Bigg Boss 20 : ‘बिग बॉस’ च्या या स्पर्धकाला बनायचं होतं ट्रक ड्रायव्हर, अवघ्या अर्ध्या तासात..

बिग बॉस २० मध्ये सहभागी झालेल्या या स्पर्धकाने एकेकाळी ट्रक ड्रायव्हर बनण्याचं पाहिलं होतं. त्याने अवघ्या अर्ध्या तासात पहिली नोकरी सोडली. नंतर शेफ बनून रीलस्टार झालेल्या गुल्लूचा प्रवास थक्क करणारा आहे. सलमान खानच्या शोमधील त्याचा प्रवास आता कसा असेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Bigg Boss 20 : ‘बिग बॉस’ च्या या स्पर्धकाला बनायचं होतं ट्रक ड्रायव्हर, अवघ्या अर्ध्या तासात..
Bigg Boss Contestant
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 07, 2026 | 7:47 PM

टीव्हीवरचा बहुचर्चित रिॲलिटी शो ‘बिग बॉस’ (Bigg Boss 20) सुरू झाला असून यंदा या शोचा हा 20 वा सीझन आहे. नेहमीप्रमाणे विविध सेलिब्रिटी स्पर्धकांची या शोमध्ये रेलचेल असून अभिनेता सलमान खान त्याच्या शानदार , दबंग अंदाजात शोचं सूत्रसंचालन करतोय. यावेळी बिग बॉसमध्ये अनेक विशेष, रंजक चेहरे दिसत असून प्रत्येक स्पर्धकाची आपापली वेगळीच कहाणी देखील आहे. पण या स्पर्धकांमध्ये एक व्यक्ती अशी देखील आहे, ज्याचं आयुष्य आणि त्याचा प्रावस खूपच रंजक, इंटरेस्टिंग होता. एकेकाळी तो ट्रक ड्रायव्हर बनण्याचं स्वप्न पहात होता. त्याच्या पहिल्या नोकरीचा अनुभवही असा होता की अवघ्या अरअध्या तासात त्याने नोकरीच सोडून दिली. तो स्पर्ध आहे तरी कोण, असं काय घडलं त्याच्या आयुष्यात ? चला जाणून घेऊया..

‘गुल्लू’ ने सांगितली कहाणी

सलमान खानच्या ‘बिग बॉस 20’ मध्ये कुशाल तंवर उर्फ गुल्लू हा स्पर्धक म्हणून आलाय. नुकताच त्याचा एक व्हिडीओ समोर आलाय, त्यामध्ये तो कनिका मानशी संवाद साधताना दिसला. या व्हिडीओत कनिकाने त्याल विचारलं की तू सर्वात आधी काय काम केलंस ? त्यावर गुल्लूने उत्तर दिलं की, कॉलेजनंतर जवलपास तीन वर्ष मी काहीच केलं नाही, कारण ट्रक ड्रायव्हर बनणं माझं स्वप्न होतं. मला माझा स्वत:चा ट्रक विकत घेऊन कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया मध्ये काम करायचं होतं. पण माझा व्हिसा रिजेक्ट झाला, असं त्याने नमूद केलं.

नंतर मला गुरुग्राम मध्ये एक जॉब मिळाला, पण मी फक्त अर्धा तास नोकरी केली. मला वाटलं होतं की फार काम नसेल.. बॅकएंडला जाऊन फक्त लॅपटॉपवर काम करायचंय आणि दुसऱ्यांकडून काम करून घ्यायचं. असं कामाचं स्वरूम माझ्या डोक्यात होतं. पण पहिल्याच दिवशी गेल्यावर त्यांनी मला बूट दिले आणि सांगितलं की कस्टमर आलेत, त्यांना दाखवून ये. काही वेळाने मी तोच डब्बा मॅनेजरच्या हातात सोपवला आणि तिथून तडक निघालो. त्यानंतर मी शेफ बनण्यासाठी अडीच महिने गोव्याला गेलो. मग तिथेच मी रील बनवण्यास सुरूवात केली, असं गुल्लूने सांगितलं.

 

‘बिग बॉस 20’ चे स्पर्धक

यंदा सलमान खानच्या ‘बिग बॉस’ वेगवेगळे स्पर्धक आहेत. कनिका मान, आसिफ खान, काजी तौकीर, आम्रपाली दुबे, ईशा रिखी, रोहद खान, लव गिल, हर्ष, अरिशफा खान, कुशाल, अमन गांधी, उदिति सिंह, रीति तिवारी, माही विज, मेरी कोम आणि गेमिंग क्रिएटर स्काउट अर्थात तन्मय सिंहने या लोकांनी शोमध्ये सहभाग घेतला आहे. बिग बॉसची जोरदार चर्चा असून त्याचे रोजचे भाग पाहण्यास अनेक चाहते उत्सुक आहेत.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us