Farah Khan : तो माझ्या बेडवर येऊन बसला अन्…फराह खाननं सांगितलेला दिग्दर्शकाचा धक्कादायक अनुभव

Farah Khan Shares harassment incident : प्रसिद्ध दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खान हिने बॉलिवूडमध्ये सुरुवातीच्या काळात आलेल्या अनुभवांवर एका शोमध्ये मनमोकळेपणाने भाष्य केलं होतं. तिने एक थरारक अनुभवही यावेळी शेअर केला होता.

Farah Khan : तो माझ्या बेडवर येऊन बसला अन्...फराह खाननं सांगितलेला दिग्दर्शकाचा धक्कादायक अनुभव
फराह खानने सांगितलेला जुना किस्सा
Image Credit source: social media
| Updated on: Oct 25, 2026 | 7:38 PM

बॉलिवूड ही स्वप्नांची नगरी आहे. या दुनियेत जाण्यासाठी अनेक कलाकार झगडत असतात. पण इथं जाणं काही अजिबात सोपं नाही. या झगामगाटामागे अनेकांना चांगले वाईट अनुभव येतात. कोरिओग्राफर आणि दिग्ददर्शिका फराह खानही तिच्या बिनधास्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेमध्ये असते. तिने केलेलं एक जुनं वक्तव्य हे आता पुन्हा चर्चेमध्ये आलं आहे. आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळामध्ये आलेले अनुभव फराहने एका शोमध्ये सांगितले होते. तिने काजोल आणि ट्विंकल खन्नाच्या टू मच या शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी तिने सांगितले होते की, एका मोठ्या दिग्दर्शकाची तिच्यावर वाईट नजर होती. त्याने तिच्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्नही केल्याचा खळबळजनक दावा तिने या शोमध्ये बोलताना केला होता.

फराहने नेमकं काय सांगितलेलं?

मी तेव्हा या क्षेत्रामध्ये नवी होते. त्यामुळे आपल्याला संधी मिळावी असं आपल्या प्रत्येकाला वाटतं तसंच मलाही वाटायचं. मला मिळालेली प्रत्येक संधी मी अगदी गांभीर्याने घेत असे. एकदा मला असंच एका दिग्दर्शकाने स्क्रिप्टवर चर्चा करण्यासाठी बोलावलं. या चर्चेसाठी त्याने एका हॉटेलच्या रुममध्ये मला बोलावलं होतं. त्याच्या सांगण्यानुसार मी हॉटेलच्या रुममध्ये पोहोचले. पण पुढे जे घडलं ते भयानक होतं, असं फराहने सांगितलेलं.

Loading...

फराहच्या म्हणण्यानुसार पुढे सगळं वातावरणच फिरलं. तो दिग्दर्शक फराहच्या बेडवर बसायचा प्रयत्न करु लागला. मला तेव्हा माझी स्वतःची रक्षा करावी लागली आणि मी त्याला लाथ मारुन बाहेर हकललं असं फराहने सांगितंल होतं.

फराहने बॉलिवूडमधील अफेर्सवरही परखडपणे यावेळी भाष्य केलेलं. तिने सांगितलं की, ‘तो काळच असा होता की, अफेअर्स असणं हे खूप कॉमन होतं. मला कळायचंच नाही की एवढा वेळ लोक सेटवर कसेकाय घालवू शकतात? पण नंतर कळायला लागलं की बरेचजण त्यांच्या अफेअर्समुळे तिथे गुंतलेले असतात.’

करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यावर आलेल्या अनुभवांबाबत फराहने अशा गोष्टी आपल्याला झेलाव्या लागल्याबद्दल मनमोकळेपणानं या शोमध्ये संवाद साधला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us