हृदयविकाराच्या झटक्याने गोविंदाच्या पुतण्याचा मृत्यू

मुंबई : अभिनेता गोविंदाचा पुतण्या जन्मेंद्र अहुजाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय. सकाळी अचानक जन्मेंद्रला त्रास सुरु झाला आणि तो खाली पडला. यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, पण तिथे जाईपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली, अशी माहिती गोविंदाच्या नातेवाईकांकडून देण्यात आली. जन्मेंद्र मुंबईतील वर्सोव्यात राहत होता. गुरुवारी दुपारी पवन हंस स्मशानभूमीत जन्मेंद्रवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गोविंदा, […]

हृदयविकाराच्या झटक्याने गोविंदाच्या पुतण्याचा मृत्यू
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:35 PM

मुंबई : अभिनेता गोविंदाचा पुतण्या जन्मेंद्र अहुजाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय. सकाळी अचानक जन्मेंद्रला त्रास सुरु झाला आणि तो खाली पडला. यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, पण तिथे जाईपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली, अशी माहिती गोविंदाच्या नातेवाईकांकडून देण्यात आली. जन्मेंद्र मुंबईतील वर्सोव्यात राहत होता.

गुरुवारी दुपारी पवन हंस स्मशानभूमीत जन्मेंद्रवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गोविंदा, त्याचा मुलगा यशवर्धन, भाचा कृष्णा आणि इतर नातेवाईक यावेळी उपस्थित होते.

जन्मेंद्र अहुजा हा गोविंदाचा भाऊ किर्ती कुमार यांचा मुलगा होता. जन्मेंद्र अहुजाने 2007 मध्ये जहा जायेंगे हमे पायेंगे या सिनेमाचं दिग्दर्शनही केलं होतं, ज्यात गोविंदा प्रमुख भूमिकेत होता, तर कादर खान ज्यांचं नुकतंच निधन झालंय, त्यांचीही भूमिका होती. जन्मेंद्रने गोविंदाच्या प्यार दिवाना होता है या सिनेमात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं.

गोविंदा गेल्या आठवड्यात रिलीज झालेल्या रंगीला राजा या सिनेमात दिसला होता. सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी या सिनेमाची निर्मिती केली होती. गोविंदाने मोठ्या कालावधीनंतर 2017 मध्ये आ गया हिरो या सिनेमातून कमबॅक केलं होतं.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.