वर्षभरातच दुसऱ्यांदा हार्दीक पांड्याचं तुटलं नातं? गर्लफ्रेंडने केला ब्रेकअप?

हार्दिक पांड्याचा पुन्हा ब्रेक झाल्याचे म्हटले जात आहे. त्याची गर्लफ्रेंड जस्मिनने त्याला अनफॉलो केल्याचे म्हटले जात आहे.

वर्षभरातच दुसऱ्यांदा हार्दीक पांड्याचं तुटलं नातं? गर्लफ्रेंडने केला ब्रेकअप?
Hardik Pandya
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 19, 2025 | 12:14 PM

भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्याचा नताशा स्टॅनकोव्हिकसोबत घटस्फोट झाल्यानंतर मॉडेल जस्मिन वालियासोबत नाव जोडलं जात होतं. जस्मिनला हार्दिकच्या संघाच्या सामन्यांदरम्यान अनेकदा स्टेडिअममध्ये पाहिलं गेलं होतं. ही रूमर्ड जोडी एकमेकांना सोशल मीडियावर फॉलो देखील करत होती, परंतू आता त्यांनी एकमेकांना अनफॉलो केलं आहे, ज्यामुळे त्यांच्या ब्रेकअपची चर्चा सुरू झाली आहे.

एक्स-वाइफ नताशासोबत घटस्फोटानंतर जस्मिनशी नाव जोडलं गेलं

नताशा स्टॅनकोव्हिकसोबत घटस्फोटानंतर हार्दिक पांड्याचं नाव जस्मिन वालियासोबत जोडलं जात होतं. चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान जस्मिन वालियाला स्टेडिअममध्ये सामना पाहताना पाहिलं गेलं होतं, त्यानंतर तिचं नाव सतत भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्याशी जोडलं जात होतं. जस्मिनला हार्दिकच्या संघाच्या सामन्यांदरम्यान वारंवार पाहिलं गेलं होतं आणि तिला मुंबई इंडियन्सच्या संघाच्या बसमध्येही स्पॉट करण्यात आलं होतं. गेल्या काही महिन्यांपासून या जोडीच्या डेटिंगच्या चर्चा होत्या, परंतू आता या रूमर्ड जोडीने एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केलं आहे, ज्यामुळे त्यांच्या ब्रेकअपचे अंदाज बांधले जात आहेत.

वाचा: राजकीय परिवारात जन्म घेता म्हणून दादागिरीचे लायसन घेऊन येता का?; रोहित पवारांविरुद्ध पोलीस आक्रमक

हार्दिक आणि जस्मिनने एकमेकांना अनफॉलो केलं

हार्दिक पांड्या आणि जस्मिन वालियाने एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे, ज्यामुळे त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं आहे. एका चाहत्याने रेडिटवर कमेंट करत याकडे सर्वांचं लक्ष वेधलं की दोघांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे. रेडिट युजरने लिहिलं, ‘हार्दिक पांड्या आणि जस्मिन वालियाने एकमेकांना अनफॉलो केलं? मी नुकतंच पाहिलं की त्यांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं आहे. काय चाललंय?’.

हार्दिक आणि जस्मिन यांच्यातील अनफॉलो

हार्दिक पांड्या आणि जस्मिन वालियाने एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे, परंतु त्यांनी त्यांच्या डेटिंगच्या बातम्यांवर कधीही कोणतंही भाष्य केलं नव्हतं आणि आता ब्रेकअपच्या चर्चांवरही त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. विशेष म्हणजे, हार्दिक आणि जस्मिनच्या ग्रीस व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर लीक झाल्याने त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना आणखी बळ मिळालं होतं.

जस्मिन वालिया कोण आहे?

जस्मिन वालिया ही एक ब्रिटिश गायिका आणि मॉडेल आहे. तिचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. ती भारतीय वंशाची आहे. तिने ब्रिटिश रियालिटी टीव्ही सिरीज ‘द ओन्ली वे इज एसेक्स’ (TOWIE) मध्ये भाग घेतला होता. या शोमुळे तिला लोकप्रियता मिळाली. तिने 2010 मध्ये या शोमध्ये एक्स्ट्रा म्हणून सुरुवात केली होती, परंतू लवकरच तिने स्वतःची ओळख निर्माण केली आणि 2012 पर्यंत ती शोचा पूर्णपणे भाग बनली. या लोकप्रिय रिअॅलिटी शोमधील तिच्या सहभागाने तिला एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्यास मदत झाली आणि तिला संगीतासह इतर सर्जनशील क्षेत्रांमध्ये संधी शोधण्यास प्रोत्साहन मिळालं.