Imran Khan : इम्रान खानची देश सोडण्याची नोटीस, गर्लफ्रेंडची पहिली पोस्ट, ‘तो’ फोटो पोस्ट करत म्हणतेय…

Imran Khan : सीजेपी आंदोलनात सहभागी झाल्यानंतर अभिनेता इम्रान खान आणि त्याच्या गर्लफ्रेंडच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. आता अभिनेत्याला देश सोडून जाण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे... यावर लेखा हिची पहिली पोस्ट समोर आली आहे.

Imran Khan : इम्रान खानची देश सोडण्याची नोटीस, गर्लफ्रेंडची पहिली पोस्ट, तो फोटो पोस्ट करत म्हणतेय...
Imran Khan
| Updated on: Oct 16, 2026 | 1:00 PM

Imran Khan : बॉलिवूड अभिनेता इम्रान खान याला 28 ऑक्टोबर पर्यंत भारत सोडण्यास सांगितलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या आंदोलनानंतर इम्रान याला भारत सोडण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. इम्रान हा अमेरिकन नागरिक आहे. आता या नोटीसनंतर अभिनेता आता हायकोर्टाचा दरवाजा ठोठावणार आहे.. दरम्यान, इम्रानची गर्लफ्रेंड लेखा वॉशिंगटन हिने असा फोटो पोस्ट केला आहे, ज्याने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. एवढंच नाहीतर, लेखा हिने पोलिसांच्या व्हॅनमधील एक फोटो पोस्ट करत प्रेम व्यक्त केलं आहे.

लेखा हिने 16 ऑक्टोबर रोजी इन्स्टाग्रा अकाऊंटवर इम्रान खान याच्यासोबत पोलिसांच्या व्हॅनमधील फोटो पोस्ट केले आहे. हा फोटो तेव्हाचा आहे, जेव्हा सीजेपी आंदोलनादरम्यान पोलिसांनी इम्रान आणि त्याच्या गर्लफ्रेंडला अटक केली, फोटो पोस्ट करत लेखा हिने हार्टचे काही इमोजी कॅप्शनमध्ये दिले आहे. फोटो पाहिल्यानंतर कळत आहे की, तिने इम्रान याचं समर्थन केलं आहे. याआधी किरण राव हिने देखील सध्याच्या परिस्थितीवर नाराजी व्यक्त केली.

Loading...

आंदोलनादरम्यान इम्रान आणि लेखा यांना घेतलेलं ताब्यात

सांगायचं झालं तर, 10 ऑक्टोबर रोजी मुंबई येथे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी आंदोलन करण्यात आलं होतं. हे आंदोलन ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) शी संबंधित आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी आयोजित करण्यात आल होतं. इम्रान या आंदोलनामध्ये गर्लफ्रेंड लेखा वॉशिंगटन आणि चुलत बहीण झायन मेरी खान यांच्यासह पोहोचलेला होते. यादरम्यान पोलिसांनी इम्रानसह अनेक जणांना ताब्यात घेतलं. नंतर त्यांना सोडून देण्यात आले.

 

 

ताब्यातून सुटका झाल्यानंतर लेखाने सोशल मीडियावरून आपल्या अनुभवाबद्दलही लिहिले . तिने आरोप केला, अधिकाऱ्यांनी तिला आणि झायनला पकडलं, ज्यामुळे त्यांना दुखापत झाली. लेखाच्या म्हणण्यानुसार, यानंतर त्यांना गाडीत बसवून काही तास इकडे-तिकडे फिरवलं गेलं आणि नंतर सार्वजनिक वाहतूक वापरण्यापासूनही रोखण्यात आलं.

इम्रान खान यांना भारत सोडण्याची नोटीस का मिळाली?

इम्रान खान हा अमेरिकन नागरिक आहे आणि त्यांच्याकडे ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया (OCI) कार्ड आहे. 15 ऑक्टोबर रोजी मुंबईच्या परदेशी क्षेत्रीय नोंदणी कार्यालयाने (FRRO) अभिनेत्याला 28 ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस जारी केली. भाजप नेते किरीट सोमैया यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली, ज्यामध्ये इम्रान यांच्या निदर्शनांमध्ये सहभागी होण्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us