
Guess Who: बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री पदार्पण करतात, पण सगळ्याच अभिनेत्रींना प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळत नाही. अशात मोठ्या पडद्यावर यश न मिळाल्यामुळे अभिनेत्री सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याच्या मागे लागतात. तेव्हा अभिनेत्री त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतात. आता देखील अशात एका अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, जिने स्वतःच्या मृत्यूचं नाटक केलं. ज्यामुळे चाहत्यांना मोठा फटका बसलेला. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री पूनम पांडे आहे… पूनम कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते..
पूनम पांडे हिचं पहिल्यांदा नाव चर्चेत आलं जेव्हा, तिने वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तिने क्रिकेटबद्दल एक विधान केलं ज्याने देशाचं लक्ष वेधून घेतलं. जर भारताने क्रिकेट विश्वचषक जिंकला तर ती न्यूड फोटोशूट करेल असं तिने जाहीर केलेलं. या विधानामुळे ती रातोरात सोशल मीडियावर व्हायरल झाली. असं काही झालं नसलं तरी, त्यानंतर तिच्या विधानावर मोठ्या प्रमाणात टीका झाली.
पूनम हिने अनेक शो आणि सिनेमांच्या माध्यमातून रिऍलिटी शोमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला. ‘नशा’ सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. पण तिला अधिक यश मिळालं नाही… पण सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली… पूनम हिने अनेकदा सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना थक्क केलं आहे…
पूनम कायम तिच्या वादग्रस्त कारणामुळे चर्चेत राहिली. पण तिने स्वतःच्या मृत्यूचं नाटक रचलं. काही महिन्यांपूर्वी, सोशल मीडियावर तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून बातमी समोर आली की, सर्व्हायकल कॅन्सरमुळे अभिनेत्रीचं निधन झालं. ज्यामुळे चाहत्यांना देखील मोठा फटका बसला… पण, दुसऱ्याच दिवशी पूनम पांडे स्वतः पुढे आली आणि म्हणाली की हे सर्व सर्व्हायकल कॅन्सरबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या मोहिमेचा एक भाग आहे.
या घटनेनंतर पूनम हिला खूप ट्रोलिंगचा सामना करावा लागला. अनेकांनी म्हटलं की, स्वतःच्या मृत्यूचं नाटक करणं हा जागरूकता पसरवण्याचा योग्य मार्ग नाही, तर काहींनी तिचे हे पाऊल लक्ष वेधण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले. पूनम कायम सोशल मीडियावर पोस्ट शेअर चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असते.