हिरो-हिरोईनने सगळ्या मर्यादा… 4 मिनिटांच्या जुन्या रोमँटिक गाण्याला 2026 मधेही तुफान पसंती; रिल्सवर प्रचंड व्हायरल

In the Night No Control Viral Trend : इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या 90च्या दशकातील एका गाण्याची जोरदार चर्चा आहे. या गाण्यावर रील्स बनवण्याचा ट्रेंड पाहायला मिळत असून लाखो लाईक्स अन् व्ह्यूज मिळत आहेत.

हिरो-हिरोईनने सगळ्या मर्यादा... 4 मिनिटांच्या जुन्या रोमँटिक गाण्याला 2026 मधेही तुफान पसंती; रिल्सवर प्रचंड व्हायरल
in the night no control song viral trend
Image Credit source: social media
| Updated on: Sep 24, 2026 | 12:04 AM

सध्या इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक वेगळाच ट्रेंड पाहायला मिळत आहे. ९० च्या दशकातील एका अत्यंत बोल्ड आणि ग्लॅमरस ट्रॅकवर अनेक रील स्टार्स आपले आकर्षक व्हिडीओ बनवत आहेत. विशेष म्हणजे, या व्हिडिओंना रातोरात लाखो-करोडो व्ह्यूज मिळत आहेत. आजची तरुण पिढी, ज्यांनी ९० चा तो सुवर्णकाळ कदाचित पाहिलाही नसेल, तेही या ट्रॅकच्या भन्नाट म्युझिक आणि स्वॅगवर थिरकत आहेत. यावरून एक गोष्ट नक्की सिद्ध होते की, जुन्या क्लासिक गाण्यांची जादू आणि त्यांची भुरळ कधीच ओसरत नाही. आपल्या मॉडर्न बीट्स आणि जबरदस्त ॲटिट्यूडमुळे हे रेट्रो गाणे सध्या इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे.

तरुणाईला वेड लावणारे हे व्हायरल गाणे दुसरे तिसरे कोणतेही नसून, १९९६ साली प्रदर्शित झालेल्या ‘खिलाडियों का खिलाडी’ या सुपरहिट चित्रपटातील ‘इन द नाईट नो कंट्रोल’ हे आहे. तब्बल २९ वर्षांनंतरही या गाण्याची क्रेझ तसूभरही कमी झालेली नाही. या गाण्याचे सर्वात मोठे आणि लक्षवेधी वैशिष्ट्य म्हणजे बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि सदाबहार अभिनेत्री रेखा यांची भन्नाट ऑनस्क्रीन केमिस्ट्री. दोघांच्या वयात मोठे अंतर असूनही, त्यांनी आपल्या सिझलिंग आणि कॉन्फिडंट परफॉर्मन्सने संपूर्ण देशाला वेड लावले होते. अनु मलिक यांचे हटके संगीत आणि सुमित्रा अय्यर यांच्या दमदार आवाजाने या गाण्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले.

उमेश मेहरा दिग्दर्शित ‘खिलाडियों का खिलाडी’ हा त्या काळातील एक प्रचंड गाजलेला ब्लॉकबस्टर चित्रपट होता. या चित्रपटात रेखा यांनी अत्यंत ताकदीने साकारलेली ‘माया’ ही खतरनाक अंडरवर्ल्ड डॉनची व्यक्तिरेखा आणि अक्षय कुमारचा जबरदस्त ॲक्शन अवतार प्रेक्षकांना खूप भावला होता. त्या काळात हे गाणे त्याच्या धाडसी संकल्पनेमुळे, बोल्ड लिरिक्स आणि हॉलिवूड स्टाईल कॅमेरा वर्कमुळे प्रचंड चर्चेत राहिले. आजच्या काळातही जेव्हा हे गाणे एखाद्या रीलच्या माध्यमातून आपल्या स्मार्टफोनच्या स्क्रीनवर झळकते, तेव्हा त्यामधील कलाकार कोणीही असले तरी मात्र अक्षय-रेखा यांचे चेहरे आपल्याला आठवल्याशिवाय राहत नाहीत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us