AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs SCO Live Streaming : इंग्लंडसाठी करो या मरो सामना, स्कॉटलँड जिंकून पत्ता कट करणार?

England vs Scotland T20 World Cup 2026 Live Match Score : इंग्लंडसाठी स्कॉटलंड विरुद्ध होणारा सामान अस्तित्वाचा असणार आहे. त्यामुळे इंग्लंडची प्लेइग ईलेव्हन हॅरी ब्रूक याच्या नेतृत्वात कोणत्या रणनितीने मैदानात उतरते? तसेच कशी कामगिरी करते याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

ENG vs SCO Live Streaming : इंग्लंडसाठी करो या मरो सामना, स्कॉटलँड जिंकून पत्ता कट करणार?
England vs Scotland Live StreamingImage Credit source: England and Scotland Cricket X Account
| Updated on: Feb 13, 2026 | 11:09 PM
Share

इंग्लंड क्रिकेट टीमला आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत आतापर्यंत काही खास असं करता आलेलं नाही. इंग्लंडने या मोहिमेची विजयी सुरुवात केली. मात्र इंग्लंडला फार संघर्ष करावा लागला. इंग्लंडने तुलनेत लुख्ख्या असलेल्या नेपाळ विरुद्ध फक्त 4 धावांनी निसटता विजय मिळवला. इंग्लंडने या विजयासह आपली लाज राखली. मात्र इंग्लंड वेस्ट इंडिज विरुद्ध निष्प्रभ ठरली. इंग्लंडला आपल्या मोहिमेतील दुसऱ्या सामन्यात 2 वेळा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या वेस्ट इंडिज विरुद्ध पराभूत व्हावं लागलं. विंडीजने इंग्लंडवर 11 फेब्रुवारीला 30 धावांनी शानदार विजय मिळवला. विंडीजने सलग दुसऱ्या विजयासह इंग्लंडच्या पराभवाचं खातं उघडलं.

इंग्लंडसाठी करो या मरो स्थिती

इंग्लंडसमोर तिसऱ्या सामन्यात स्कॉटलंडचं आव्हान असणार आहे. इंग्लंडसाठी या सामन्यात करो या मरो अशी स्थिती आहे. इंग्लंडला स्पर्धेत कायम रहायचं असेल कर कोणत्याही स्थितीत हा सामना जिंकावाच लागणार आहे. स्कॉटलंड इंग्लंडच्या तुलनेत लिंबुटिंबू आहे. मात्र स्कॉटलंडला हलक्यात घेता येणार नाही. स्कॉटलंडने गेल्या सामन्यात इटलीवर 73 धावांनी दणदणीत असा विजय मिळवला. त्यामुळे स्कॉटलंडचा विश्वास दुणावलेला आहे. त्यामुळे इंग्लंडसाठी स्कॉटलंडला हलक्यात घेणं महागात पडू शकतं. इंग्लंडसाठी हा सामना आर या पार असल्याने या सामन्यात चढाओढ पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

इंग्लंड विरुद्ध स्कॉटलंड सामना कधी?

इंग्लंड विरुद्ध स्कॉटलंड सामना शनिवारी 14 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे.

इंग्लंड विरुद्ध स्कॉटलंड सामना कुठे?

इंग्लंड विरुद्ध स्कॉटलंड सामना कोलकातातील इडन गार्डनमध्ये खेळवण्यात येणार आहे.

इंग्लंड विरुद्ध स्कॉटलंड सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

इंग्लंड विरुद्ध स्कॉटलंड सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होईल. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.

इंग्लंड विरुद्ध स्कॉटलंड सामना टीव्ही-मोबाईलवर कुठे पाहायला मिळणार?

इंग्लंड विरुद्ध स्कॉटलंड सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर इंग्लंड विरुद्ध स्कॉटलंड सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.

इंग्लंडकडून प्लेइंग इलेव्हनची घोषणा

दरम्यान इंग्लंड टीमने स्कॉटलंड विरूद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनची घोषणा केली आहे. इंग्लंड विंडीज विरूद्ध खेळलेल्या त्याच 11 खेळाडूंसह मैदानात उतरणार आहे.

Follow Us
धाकधुक वाढली! शिवसेनेचं चिन्ह गोठणार की... वकील अनंत कळसेंचं विधान
धाकधुक वाढली! शिवसेनेचं चिन्ह गोठणार की... वकील अनंत कळसेंचं सुचक वक्तव्य, अखेर मोठी अपडेट समोर
मोठी बातमी! लाडकी बहिण योजनेबाबत मुख्यमंत्री फडणीसांचं मोठ विधान
मोठी बातमी! लाडकी बहिण योजनेतील अपात्रतेबाबत मुख्यमंत्री फडणीसांचं मोठं विधान; काय म्हणाले?
जुन्नरच्या अत्याचार प्रकरणावरून राऊतांचा फडणवीस, शिंदेंवर हल्लाबोल,
जुन्नरच्या अत्याचार प्रकरणावरून राऊतांचा फडणवीस, शिंदेंवर हल्लाबोल, अमृता फडणवीसांनाही म्हणाले...
उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार? अमित ठाकरे...
Pocket Money Scheme : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार? अमित ठाकरे म्हणाले..
श्रीमद्भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू टळतो; अजित पवारांचा उल्लेख करत...
श्रीमद्भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू टळतो; अजित पवारांचा उल्लेख करत डॉ. सूरदास यांनी काय काय सांगितलं?
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा