Katrina Kaif: कतरिनाचं वाढलेलं वजन, हिणवणाऱ्यांवर संतपल्या माजी खासदार, पोस्ट करत चांगलंच सुनावलं

Katrina Kaif: अभिनेत्री कतरिना कैफ हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीचं वजन वाढलेलं दिसत असल्यामुळे अनेकांना तिला ट्रोल केलं. ज्यावर महिला खासदाराने ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे.

Katrina Kaif: कतरिनाचं वाढलेलं वजन, हिणवणाऱ्यांवर संतपल्या माजी खासदार, पोस्ट करत चांगलंच सुनावलं
Katrina Kaif
| Updated on: Sep 20, 2026 | 8:55 AM

Katrina Kaif: अभिनेत्री कतरिना कैफ हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांच मनोरंजन केलं. पण गेल्या काही महिन्यापासून कतरिना रुपेरी पडद्यापासून दूर आहे. सांगायचं झालं तर, नोव्हेंबर 2025 मध्ये कतरिना हिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. मुलगा वियानच्या जन्मानंतर अभिनेत्रीच्या दिसण्यावरून चर्चा सुरू झाली. कतरिनाचं बॉडी शेमिंग करण्यात आलं. कतरिना हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यावर अनेकांनी अभिनेत्रीला वाढलेल्या वजनामुळे ट्रोल केलंय. यावर माजी राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.

माजी राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्ट शेअर करत म्हणाल्या, ‘प्रिय महिलांनो… वजन वाढणं किंवा कमी होणं, वय, दिसणं, शरीरयष्टी किंवा त्वचा यांवर टिप्पणी करण्याइतका ज्यांच्याकडे फावला वेळ आहे, अशा लोकांना त्याबद्दल काहीही स्पष्टीकरण देण्याची तुम्हाला गरज नाही.’

 

पुढे प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या, ‘आज कतरिना असो, किंवा उद्या दुसरी कोणती व्यक्ती असो… आपण कोणालाही स्पष्टीकरण देण्यास बांधील नाही; कारण हे आपलं स्वतः आयुष्य, आपलं शरीर आणि आपल्या निवडी आहेत.’, सध्या सर्वत्र प्रियांका चतुर्वेदी यांची पोस्ट व्हायरल होत आहे. त्यांच्या पोस्टवर देखील अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.

याआधी पाकिस्तानी अभिनेता अली जफर याने कतरिना हिची बाजू मांडत ट्रोल करणाऱ्यांवर निशाणा साधला. अभिनेता हृतिक रोशन, सलमान खान, अभिनेत्री खुशबू सुंदर यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. सध्या कतरिना सर्वत्र चर्चेत आली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us