मुंबई : ‘देवमाणूस’ (Devmanus) ही लोकप्रिय मालिका आता आपल्या शेवटच्या टप्प्यात आली आहे. मालिकेचं कथानक बऱ्याच वेगाने पुढे सरकत आहे. सध्या मालिकेत चंदा नव्याच्या एका पात्राची एंट्री झाली आहे. ही चंदा ‘डॉ अजित कुमार देव’ उर्फ देवी सिंग याला आपल्या तालावर अक्षरशः नाचवत आहे. केवळ पैशाच्या मोहापायी अनेक स्त्रियांचा जीव घेणाऱ्या या देवी सिंगला चंदा आता चांगलाच धडा शिकवत आहे. मात्र, नुकताच देवी सिंगने चंदाला देखील जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.
सतत पैशांचा तगादा लावणाऱ्या चंदाकडे डॉ. अजित कुमार देवच देवी सिंग असल्याचा पुरावा आहे. या सोबतच डिम्पल देखील देवी सिंगला सामील असल्याचे चंदाला माहित आहे. त्यामुळे दोघांच्या या रहस्यांवरील पडदा उठून नये, आणि आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून चंदा दोघानाही आपल्या तालावर नाचवत आहे.
आपल्या गोष्टी चंदाला माहित असल्यामुळे डिम्पल आणि डॉक्टरला सतत तिच्या दबावाखाली राहावं लागतंय. अशातच आता घरात पुन्हा एकदा अजित कुमार देव आणि डिम्पलच्या लागांची चर्चा सुरु झालीय. आधी चिडलेल्या देवी सिंगने डिम्पलसोबत लग्नासाठी नकार दिला होता. मात्र, डिम्पलच्या धमकीने घाबरलेल्या देवी सिंगने अखेर लग्नाला होकार दिला. मात्र, या गोष्टीने चिडलेली चंदा पुन्हा एकदा त्याला लग्न न करण्यासाठी धमकी देते. यामुळे चिडलेली डिम्पल तिच्या डोक्यात फुलदाणी मारते आणि तिला बेशुद्ध करते. चंदा बेशुद्ध झाल्यानंतर डिम्पल डॉक्टरला तिला संपवण्यास सांगते. मात्र, डॉक्टर तिचा जीव घेणार इतक्यात चंदाला जाग येते आणि त्यांचा हा डाव उधळला जातो.
View this post on Instagram
मात्र, जाग आल्यानंतर चंदा प्रचंड संतापते. ती पुन्हा एकदा डिम्पल आणि देवी सिंगला धमकी देते. यानंतर ती त्यांच्यकडे थेट 10 लाख रुपयांची मागणी करते. आधीच चंदाने होते नव्हते सगळे पैसे घेतल्यामुळे डॉक्टर वैतागला आहे. मात्र, तरीही तिला पुन्हा 10 लाख रुपये देणे, हा त्याचा नाईलाज असल्याने तो पुन्हा एकदा नव्या सावजाच्या शोधात आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार, देवी सिंगला नवीन सावज मिळेल की त्याचीच शिकार होईल, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
भल्याभल्यांना मृत्युच्या दारात ढकलणारा देवीसिंग ऊर्फ डॉ. अजित कुमार देव आता चांगलाच अडकणार आहे. चंदाला लग्नाचं आमिष दाखवून, तिच्याकडून पैसे घेऊन फरार झालेला देवीसिंग अखेर आता चंदाच्या हाती लागला आहे. देवीसिंगने फसवल्यामुळे नको असूनही दारूच्या धंद्यात फसलेली चंदा आता देवीसिंगचा बदला घेणार आहे. डॉ. अजित कुमार देवच देवीसिंग असल्याचा पुरावा चंदाकडे असल्याने, एरव्ही इतरांवर हुकुम गाजवणारा देवीसिंग आता चक्क चंदाच्या तालावर नाचतो आहे.
झी मराठीवरील ‘देवमाणूस’ (Devmanus) या मालिकेने आपल्या वेगळ्या कथानकामुळे लोकप्रियतेचं शिखर गाठलं. मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आणि प्रेक्षकांनी या मालिकेला पसंती दर्शवली. पण आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे आणि त्याजागी एक नवीन गूढ रहस्यमय मालिका 16 ऑगस्ट पासून रात्री 10.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘ती परत आलीये’ (Tee Parat Aaliye) असं या मालिकेचं नाव असणार आहे.
भल्याभल्यांची बोलती बोलती बंद करणारी, ‘ती परत आलीये’ची ‘ती’ नेमकी दिसते तरी कशी? पाहा ‘ती’चा फोटो…
सलमान खानने घेतली मीराबाई चानूची भेट, सोशल मीडियावर फोटो शेअर करताच झाला ट्रोल! पाहा नेमकं काय झालं…