.

JEE Main 2026 Result: NTA कडून जेईई मेन 2026 सत्र 1 चा निकाल जाहीर, महाराष्ट्रातील एकासह 12 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाईल
JEE resultImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Feb 16, 2026 | 7:30 PM
Share

जॉइंट एन्ट्रान्स एक्झाम (जेईई) मेन 2026 सत्र 1 ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आह. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने जेईई मेन 2026 सत्र 1 चा निकाल जाहीर केला आहे. यंदा 12 उमेदवारांना 100 पर्सेंटाईल मिळाले आहे. याचाच अर्थ या सर्वांनी या परीक्षेत पहिला नंबर मिळवला आहे. यात महाराष्ट्रातील एका विद्यार्थ्याचाही समावेश आहे. त्यातबरोबर ही परीक्षा दिलेल्या एकूण उमेदवारांपैकी 96.26 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

13,04,653 विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा

एनटीएने 21 ते 29 जानेवारी 2026 या कालावधीत जेईई मेन 2026 सत्र 1 ची परीक्षा आयोजित करण्यात आली होती. बीई आणि बी.टेक प्रोग्राम्समध्ये प्रवेश देणाऱ्या या परीक्षेसाठी एकूण 13,55,293 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 13,04,653 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. यात भारतातील सर्व उमेदवार तसेच काठमांडू, दुबई आणि कुवेत सारख्या परदेशी केंद्रांमधील विद्यार्थ्यांचाही समावेश होता. एनटीएने सांगितले की एकूण उमेदवारांपैकी 96.26 % उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत.

खालील विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाईल मिळाले

  • श्रेयस मिश्रा – दिल्ली
  • नरेंद्र बाबू – आंध्र प्रदेश
  • शुभम कुमार – बिहार
  • कबीर छिल्लर – राजस्थान
  • चिरंजीब कार – राजस्थान
  • भावेश पात्रा – ओडिशा
  • अनय जैन – हरियाणा
  • अर्णव गौतम – राजस्थान
  • पासला मोहित – आंध्र प्रदेश
  • माधव विराडिया – महाराष्ट्र
  • पुरोहित निमय – गुजरात
  • विवान शरद माहेश्वरी – तेलंगणा

विद्यार्थ्यांना एप्रिलमध्ये आणखी एक संधी मिळणार

जेईई मेन 2026 सत्र 1 परीक्षेत कमी मार्क्स मिळाले असतील तर त्या विद्यार्थ्यांना एप्रिलमध्ये आणखी एक संधी मिळणार आहे. अंतिम गुणवत्ता यादी तयार करताना दोन्ही सत्रांमधील सर्वोत्तम गुणांचा विचार केला जाणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यायची आहे ते सत्र 2 साठी नोंदणी करू शकतात. एप्रिलची परीक्षा 2 एप्रिल ते 9 एप्रिल 2026 दरम्यान होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी ही आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये या परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे.

निकाल कसा चेक करायचा?

  • निकाल तपासण्यासाठी jeemain.nta.nic.in ला भेट द्या.
  • होमपेजवरील ताज्या JEE मेन 2026 सत्र 1 निकाल लिंकवर क्लिक करा.
  • वेब पेज उघडेल. तुमचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख टाकून लॉग इन करा.
  • स्क्रीनवर निकाल दिसेल.
Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात