Video : मालदीवमध्ये धमाल करताना सना खान पडली पाण्यात, नवऱ्याची रिअ‍ॅक्शन पाहून तुम्हालाही येईल हसू

सनानं अनेक फोटोंसह तिचा स्वतःचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती पाण्यात पडताना दिसतेय. (Sana Khan fell into the water while enjoying in Maldives, you will laugh when you see her husband's reaction)

Video : मालदीवमध्ये धमाल करताना सना खान पडली पाण्यात, नवऱ्याची रिअ‍ॅक्शन पाहून तुम्हालाही येईल हसू

मुंबई : बॉलिवूडमध्ये (Bollywood) आपल्या हॉटनेसनं एकेकाळी चाहत्यांना वेड लावणारी अभिनेत्री सना खान (Sana Khan) तिच्या लग्नानंतर पूर्णपणे बदलली आहे. तिनं 20 नोव्हेंबर 2020 रोजी अनसशी एका खाजगी समारंभात लग्न केलं. सनानं इन्स्टाग्रामवर तिच्या लग्नाचे फोटो शेअर करून सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं. अशा परिस्थितीत आता ती पतीसोबत सुट्टीसाठी मालदीवला गेली आहे. आता ती तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे. या फोटोंमध्ये तुम्ही तिच्या नवऱ्याला तिच्यासोबत पाहू शकता.

या फोटोंमध्ये सना स्विमिंग पूलमध्ये प्लास्टिकच्या बदकावर तरंगताना दिसतेय. सनानं या फोटोंसह स्वतःचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये, अनस त्याला विचारतो “तू मजा करत आहेस का?” यात सना बदकावर बसली आहे, ती अनसला सांगते की “होय, मजा येत आहे.” तिनं आपले शब्द पूर्ण करताच ती पाण्यात पडली. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. सनाच्या चाहत्यांनाही हा मजेदार व्हिडीओ प्रचंड आवडला आहे. सोबतच तिने तिचे अनेक सुंदर फोटोही शेअर केली आहेत ज्यात ती लंच करताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ (See Videos)

 

View this post on Instagram

 

A post shared by Saiyad Sana Khan (@sanakhaan21)

सनानं आता मनोरंजन विश्वाला पूर्णपणे निरोप दिला आहे. आता ती गृहिणी झाली आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवरून तिचे सर्व बोल्ड फोटो हटवले आहेत. सना अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे, ज्यात जय हो, हल्ला बोल, वजा तुम हो सारख्या अनेक मोठ्या चित्रपटांचा समावेश आहे. सना बिग बॉसच्या 6 व्या सीझनमध्येही दिसली होती. तिने या शोमधील सर्व स्पर्धकांना दमदार पद्धतीने हादरवून सोडले होतं. ती शेवटी शोमध्ये तिसरी फायनलिस्ट म्हणून बाहेर पडली. मात्र तिच्या लग्नानंतर तिनं स्वतःला बदललं आहे. ती सतत तिच्या कुटुंब आणि वैयक्तिक जीवनाशी संबंधित फोटो सोशल मीडियावर शेअर करते.

संबंधित बातम्या

Friday Release : ‘भुज’ ते ‘शांतित क्रांती’ या वेब सीरीज आणि चित्रपटातून होणार भरभरून मनोरंजन

Yeu Kashi Tashi Mi Nandayla |  स्वीटूला बघायला पुन्हा एकदा मुलाकडची मंडळी येणार, आता तरी मुलगी पसंत पडणार?

Bhuj The Pride of India Movie : ऑनलाईन कुठे आणि कसा पाहाल अजय देवगणचा ‘भुज’ चित्रपट? जाणून घ्या…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI