महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सिनेमा पाहण्यासाठी नातवांसोबत, थेट फोटोग्रफार्सला दिली फोटोसाठी पोझ
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नातवांसोबत दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बॉलिवूडमध्ये दर आठवड्याला नवनवीन सिनेमे रिलीज होत असतात. कधी कॉमेडी कधी हॉरर तर कधी रोमँटिक सिनेमे असतात. शुक्रवारीही ‘प्रेम किटाणू’ हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाला प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करत असले तरी, सिनेमापेक्षाही एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ सिनेमातल्या कोणत्याही दृश्याचा नसून, आजोबा आणि नातवांच्या गोड नात्याचा आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आपल्या दोन नातवांसोबत ‘प्रेम किटाणू’च्या स्क्रिनिंगला पोहोचले होते. यावेळी त्यांनी दोन्ही नातवांचा हात धरून पापाराजीसमोर पोज दिली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातही त्याची चर्चा सुरू आहे. या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही हा व्हिडीओ पाहिला नसले तर नक्की पाहा…
वीर पाहारीयाच्या सिनेमाविषयी
‘प्रेम किटाणू’ हा सिनेमा अपूर्व सिंह कर्की यांनी दिग्दर्शित केला आहे. मुख्य भूमिकेत वीर पहारिया आहे, तर आफिया सय्यद अभिनेत्री आहे. सिनेमात राकेश बेदी, अपारशक्ती खुराणा आणि अर्नव रॉय यांसारखे दिग्गज अभिनेतेही आहेत. सुशीलकुमार शिंदे यांचा या सिनेमाशी थेट संबंध आहे. सिनेमातील मुख्य अभिनेता वीर पहारिया हा शिंदे यांचा नातू आहे. गुरुवारी सिनेमाचे विशेष स्क्रिनिंग झाले. त्यावेळी वीर पहारिया आपले आजोबा सुशीलकुमार शिंदे यांच्यासोबत स्क्रिनिंगला आला होता. त्याच्यासोबत त्याचा भाऊ शिखर पहारियाही होता.
सुशीलकुमार शिंदे यांचे नातू
८५ वर्षीय सुशीलकुमार शिंदे स्क्रिनिंगला येताना नातू वीरचा हात धरून आले. सुरुवातीला शिखर तेथे नव्हता. थोड्या वेळाने तो आल्यानंतर वीरने त्याला फोटोसाठी बोलावले. त्यानंतर दोन्ही नातवांनी आजोबांचा हात धरून फोटो काढला. या फोटोतून आजोबा-नातवांचे सुंदर नाते स्पष्टपणे दिसून आले. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.