Devmanus | पत्नी वियोगाचं दुःख सहन होईना, ‘देवमाणूस’मधील ‘विजय’ने संपवले स्वतःचे आयुष्य!

रेश्मा ही मालिकेत पतपेढीचा मालक दाखवलेला विजय याची पत्नी असते. घर सोडून निघून गेलेल्या पत्नीला शोधत तो वणवण भटकत असतो. मात्र, आता आपल्या पत्नीच्या मृत्यची बातमी ऐकून तो सैरभैर झाल आहे. यामुळे त्याने थेट टोकाचा निर्णय घेत आपलं आयुष्यच संपवलं आहे.

Devmanus | पत्नी वियोगाचं दुःख सहन होईना, ‘देवमाणूस’मधील ‘विजय’ने संपवले स्वतःचे आयुष्य!

मुंबई : ‘देवमाणूस’ (Devmanus) ही मालिका सध्या एका निर्णायक टप्प्यावर आली आहे. या मलिकेत आता रेश्माचा मृतदेह अर्थात सांगाडा वाड्याच्या अंगणात सापडला आहे. रेश्मा ही मालिकेत पतपेढीचा मालक दाखवलेला विजय याची पत्नी असते. घर सोडून निघून गेलेल्या पत्नीला शोधत तो वणवण भटकत असतो. मात्र, आता आपल्या पत्नीच्या मृत्यची बातमी ऐकून तो सैरभैर झाल आहे. यामुळे त्याने थेट टोकाचा निर्णय घेत आपलं आयुष्यच संपवलं आहे.

पत्नीच्या मृत्युच्या बातमीने खचून गेलेला विजय भरपूर दारू पिऊन बज्या आणि नाम्याला भेटायला जातो. यावेळी ती आपलं मन हलकं करतो. अगदी शेवटच्या प्रवासाला निघाल्यासारखा तो सर्वांशी बोलतो. मात्र, तो आत्महत्या करेल हा विचार कुणाच्याही मनात येत नाही. यानंतर तो गावातील नदीवर जाऊन तिथे उडी घेत आपलं आयुष्य संपवतो. या दुःखद घटनेमुळे संपूर्ण गावाला धक्का बसला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Eknath Uddhavrao Gite (@eknath_gite)

वाड्यात सांगाड्यांचे सत्र

‘देवमाणूस’ (Devmanus) या मालिकेत आता देवी सिंग उर्फ डॉ. अजित कुमार देव याचे काळे कारनामे उघडकीस येण्यास सुरुवात झाली आहे. मालिका आता शेवटच्या टप्प्यावर आली असून, दोन दिवसांतच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. यामुळे आता कथानकाने देखील काहीसा वेग पकडला आहे. आता देवी सिंगचे सगळे गुन्हे एक-एक करून बाहेर पडणार असून, त्याला फाशीची शिक्षा होणार हे नक्की झालं आहे. रूपाच्या संगाड्यानंतर आता वाड्याच्या मागे आणखी एक सांगाडा सापडला आहे.

खेळता खेळता खजिना सापडणार म्हणून टोण्याने वाड्यामागची जमीन खणण्यास सुरुवात केली. या दरम्यान त्याला एका सांगाड्याचा हात दिसला. यामुळे घाबरलेल्या टोण्याने आरडा ओरड सुरु केली आणि पोलिसांना याची खबर लागली. आता पुन्हा एकदा पोलीस या वाड्यात येऊन सर्वाची चौकशी करणार आहेत.

कानातल्यांमुळे पटली ओळख

सांगाडा सापडल्याचे कळताच पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली. दरम्यान या सांगड्यासोबतच पोलिसांना एका स्त्रीचे कानातले देखील सापडले. हे कानातले रेश्माचे आहेत, त्यामुळे हा मृतदेह देखील तिचाच असल्याचे एका फोटोवरून सिद्ध झाले आहे. दुसरीकडे पोलिसांनी रेशमाचा पती विजय याला या घटनेची माहिती दिली असता, डॉक्टरच देवी सिंग असून, त्यानेच आपल्या पत्नीचा खूप केल्याचा आरोप विजयने केला आहे.

मालिकेचा शेवटच्या टप्प्याकडे प्रवास

छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’ (Devmanus) आता शेवटच्या प्रवासाकडे सुरु झाली आहे. मालिकेत आता आणखी काही नवे खुलासे होणार आहेत. या सगळ्यादरम्यान प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होणार आहे. मालिकेत मोठ्या ट्वीस्टसह डॉ. अजित कुमार देव उर्फ देवी सिंग आता पोलिसांच्या तावडीत सापडणार असून, त्याला कडक शिक्षा देखील होणार आहे. एका नव्या प्रोमोमध्ये देवीसिंग आपले सगळे गुन्हे कबुल करताना दिसला आहे. त्यामुळे आता त्याने स्वतःहून गुन्हे मान्य केल्याने त्याला फाशीच्या सुळाकडे नेले जात आहे. अर्थात या बोगस डॉक्टरला आता फासावर चढवले जाणार आहे.

हेही वाचा :

अजय देवगणचा बहुप्रतीक्षित ‘भुज द प्राईड ऑफ इंडिया’ प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या कसा आहे हा चित्रपट…

‘कैसे हो देवी और सज्जनो…’ पुन्हा एकदा कानी पडणार, ‘या’ दिवशी KBC प्रेक्षकांच्या भेटीला येणार!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI