Govinda: घरात कलेश बाधा..; गोविंदाने मुलांसोबत गणपतीसमोर केली प्रार्थना, पत्नी मात्र गायब

यंदाच्या गणेशोत्सवात गोविंदाने मुलगा आणि मुलीसोबत बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यांच्या या कौटुंबिक क्षणांची सोशल मीडियावर चर्चा होत असून त्याची पत्नी सुनीता आहुजा मात्र यावेळी दिसली नाही.

Govinda: घरात कलेश बाधा..; गोविंदाने मुलांसोबत गणपतीसमोर केली प्रार्थना, पत्नी मात्र गायब
गोविंदा- सुनीता अहुजा आणि त्यांची मुलं
Image Credit source: ANI
| Updated on: Sep 15, 2026 | 10:09 AM

Govinda: बॉलिवूडचा ‘हिरो नंबर 1’ अर्थात अभिनेता गोविंदाच्या घरी यंदाही गणरायाचं मोठ्या भक्तिभावाने स्वागत करण्यात आलं. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गोविंदाने मुलगा यशवर्धन अहुजा आणि मुलगी टीना अहुजा यांच्यासोबत बाप्पाची पूजा केली. या सेलिब्रेशनचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. मात्र, या कौटुंबिक सोहळ्यात गोविंदांची पत्नी सुनीता आहुजा दिसली नाहीी. त्यामुळे सुनीताच्या अनुपस्थितीची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. गणेश चतुर्थी हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बॉलिवूडमधील अनेक कलाकार दरवर्षी आपल्या घरी गणपती बाप्पाची स्थापना करतात. गोविंदाच्याही कुटुंबात गणेशोत्सवाला विशेष महत्त्व आहे. यंदा त्याने त्याच्या मुलांसोबत गणरायाची मनोभावे पूजा केली.

मात्र, या सेलिब्रेशनमधील सर्वात चर्चेचा मुद्दा ठरला तो म्हणजे सुनीता आहुजाची अनुपस्थिती. गोविंदा आणि सुनीता यांच्या वैवाहिक नात्याबाबत गेल्या काही काळात विविध चर्चा सोशल मीडियावर होत आहेत. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गोविंदा मुलांसोबत दिसला, पण सुनीता त्यांच्यासोबत नसल्याने चाहत्यांमध्ये पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

यावेळी ‘एएनआय’शी बोलताना गोविंदाने त्याचे कुटुंबासोबतचे संबंध चांगले राहावेत यासाठी प्रार्थना केली. तो म्हणाला, “या शुभप्रसंगी मी प्रार्थना करतो की कोणतेही संघर्ष किंवा अडथळे येऊ नयेत. आम्हाला रिद्धी सिद्धी प्राप्त व्हावी. ही परंपरा माझ्या आईच्या आशीर्वादाने माझ्या कुटुंबात सुरू झाली. मी अनेक वर्षे ती पाळली, पण आता यश ते पुढे नेत आहे. मी प्रार्थना करतो की यशला चांगलं भाग्य लाभो. टीनाला खूप चांगला नवरा मिळो आणि तिला रिद्धी-सिद्धीचा आशीर्वाद प्राप्त होवो.”

पहा व्हिडीओ-

“वय आणि कंबर यांबद्दल चर्चा करू नका. देव टीनाला चांगलं कुटुंब देवो. यशने ज्याप्रकारे आमच्या कुटुंबाचा वारसा पुढे नेला आहे, त्यात त्याला यश मिळो. लोकांनी म्हणावं की तो गोविंदापेक्षाही चांगला आहे. त्याला कधीच कशाची कमतरता भासू नये. तो कधीही दु:खी होऊ नये”, असं तो पुढे म्हणाला. यापूर्वी सुनीता अहुजाने गणपतीच्या पूजेला गोविंदाच्या अनुपस्थितीवर प्रतिक्रिया दिली होती. एएनआयशी बोलताना ती म्हणाली, “गोविंदा अमेरिकेला गेला आहे आणि आज रात्री परत येईल. जर तो थकला असेल तर तो आज येणार नाही. तो उद्या येईल. हे त्याचं घर आहे, त्यामुळे त्याला यावंच लागेल.”

गेल्या काही काळापासून गोविंदा आणि सुनीता यांच्या घटस्फोटाच्या चर्चा होत्या. सुनीताने गोविंदावर अनेक गंभीर आरोप केले होते. गोविंदाचे विवाहबाह्य संबंध आहेत आणि तो मुलांसाठी चांगला वडील नाही.. असंही सुनीताने म्हटलं होतं. हे प्रकरण न्यायालयातही पोहोचलं होतं. सुनीताने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता, पण नंतर तो मागे घेतला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us