AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संगीतकार गाणं रचताना रडले, मेणबत्तीच्या उजेडात लिहिलं गाणं, थिएटरमध्ये प्रेक्षकही अश्रूंना आवरू शकले नाहीत; काय होतं त्या गाण्यात?

1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिलवाले’ चित्रपटातील ‘जीता था जिसके लिए’ हे गाणं आजही 90च्या दशकातील लोकप्रिय गाण्यांपैकी एक म्हणून आठवलं जातं. या गाण्याच्या निर्मितीमागेही एक भावुक किस्सा आहे.

संगीतकार गाणं रचताना रडले, मेणबत्तीच्या उजेडात लिहिलं गाणं, थिएटरमध्ये प्रेक्षकही अश्रूंना आवरू शकले नाहीत; काय होतं त्या गाण्यात?
song newsImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 30, 2026 | 9:40 PM
Share

90 च्या दशकातील अनेक गाणी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. त्यापैकीच एक म्हणजे ‘जीता था जिसके लिए’1994 मध्ये आलेल्या दिलवाले या चित्रपटातील हे गाणं. आज या गाण्याला 32 वर्ष उलटूनही कित्येक लोकांच्या जुन्या आठवणी आणि प्रेमाच्या भावनांशी हे गाणं जोडलेलं आहे. विशेष म्हणजे हे गाणं तयार होताना या गाण्याचे संगीतकारांनाही अश्रू अनावर झाले होते.

जीता था जिसके लिए या गाण्यावर काम करण्यासाठी नदीम- श्रवण आणि गीतकार समीर अजजान एकत्र बसले होते. गाण्याची संकल्पना आणि त्याचे शब्द यावर चर्चा सुरू होती. त्याच वेळी अचानक लाईट गेली. त्यामुळे समीर यांनी हे गाण दुसऱ्या दिवशी तयार करू असं सुचवलं.

पण नदीम – श्रवण यांनी लाईट गेल्यानंतरही गाण्याचं काम पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मते त्या क्षणी मनात असलेली भावना आणि गाण्याचा दर्द नंतर तसाच निर्माण होईल की नाही याची त्यांना खात्री नव्हती. आता माहोल तयार झालाच आहे, तर गाणं पूर्ण करूनच जाऊ असे नदीम आणि श्रवण यांनी ठरवले.

अन् मेणबत्तीच्या प्रकाशात लिहिलं गेलं अजरामर गाणं

वीज नसल्यामुळे मेणबत्या पेटवल्या. एकीकडे मंद प्रकाश,शांत वातावरण, आजूबाजूला काळोख आणि त्यात येणारे प्रेमाचे विचार जणू काही माहोलच.. त्यातच संगीतकारांनी प्रेमाच्या विषयावर बोलण्यास सुरूवात केली. मग त्यात प्रेमाची पहिली भेट, प्रेमाची ओढ, प्रेमातल्या लाडीगोडी अगदी प्रेमाचा विरह सुद्धा.या सगळ्या चर्चांमुळे वातावरणात वेगळीच नशा चढली.

या गाण्याच्या चर्चेदरम्यान नदीम – श्रवण यांनी समीर यांना त्यांच्या स्वत:च्या प्रेमकहाणीबद्दल विचारले आणि त्याच क्षणी त्यांच्या डोक्यात गाण्याची पहिली ओळ आली आणि ती म्हणजे जीता था जिसके लिए, जिसके लिए मरता था, एक ऐसी लडकी थी, जिसे मे प्यार करता था….सगळ्यांना ही ओळ प्रचंड आवडली. त्यानंतर या एका ओळीला पकडून काही मिनिटांतच संपूर्ण गाणं तयार करण्यात आलं.

गाण लिहिताना आणि संगीत देताना तिघेही रडले

जसजसे गाण्याचाी कडवी लिहिली जात होती. त्याच वेळी गाण्याची धूनही तयार करण्यात आली. गाण्यात असणारा प्रेमाचा विरह, वेदना यामुळे तिघांनाही अश्रू अनावर झाले. गाणं तयार झाल्यानंतर सगळ्यांच्या डोक्यात एकच प्रश्न आला,आपण तर गाणं लिहिताना रडलोय पण प्रेक्षकांच काय? त्यांना हे गाणं कितपत आवडेल,हेच तपासण्यासाठी तिघेही थिएटरमध्ये गेले होते. गाणं लिहिताना संगीतकारांच्या मनात ज्या भावना होत्या, अश्रू तरळत होते. त्याच भावना आणि तेच अश्रू प्रेक्षकांच्याही डोळ्यात आले आणि सिनेमा सुपरहिट ठरला.

कुमार सानू आणि अलका यांचा आवाज या गाण्याला लाभला होता

जीता था जिसके लिए हे गाणं कुमार सानू आणि अलका यांनी गायलं आहे. दिलवाले या चित्रपटातील या गाण्याला नदीम- श्रवण यांनी संगीत दिलं असून समीर अजनान यांनी गीत दिलं आहे. 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अजय देवगण, रवीना टंडन, सुनील शेट्टी हे प्रमुख भूमिकेत होते

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...