रोल करताना त्याने स्ट्रेट मला फॉलो केलं आणि… ,लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबद्दल अशोक सराफांचं मोठं वक्तव्य

लक्ष्मीकांतं बेर्डे यांनी अनेक सिनेमांमध्ये आपल्या विनोदबुद्धीने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आजही त्यांना कोणी विसरु शकलेले नाही, अशात अशोत सराफ यांनी दिवंगत अभिनेत्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र अशोक सराफ यांच्या वक्तव्याची चर्चा सुरु आहे.

रोल करताना त्याने स्ट्रेट मला फॉलो केलं आणि... ,लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबद्दल अशोक सराफांचं मोठं वक्तव्य
Ashok Saraf
| Updated on: Feb 23, 2026 | 12:21 PM

मराठी सिनेविश्वात असंख्य अभिनेते आले, त्यांचं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं… चाहत्यांनी त्यांच्यावर प्रेम देखील केलं, पण कोणीत दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची जागा भरुन काढू शकला नाही. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी फक्त मराठीच नाही तर, अनेक हिंदी सिनेमांध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारली आणि आपल्या विनोदबुद्धीने चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही चाहते लक्ष्मीकांत बेर्डे यांना विसरु शकले नाही. ‘झपाटलेला’, ‘धडकेबाज’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘धूम धडाका’, ‘हमाल दे धमाल’, ‘आली लहर केला कहर’, ‘माझा छकुला’, ‘चिमणी पाखरं’ अशा अनेक विनोदी, कौटुंबित आणि भावनिक सिनेमात त्यांनी दमदार भूमिका साकारली आणि चाहत्यांना आपलसं केलं… मराठी सिनेविश्वात एक काळ असा होता जेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे, अशोक सराफ यांनी मराठी सिनेविश्वाला एका वेगळ्या उंचीवर नेलं…

त्यातल्या त्यात अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जोडीला आणि मैत्रीला चाहत्यांनी डोक्यावर केलं. 80 – 90 चा काळ अभिनेत्यांनी गाजवला. अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अनेक सिनेमात एकत्र काम केलं. आजही दोघांचे सिनेमे तितक्याच आवडीने पाहिले जातात. अशात नुकताच झालेल्या मुलाखतीत अशोक सराफ यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र अशोक सराफ यांच्या वक्तव्याची चर्चा सुरु आहे.

अशोक सराफ म्हणाले, ‘लक्ष्या एक टॅलेंटेड अभिनेता होता. कोणतंच फिल्मी बॅकग्राऊंड नसताना त्याने अभिनय विश्वात पदार्पण केलं आणि स्वतःचं नाव मोठं केलं. घरी कोणी अभिनय केलेलं नाही, मोठा नट आहे असं देखील काहीही नाही… बारीक बारीक रोल करुन तो पुढे आला… हे त्याच्यासाठी क्रिडिटेबल आहे… कोणताच आधार नसताने त्याने ते करुन दाखललं …’

‘त्याने कलेले सर्व रोल तुम्ही काढून पाहिले तर, त्याने मला फॉलो केलं आगे… त्याने स्टेट मला फॉलो केलं आहे, अर्थात स्टाइल जरा वेगळी होती. पण टायमिंग तेच आहे. लक्ष्या फार लवकर गेला. नाहीतर त्याला आणखी बरंच काही करता आलं असतं… त्याचा एकच ड्रॉबॅक झाला आणि तो म्हणजे, तो फक्त कॅमेडीच घेऊन बसला.. व्हरायटी त्याने कधी केलीच नाही… आम्ही दोघांनी मिळून जवळपास 50 सिनेमात एकत्र काम केलं. पण प्रत्येक सिनेमात तो माझा भाऊ, ड्रायव्हर किंवा दुसरा कोणती भूमिका करायचा.. प्रत्येक सिनेमात तो माझा सहाय्यक होता…त्याची एक वेगळी स्टोरी सिनेमात असायची…’ असं देखील अशोक सराफ म्हणाले.